Wednesday, April 25, 2012

छत्रपती संभाजी

एक ग्रंथ जो गागाभट्ट नी लिहिला होता त्या ग्रंथाचं नाव आहे 'समनयन'.
त्या ग्रंथाच्या पहिल्या पानावरती जे समर्पन आहे त्यात असं लिहिलं आहे,
'ज्याच्या पराक्रमाने दाही दिशा तळपतात अश्या शंभू राजांच्या त्या पवित्र विचारांना समर्पित.'
संभाजी महाराजांची विद्वत्ता काय आहे हे गागाभट्ट त्यांच्या प्रस्तावन्या मध्ये लिहितात.
संभाजी महाराजांनी स्वत: ४ ग्रंथ लिहिले हे तर आपल्याला माहिती आहे.
वया च्या १४ व्या वर्षीपहिला ग्रंथ लिहायला सुरवात केली आणी २० व्या वर्षी पुर्ण केला लो म्हणजे 'बुद्धभुषण'.
भल्या भल्या पंडितांना तोंडात बोट घालायला लागतील असा तो बुद्धभुषण ग्रंथ आहे. त्यातलं एक वाक्य असं आहे की बांबुच्या झाडाला शंभर वर्षा नंतर फुलं येतात आणी फुलं आल्या नंतर ते झाडमरत असतं.
याचा अर्थ असा की संभाजी महाराज फक्त साहित्यिक नव्हते तर इतर व्याव्हारिक न्यान हवं ते सुद्धा भरपूर होतं.
संभाजी महाराजांनी आणखी ३ ग्रंथ लिहिले वयाच्या ३० व्या वर्षा पर्यंत.
'नखशिख'
'सातसतक'
आणि 'नाइकाभेद'.
नाइकाभेद मध्ये न्रूत्याचे प्रकार किती असतात हे लिहिलं आहे. आज जे आपण भरतनाट्यम पाहतो ते भरतनाट्यम नाइकाभेद वरती आधारित आहे.
भरतनाट्यम या न्रूत्य प्रकाराचे जनक संभाजी महाराज आहे याचा पुरावा नाइकाभेद मध्ये सापडतो. नाइकाभेद हे संभाजी महाराजांनी लिहिलेल दुसरं ग्रंथ.
तिसरं ग्रंथ आहे नखशिख.
नखा पासनं तर शिखा पर्यंत म्हणजे पायाच्या नखा पासन तर शिखा पर्यंत म्हणजे डोक्या पर्यंत शरिराचं आरोग्य शास्त्र काय आहे. का तुम्ही आजाकी पडता आणी कसं तुम्ही नीट होऊ शकता याचा सखोल अभ्यास या ग्रंथात आहे.
याचा अर्थ हा की संभाजीमहाराज हे Doctor सुद्धा होते. हा ग्रंथ शैल्य चिकित्सेवरती आधारित आहे.
आणखी काय उधारण द्यायचं संभाजी महाराजांच्या विद्वत्तेचं?
संभाजी महाराजांचा शेवटचा ग्रंथ आहे सातसतक.
राजानी राज्य करतांना प्रजेला आपलं कुटुंब समजुन राज्य करायचं. मीत्या राज्याचा मालक नाही तर सेवक आहे ही भुमीता घेऊन राज्य केलं पाहिजे.
छत्रपती संभाजी हे चक्रवती संन्यासी आहे याचा पुरावा या ग्रंथात भेटतो.
त्यांनी आपल्या आयुष्यात तो प्रयोग करुन पाहिला.

शिव रुपाने मराठ्यांचा सूर्य उगवला

शिव रुपाने मराठ्यांचा सूर्य उगवला
पराक्रमे तयाच्या महाराष्ट्र
दारी भगवा फडकला !!
बापाने घडवल्या मुलुखाला
पुढे रेटाया आज युवराज धड़कला |
सिंहाच्या छाव्या जन्मी घालुनी,
... सयीने पुरंधारी शम्भू जोडीला !!
माथी संकट नसे , तो कोण भोसला
सिद्ध करावया शम्भू लहणपणीच
संकटाशी भिडला |
युवराज असुनही त्या दिवासी शम्भू
एकाकी पडला
कळन्याअधिच आईचा पदर सरला !!
धाराऊ दुधाने बाळशम्बु सळसळला ,
शिवाचा फ़र्जन्दच तो , त्यांच्यातोलाने च
तयाने भगवा हाती धरला |
एक समयी पाच मिहिमा लढला होता ,
मराठ्यांची ताकत धाखवत ,
शम्भूराजा अवघ्या मुलुखाची शान
बनला होता !!
रायगडाच्या होळी माळावर
उभ्या त्याच्या आबासाहेबाना मनात आठवत ,
मांवळचा हा वाघ लढत होता |
औरंग्याची गुर्मी उतरवत ,
शिवाचा शम्भू सारी हिरवी धगड़ फोडत
होता !!!
गनोजी सिर्क्याच्या बैमान हातान ,
आप्त्स्वकियानिच त्याचाघाट रचला होता ,
पैस्यापाई
त्याना हा स्वाभिमानी राजा नको होता |
सर्वाना पुरून उरनारा शम्भुराजा
म्हनुनच आज शत्रु हाती सापडला होता !!
डोळे फोडले , मीठ चोळले ,
तरी राजा डगमगत नव्हता|
कवडयाच्या माळीवर हात घालनार्यावर ,
त्याअवस्तेताही शम्भुराजा भडकला होता!!!
पण भवानीनेच आज गोंधळ घातला होता ,
म्हनुनच की काय तिला हावीर स्वर्गातच
पाहिजे होता |
शिवाने दिलेल्या शपतेपाई
शम्भुराजा महाराष्ट्रधर्मासाठी बेचाळीस
दिवस लढला
मरता मरताही भगवा कवटाळत ,
शम्भू राजाने"जग्दम्भ!!"म्हणत हिन्दवी शब्दच
उच्चारला होता
हिन्दवी शब्दच
उच्चारला होता....... !!!!
 
आभार - अमित गांगर्डे आणि त्यांचे सहकारी .

कारकीर्द शहाजी राजांची..

कारकीर्द शहाजी राजांची..
जेव्हा दिल्लीमध्ये दिल्लीपती शहेनशाह शहाजान आणि महंमद आदिलशहा या दोघांनी मिळून निजामशाही संपवली,त्या वेळी निजामशहाचा वारसदार मूर्तझा या लहान मुलाला स्वत:च्या मांडीवर बसवून शहाजीराजांनी स्वतंत्रपणे राज्यकारभार सुरू केला, व जणू स्वत:वरच छत्र धारण केले.ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ ३ वर्षे टिकला होता.
राजस्थानच्या चित्तोडगढच्या संग्रामात अल्लाउद्दीन खिलजीशी लढताना राणा लक्ष्मणसिंह नावाचा सेनानी आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडला. पुढे याच वंशातील भैरोसिंह उर्फ भोसाजी महान कार्य करून गेले. त्यांच्यामुळेच या वंशाला पुढे ‘भोसले’ हे नाव प्राप्त झाले. याच वंशात पुढे वेरुळस्थित बाबाजीराजे भोसले यांच्या घरात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई भोसले यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्हीमुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली. पुढे सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा इ.स. १६०३ मध्ये विवाह झाला. यावेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत होते. पुढे लगेचचमालोजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कालांतराने जसेजसे शहाजीराजे मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली.
दरम्यान अहमदनगरजवळील भातवडीच्या रणांगणात निजामशाही संपवण्यासाठी भारतवर्षातील सर्व इतर सत्ता एकत्र आल्या होत्या. निजामशाही वाचवण्यासाठी या एकत्रित फौजांचा सामना शहाजीराजे वजीर मलिक अंबरच्या साथीने करीत होते ( इ.स. १६२४ ). त्यांना त्यात यश मिळाले. शहाजीराजांचा ऐतिहासिक विजय झाला. याच लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले. पण पुढे मलिक अंबरची दरबारातील राजकारणी वागणूक पाहून शहाजीराजे आदिलशाहीत गेले. त्यानंतर इ.स. १६३९ मध्ये आदिलशहाकडून "सरलष्कर" ही पदवी त्यांना देण्यात आली व बंगळूरची जहागिरीही त्यांना प्राप्त झाली. आदिलशाहीत असताना शहाजीराजांनी पुणे परगणा निजामशाहीकडून काबीज केला होता.
शहाजीराजांना बंगळूरचा प्रदेश फार आवडला. शहाजीराजे व त्यांचे थोरले चिरंजीव संभाजीराजे यांनी आपल्या मनातील स्वराज्य संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे या ठिकाणी ठरविले. ते मुळातच उत्तम प्रशासक व पराक्रमीयोद्धे होते. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणूनच त्यांनीयोग्य वेळ पाहून पुण्यात आपल्या जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी पाठवले होते. त्याचबरोबर श्यामराज रांझेकर , बाळकृष्णपंत हणमंते , रघुनाथ बल्लाळ अत्रे , कान्होजी जेधे नाईक व यांच्याबरोबर इतर अनेक मातब्बरांनाजय्यत तयारीनिशी शिवाजी महाराजांसोबत राज्यकारभारासाठी पाठवले होते. राज्यकारभारासाठीची आवश्यक राजमुद्राही शहाजीराजांनीच शिवरायांना दिली.
दरम्यानच्या काळात आदिलशहाचा मुख्यवजीर नवाब मुस्तफाखान याने बाजी घोरपडे , मंबाजी भोसले , बाजी पवार , बाळाजी हैबतराव , फतहखान , आझमखान यांच्या साहाय्याने शहाजीराजांना दगा देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले. साखळदंडांनी बांधून भर विजापुरातून शहाजीराजांना दरबारात हजर करण्यात आले. तो दिवस होता २५ जुलै, इ.स. १६४८ चा. हे कळताच शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीपणाने राजकारण करत दिल्लीत मोगल सुलतान शहाजहानला एक पत्र पाठवले. स्वत: आपणव आपले पिता शहाजीराजे हे दिल्लीपतीची चाकरी करू इच्छितात असे त्यांनी लिहिले. या बदल्यात शहाजीराजांची विजापूरच्या कैदेतून मुक्तता करावी ही अट घातली. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी दिल्लीच्या बादशहाला मधाचे बोट लावले होते. हा प्रयत्न यशस्वी ठरला.शहाजीराजांची दि. १६ मे, इ.स. १६४९ रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली.
शहाजीराजांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की त्यांनी स्वाभिमान राखत आदिलशाही , मुघलशाही व निजामशाही - या सर्व सत्ताधीशांकडे काम केले. आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले. काही काळानंतर ते पुन्हा आपल्या जहागिरीत परतले. माघ शुद्ध ५,म्हणजेच २३ जानेवारी, इ.स. १६६४ रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेलेअसताना त्यांच्या घोड्याचा एका वृक्षवेलीमध्ये पाय अडकला व ते खालीकोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
एक शूर मराठा सरदार. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजीराजांचे पिता व राजमाता जिजाबाई यांचे यजमान.
यांना,
"छत्रपती प्रतिष्ठानाचा" मानाचा मुजरा!

तो काळ होता.. ते मराठे होते.

तो काळ होता.. ते मराठे होते.
शिवरायांचा शब्द ऐकल्यावर सर्व विसरून जाणारे मराठे
होते..
मग घरात कोणतेही कार्य असो सण,त्योहार असो
शिवरायांच्या शब्दाखातर जीवाची बाजी लावणारे
मराठे होते....
शिवरायांचा शब्द पाळण्यासाठी जीवाची पर्वा न
करणारे मराठे होते...
जीव जाणार माहीत असूनहि... सतत पुढे येणारे मराठे
होते..
मग आता झालं तरी काय..??
त्या शिवरायांच्या पुतळ्यासाठी / स्मारकासाठी सर्व
माघार का घेत आहेत...?
हे सुद्धा मराठेच आहेत ना ?? की (०:०:०:०) ???
Valentine day वर बंदी आली कीसंपूर्ण
महाराष्ट्रातली युवा शक्ती एकत्र येते..
मग ज्यांच्या मुळे.. हिंदुत्व,
मराठीबाणा जन्माला आला त्यांच्या साठी मात्र
आपली भावना कोरीच का???
मोजून नेते आहेत तरी किती ??...
आणि मराठी जनता किती आहे ??
हिच वेळ आहे मराठ्यांनो..
दाखवून द्यायची...
आपल्यातही सळसळतंय तेच मर्दमराठ्याच रक्त ...
शिवरायांसाठी आपण काय करू शकतो ते .....
मराठीबाण्यासाठी आपण काय करू शकतो ते....
आम्ही आहोत तयार... मग बघूच कोणते नेते येतआहेत आडवे...
आपण आहात का ???
जय जिजाऊ
जय शिवराय...
प्रत्येक मराठ्याच्यास्टेटस वर तरी.. हा झणझणीत लेख
दिसलाच पाहिजे ..
आयुष्यात काहीतरी करूया..
पुढच्या पिढीला तरी आपल्याबद्दल गर्व
वाटायला....
आभार - रोहित शिंदे आणि त्यांचे सहकारी

शिवछत्रपतींबाबत

शिवछत्रपतींबाबत मी जितका विचार करतो तितकं गुंगुन जायला होतं. महाराजांच आयुष्य म्हणाल तर तुलनेने कमी होतं. पैकिपहिली १५ वर्ष सोडून द्यावीत कारण शिवाजीराजे असले तरी बालपण हे बालपणच असतं. त्यांना समज व त्यांवरचे आऊसाहेबांचे संस्कार ह्या त्यांच्या जमेच्या बाजू धरुनहि राजकिय विचार करता १५ वर्ष बाजूला काढायला हरकत नाहि. म्हणजे उरली३५ वर्ष ... ३५ वर्षात एक माणूस नेमकं असं काय करतो कि ३५० वर्षांनीहि त्याचे विचार, कृती हे तितकेच ताजे रहातात? इतकेच नव्हे तर जगाच्या इतिहासात दुसरे उदाहरण नाहि अश्या अनेक घटना शिवकालात व शिवोत्तर कालात मराठ्यांबाबत घडल्या.
विचार करा - ज्याने दिल्लीच्या राजपुत्राला रणांगणावर अडकवून ठेवले होते व ज्याचा डंका रुमशेमपावतो वाजत होता अश्या एका ताकदवान माणसाला आपल्याला हवे त्या भागात बोलावून स्वहस्ते कोथळा बाहेर काढलेली घटना जगात दुसरी कुठली आहे? - नाही!
तब्बल सव्वालाखांहून जास्त फौजेत चारशे - पाचशे माणसांसकट घूसून कामगिरी फत्ते करुन सुखरुप परत येणे हि घटना घडली आहे कुठे? - नाहि! तसे बघायला गेलेतर राजकिय व सामरिक दृष्ट्या खुद्द"राजाने" असे करणे हा वेडेपणाच होता, एक माणूस फितूर आणि सगळे संपले, एक गळपटला असता तर सगळे उधळले गेले असते, खुद्द राजांच्या जीवाला धोका होता. पण हि संधी अखेरची कारण एकदा कोकणात खानाच्या लोकांनी छावणी केली कि तळकोकण स्वराज्यापासून तुटलेअसते. शिवाय रणात मारुनकाढावे इतकि ताकद मराठ्यांत तेव्हा आली नव्हती. जनता नागवली जात होती. हा जाणता राजा जनतेची किती काळजी घेत होता हे ह्याकाळातील बाजी जेधेंना लिहिलेल्या २-३ पत्रांतून दिसुन येते पण बरोबरच खानाचं संकट किती मोठं होतं व महाराजांवर किती ताण होता तेहि समजते. ’इस पार या उस पार’ ह्या विचारानेच जनतेसाठी स्वत:चा जीव ह्या देवमाणसाने धोक्यात घातला. ’कमांडो ऑपरेशन’ कशाला म्हणातात ते समजण्यासाठी शास्ताखानावरचा छापा त्यामगचा विचार व केलेली कृती हे पुन: पुन: वाचून त्यावर विचार करण्यसारखा आहे. आणि कल्पनेबाहेर हे ’कमांडो ऑपरेशन’ यशस्वीझाले. पुन्हा सांगतो - " निदान पहिल्या महायुध्दा आधी जगात एकहि असे उदाहरण नाहि."
तब्बल ४५० - ५०० किमी वरची शत्रूची "आर्थिक राजधानी" दोनवेळा धूवून काढायची आणि शत्रुच्या नाकाखालून सगळी संप्पत्ती घेऊन यायची, जगाच्या इतिहासात दुसरे उदाहरण नाहि.
   आभार - मुकुंद पिंगळे आणि त्यांचे सहकारी 





हिंदुत्वाचे महान रक्षक : धर्मवीर संभाजीराजे !

हिंदुत्वाचे महान रक्षक : धर्मवीर संभाजीराजे !
औरंगजेबाला २७ वर्षे उत्तर हिंदुस्थानापासू न दूर ठेवणारे संभाजीराजे
संभाजीराजांनी जी अलौकिक कामे त्यांच्या अल्पायुष्यात केली, त्याचा दूरगामी परिणाम संपूर्ण हिंदुस्थानावर झाला. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येक हिंदु बांधवाने कृतज्ञ राहिले पाहिजे. त्यांनी औरंगजेबाच्याआठ लाख सैन्याला न डगमगता तोंड दिले आणि कित्येक मोगल सरदारांना लढाईत पराभूत करून त्यांना पळता भूई थोडी केली. त्यामुळे औरंगजेब दीर्घकाळ महाराष्ट्रात लढत राहिला आणि संपूर्ण उत्तर हिंदुस्थान त्याच्या दडपणापासून मुक्त राहिला. ही संभाजीराजांची सगळयातमोठी कामगिरी म्हणावी लागेल. त्यांनी औरंगजेबाबरोबर तह केला असता, त्याचे मांडलिकत्व स्वीकारलेअसते, तर तो दोन-तीन वर्षांत पुन्हा उत्तरेत गेला असता; परंतु संभाजीराजांच्या संघर्षामुळे २७ वर्षे औरंगजेब दक्षिणेत अडकून राहिला आणि त्यामुळे उत्तरेत बुंदेलखंड, पंजाब आणि राजस्थान या ठिकाणी हिंदूंच्या नवीन सत्ता उदयाला येऊन हिंदु समाजाला सुरक्षितता लाभली.
हिंदूंच्या शुद्धीकरणासाठी सदैव दक्ष असलेले संभाजी महाराज !
शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर यांना पुन्हा हिंदु धर्मात घेतल्याची हकिकत सर्वांना माहीत आहेच; परंतु संभाजीराजांनी `शुुद्धीकरणासाठ ी'आपल्या राज्यात स्वतंत्र विभाग स्थापन केला, हे विशेष महत्त्वाचे आहे. हरसूल गावच्या कुलकर्णी आडनावाच्या ब्राह्मणाची कथा संभाजीराजांच्या इतिहासात नोंदवलेली आहे. जबरदस्तीमुळे मुसलमान झालेला हा कुलकर्णी हिंदु धर्मात परत येण्यासाठी खूप प्रयत्न करत होता; परंतु स्थानिक ब्राह्मण त्याला दाद देत नव्हते. शेवटी हा ब्राह्मण संभाजीराजांना त्या धामधुमीच्या काळात भेटला आणि त्याने आपली व्यथा आपल्या राजासमोर मांडली. महाराजांनी ताबडतोब त्याच्या शुुद्धीकरणाची व्यवस्था करून पुन्हा त्याला स्वधर्मात प्रवेश दिला. राजांच्या उदार धोरणामुळे कित्येक हिंदू पुन्हा स्वधर्मात आले !

माझ्या शिवबाशी मराठ्याच नात आहे.

माझ्या शिवबाशी मराठ्याच नात आहे.
स्वराज्याच्या मातीत त्यांच्या शुर मावळ्यांच रक्त आहे
रक्तात ज्वालामुखी नजरेत लाव्हा आहे.
वाटेला जावु नका मराठ्यांच्या रणांगणात उतरला तर क्षणात सार भस्म आहे.
नडला म्हणुन फाडला.
मैत्री आमच्या रक्तात आहे.
मिर्झाला विचारा राजा किती दिलदार आहे......!
--- कृष्णा पाटील

तुम्हाला कदाचित माहित नसेल पण..

तुम्हाला कदाचित माहित नसेल पण आजकाल आपणच आपला घात करायला उठलो आहोत...
पानिपत संक्राती दिवशी घडले आले म्हणून आपण संक्रांत बंद करायला चाललो आहोत.
आज आपण गुढीपाडवा साजरा करु नका असे म्हणत आहात.हळूहळू हिदूंचे सर्वच सण बंद पाडण्याचा काही हिँदूद्वेष्ट्या लोँकांचा कट चालला आहे.
सणच राहिले नाहित तर संस्कृतीच नष्ट होईल.मग काय स्वतःच्या लोकांचा आपल्या धर्माविषयी स्वाभिमाननष्ट होऊन ते धर्माँतर करायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाहीत.
गुढीपाडवा अयोद्धे कडे साजरा होत नाही याचे कारण म्हणजे तिकडे झालेला संस्कृतीचा नाश.
आणि महाराष्ट्र हा देवाधर्माचा व संतांचा राष्ट्र आहे त्यामुळे आपल्याकडील संस्कृती टिकून आहे.
खरे तर आपल्या हिंदुचे सण पुर्वकाळापासून अतिशय शास्रोक्त पद्धतीने केले जात होते पण सुलतानांच्या आक्रमणामुळे हिंदु संस्कृतीचा ऱ्‍हास होऊ लागला.इतकी संस्कृती लयाला लागली की लोकांना पुन्हा जागे करण्यासाठी देवांनासुद्धा अवतार घ्यावा लागला.
दत्तावतार स्वामी समर्थ,
हनुमान अवतार साई बाबा,
रामदास अवतार गजानन महाराज या सर्वाँनी शिवरायांचे गुणगान केले आहे व त्यांचे कार्य पुन्हा चालू ठेवले आहे.
आणि गुढीपाडव्याबद्द ल बोलायचे झाले तर जेव्हा शालिवाहन राजाने शकाचा पराभव केला त्यामुळे हा दिन विजयदिन म्हणुन ओळखला जातो.शालीवाहन राजाच्या विजयदिनापासून नवीन कालगणना सुरु झाली.त्याला'शाल ीवाहनशतक'म्हणता त.गुढी म्हणजे शालिवाहन राजाचा विजयध्वज आहे.
म्हणूनच गुढीवर तांब्या उलटा ठेवतात..०
गुढी आपल्याला काय सांगते ..?
"मुलांनो नवीन वर्ष सुरु झालयं,नवीन विचार करा,संकल्प करा,सद्विचार सदाचार यांची झेप,आकाशाला गवसणी घालू या,मी जशी ऊंच आहे निळ्या निळ्या आकाशाशी नाते सांगते आहे तशी तुमची प्रगती होऊ द्या,परमेश्वराच ्या सेवेत सातत्य असू द्या."
औरग्यांने हिँदूंचा मुख्य सणच हत्येसाठी निवडला याचे कारण हेच आहे की हिँदू संस्कृतीचा नायनाट....
या नववर्षाला गुढीसुद्धा आपल्या संभाजीराजांच्या बलिदानासाठी ऊंच आकाशात ऊभा राहून सलाम करते असे आपल्या लोकांनी म्हणले पाहिजे.जागे व्हा.विचार करा.मुर्खासारखे वागू नका.
जय भवानी
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे
जयतु हिँदु राष्ट्रम.

!!..गडवाट...!!!



जपून टाका पाऊल फारच अरुंद आहे वाट
फितुरीची शतवर्षाची त्यात इथे वहिवाट
पडतील गडकिल्ले पडतील बुरुज
पसरेल साथीने चोहीकडे फक्त खरुज
सदा एकटा शंभू समईवाचून राहतो उदास
पाहुनी अंधारालाही जीवन वाटे उदास
जागे झालेत आता मावळे जागे झाले भक्त
आसवे रोखून उभा राहिले राखण्या तक्त
"दौलतीचे सुतक" -म्हणाला इथे भटक्या एक
करत बसला तुळापुरी दुग्धासह शंभूभक्तीचा अभिषेक
पाहून सारे आज मी सांगत आहे
नाही संपणार रक्त नाही सुटणार गाठ
जोवर राहतील गडकिल्ले तोवर राहील गडवाट .!!!

कवी-अंकुश पाटील(निरांकुश)

कोंडाजी फर्जंद : पराक्रमाचे दुसरे नाव

कोंडाजी फर्जंद : पराक्रमाचे दुसरे नाव
अवघ्या साठ मावळ्यानिशी पन्हाळगडताब्यात घेणारा पराक्रमी वीर हा कोंडाजी होय.तुंगभद्रेपा सून उत्तरेस अहिवंतापर्यंत अनेक गड राजांनी कब्जात घेतले होते.पण दख्खनचा दरवाजा असलेला पन्हाळगड त्यांना ताब्यात मिळाला नव्हता.राजेंनी दि.६ जून १७७२ रोजी रायगडावर आपल्या सहकार्यांनना ही सल बोलून दाखविली.
यावेळी कोंडाजी फर्जंद,राजेंना बोलिला की गड म्या घेतो.त्याने अवघे तीनशे हशम(मावळे)राजें कडे मागितले.अवघ्या तीनशे मावळ्यानिशी पन्हाळगड जिंकावयास निघालेल्या कोंडाजीचेराजेंनी कौतुक करून त्यास सोन्याचे कडे दिधले.कोंडाजीने कोकणातून महाडमार्गे येऊन राजापुरास आपला तळ टाकला.राजापुर व पन्हाळा किल्ला हे अंतर आडवाटेने(जंगली रस्त्याने)अंदाज े ८०-९० कि.मी होते.हेरगिरीने वेष पालटून गडावर जाऊन त्यांनी गडाची पूर्ण माहिती काढली.गडावर अंदाजे दोन हजार गनिम होते.बाबूखान हा अदिलशाही किल्लेदार होता.
फाल्गुन वद्य त्रयोदशी(दि.६ मार्च १६७३)रोजी मध्यरात्री राजापुरातून येऊन फिरंगोजी गडाच्या जवळ पोहोचला.तीनशे मावळ्यापैकी त्यांनी निवडक साठ मावळे घेऊन गडावर हल्ला केला.तीन दरवाज्याजवळ असलेल्याकड्यावरून चढून त्यांनी गडावर प्रवेश केला.मध्यरात्री मराठे गडावर आल्यावर त्यांनी कापाकापीला सुरूवात केली.गडाचा किल्लेदार बाबूखान व कोंडाजी यांच्यात महाभयंकर युध्द जाहाले.अखेर कोंडाजीच्या तलवारीच्या वारात बाबूखानाचे मस्तक धडावेगळे झाले.किल्लेदार पडल्यामुळे खानाच्या सैन्यात गोंधळ उडाला.ते पळून जाऊ लागले.पण गडावरील साठ मावळ्यांनी त्यांची दाणादाण उडवून गड ताब्यात घेतला.अवघ्या साठ मावळ्यांनिशी गड ताब्यात घेणारा कोंडाजी खरोखरच वीर होता.

खान सुमारे तीस हजार पठाणी फौज घेऊन

खान सुमारे तीस हजार पठाणी फौज घेऊन बऱ्हाणपुराहून निघालाआणि नाशिक जिल्ह्यात घुसला. या भागातील अनेककिल्ले मराठ्यांनी कब्जात घेतलेलेहोते. त्यातीलच कण्हेरा गड या नावाचा डोंगरी किल्ला मराठ्यांच्या ताब्यातहोता. दिलेरखान हा कण्हेरा घेण्यासाठी सुसाट निघाला. दिलेर हा अत्यंतकडवा आणि हट्टी असा सरदार होता.कण्हेऱ्याच ्या परिसरातच सपाटीवर महाराजांचा एक जिवलग शिलेदार अवघ्या सातशे मराठी पायदळानिशी तळ ठोकून होता. कारण मोगलांच्या फौजा केव्हा
स्वराज्यात घुसतील याचा नेम नव्हता. म्हणून ही सातशेची तुकडी गस्तीवर राहिली होती. या तुकडीचा नेता होता रामाजी पांगेरा. हा रामाजी विलक्षण शूर होता. प्रतापगडच्या युद्धात अफझलखानच्या सैन्याविरुद्ध जावळीच्या जंगलात या वाघाने भयंकर थैमान घातले होते. (दि. १० नोव्हेंबर १६५९ ) त्याने पराक्रमाची शर्थ केली. तो हा रामाजी पांगेरा कण्हेऱ्यापाशी होता.
एक दिवस दिवसाउजेडी त्याला हेरांनी खबर दिली की , औरंगजेबाचा खासा सरदार दिलेरखान पठाण भलं मोठं घोडदळ घेऊन कण्हेऱ्यावर चालून येत आहे. दिलेरचीफौज खरोखरच मोठी होती. त्याच्यापुढे रामाजीची फौज चिमूटभरच होती. ही खानाच्या आक्रमणाची खबर मिळताच खरे म्हणजे रामाजीने आपल्या सैन्यानिशी शेजारच्याच आपल्या कण्हेरा गडावर जाऊन बसायला हरकत नव्हती. तेसोयीचे आणि निर्धास्त ठरले असते. पण रामाजी पांगेऱ्यातला वाघोबा चवताळून उठला. तो
आपल्या चिमूटभर मावळ्यांपुढे उभा राहीला. दिलेरखान मोठ्या फौजेनिशी चालून येतोय हे त्या चिमुकल्या मराठी तुकडीला समजलेच होते. रामाजी आपल्या लोकांच्या पुढे उभा राहिला आणि मोठ्या आवेशात तो गरजला,'मर्दांनो , खानाशी झुंजायचंय , जे जातीचे असतील , ( म्हणजे जे जातिवंत योद्धे असतील ते) येतील. मर्दांनो , लढाल त्याला सोन्याची कडी , पळाल त्याला चोळी बांगडी'असे बोलून रामाजीने आपल्या अंगावरचा अंगरखा काढून फाडून फेकला. डोईचे मुंडासेही फेकले. अन् दोन्ही हातात हत्यारे घेऊन त्याने एकच हरहर केला. साक्षात जणू भवानीच संचरली. अवघ्या मराठी सैन्यानेही तसेच केले. मूतिर्मंत वीरश्रीने कल्लोळ मांडला. उघडे बोडके होऊन मराठी सैन्य भयभयाट करू लागले. अन् दिलेरखान आलाच...
वणव्यासारखे युद्ध पेटले. तलवारबाजीने दिलेरखान थक्कच झाला. त्याला पुन्हा एकदा पुरंदरगड अन् मुरारबाजी देशपांडा आठवला. झुंज शथीर्ची चालली होती. पण मराठ्यांचा आणि रामाजीचा आवेश दारूच्या कोठारासारखाभडकला होता. अखेर हट्टीदिलेर हटला.

असे हे जीवा महाला !!

श्री शिवछत्रपतींच्या प्रमुख मावळ्यापैकी एक असे हे जीवा महाला !!
या मावळ्याचे संपूर्ण नाव म्हणजे जिवबा महाला संकपाळ असे होय.
“छत्रपतींनी उजवे हातचे बिचव्याचा मारा चालवून खानची चरबी बाहेर काढली व
चौथरीयाखाले उडी घालोन निघोन गेले..
इतक्यात सैदबंडा पटाईत धावला, त्याने राजे जवळ केले, पट्ट्याचे वार राजियावरी चालविले.
तो राजियाने जिऊ महालिया जवळील आपला हुद्दीयाचा पट्टा घेऊन, पट्टा व विचवा असे कातर करून सैदबंडा याचे चार वार ओढले.
पांचवे हाताने राजियास मारांवे तो इतकीयात जिऊ महाला याने फिरंगेने खांद्यावरी सैद्बंडीयास वार केला.
तो पट्टीयाचा हात हत्यार समेत तोडीला आणि खानाचे शीर घेऊन राजे सिताब गडावरी जिऊ महाला व संभाजी कावजी महालदार असे गेले.”
याच प्रतापगडावरील पराक्रमामुळे “होता जीवा म्हणून वाचला शिवा” अशी उक्ती प्रचलित झाली.
अश्या या पराक्रमी जिवबा महाला यांचे पुढे सन १७०९ मध्ये निधन झाले आणि त्यांची समाधी रोहीडा किल्यावर बांधण्यात आली….
अशा या पराक्रमी शिवरायांच्या मावळ्याला त्रिवार मानाचा मुजरा..
धन्य ते शिवराय आणि धन्य ते शिवरायांचे मावळे..

शिवप्रभात मराठ्यांनो

शिवप्रभात मराठ्यांनो
आज हजारो मंदिरे असताना , लाखो नास्तिक.....
पण एकही मंदिर नसताना
प्रत्येकाच्या ह्रुदयात जगनारा
अन प्रत्येकाच्या रक्तात वाहणारे
" छत्रपती शिवराय"....
परमेश्वराची व्याख्याआता बदलावीच लागेल ...!!!
||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥

राजांचे एक रुप

शिवशारांच्या व्याक्त्यव्यात ऐकण्यास आलेले राजांचे एक रुप
............... .....
छत्रसाल बुंदेला या बुंदेला घराण्यातील राजपुत्र जेव्हा शिवाजी राजांच्या भेटीला आला तेव्हा त्याने राजांकडे आपल्या सैन्यात नोकरी मिळावी अशी गळ घातली,
तेव्हा शिवरायांनी छत्रसाल बुंदेला ला सांगितले कि इथे सैन्यात भारती होण्यापेक्षा तुम्ही तुमच्या राज्यात हिंदवी स्वराज्य निर्माण करा..
" तुम्ही फक्त मनात आणा, तुम्ही काहीही करू शकाल "
आता आपण फक्त म्हणतो NOTHING IS IMPOSSIBLE पण करतकाही नाही..
शिवरायांनी सांगितल्याप्रमा णे ,
" तुम्ही फक्त मनात आणा, तुम्ही काहीही करू शकाल "
।। जय शिवशंभू ।।

शूर शिलेदार येसाजी कंक.......

शूर शिलेदार येसाजी कंक.......
जेव्हा छत्रपती शिवराय हे राज्याभिषेकानंत र दक्षिण दिग्विजयासाठीगेले होते त्यावेळी आदिलशाही संपवण्यासाठी त्यांनीकुतुबशहाशी हातमिळवणीकेली होती. कुतुबशहाने भेटीच्या वेळी विचारले की"मराठा सैन्यामधे हत्ती कां नसतात..?"त्याबद ल्यात शिवरायांनी उत्तर दिले होते की"स्वराज्याच्य ा सैन्यातील प्रत्येक मावळा हा हत्तीवर भारी पडू शकतो."तेव्हा येसाजी कंक यांनी आपल्या राजाचा शब्द खरा करून दाखवण्यासाठी म्हणून आखाड्यात उडी घेतली. त्यांनी हत्तीशी एकट्याने झुंज दिली व हत्तीस पळवून लावले.
शिवाजीराजेंनंतर शंभूराजेंसोबत त्यांनी फोंड्याला पोतुर्गीजाना पाणी पाजले या युध्दाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे.गोवा जिंकल्यावर शंभूराजेंनी पोर्तुगीजशी तह केला होता.पण औरंगजेबने,कुडाळ च्या सावंतने तसेच वेंगुर्ल्याच्या देसाईने,पोर्तुग ीजांना फितवून फोंडा किल्यावर आक्रमण करावयास लावले.त्यावेळी फोंडा किल्याचा किल्लेदार येसाजी कंक हा होता.पोर्तुगीजा ंनी जोरदार आक्रमण करून फोंडा किल्यास भगदाड पाडले.यावेळी किल्यात फक्त आठशे मावळे होते.
पोर्तुगीजांनी किल्याच्या भगदाडातूनआत प्रवेश केल्यानंतर येसाजी त्याचा पुत्र कृ्णाजी व मावळ्यांनी असा पराक्रम केला की पोर्तुगीजांची दाणादाण उडाली.पण पोर्तुगीजांची संख्यामोठी असल्यामुळे मराठ्यांचा टिकाव लागेना.याचवेळी शंभूराजें येसाजीच्यामदतीस एक हजार घोडदळ व तितकेच पायदळ घेऊन आले.त्यामुळे मराठ्यांना अधिक चेव चढला.मराठ्यांपु ढे पोर्तुगीजांचा टिकाव लागला नाही त्यांचा पराभव झाला.या युध्दात येसाजी कायमचे जायबंदी झाले तर त्यांचा पुत्र कृष्णाजी युध्दात मारला गेला.या युध्दात पराक्रम गाजविल्याबद्दल शंभूराजेंनी येसाजीस एक हजार होन नेमणूक देऊन त्यांचा सन्मान केला.

सरसेनापती संताजी घोरपडे

महाराजांना एका पेक्षा एक असे सेनापती लाभले तीच परंपरा पुढे शंभुराजांच्या कालात हंबिराव मोहिते यांनी चालू ठेवली. शंभुराजांना आणि कवी कलाशंना संगमेश्वरी शेख निजाम यानि पकडले आणि त्याच वेळेस म्हालोजी घोरपडे मारले गेले. या नंतर मोग्लांनी रायगड घेतला आणि जणू मराठ्यांचे हे राज्य (महाराजांचे दिव्य स्वप्नच) नष्ट होते कायअशी परिस्तिथि निर्माण झाली. पण याच वेळेस महाराजांच्या आणि शंभु राजांच्या तल्मित तयार झालेले काही रणझुंझार पुढे सरसावले आणि याच मराठी भूमीत त्या मस्ताव्लेल्या मोघल बादशाहला गाढ़ला. या योध्यात एक आघाडिचा वीर म्हणजे "सरसेनापती संताजी घोरपडे". मराठ्यांचा इतिहास सेनापती संताजी घोरपडे यांचे नाव न घेता पूर्ण होउच शकत नाही.
भोसले आणि घोरपडे घराणे हे एकाच वृक्षाच्या दोन शाखा. मुळ पुरुष सुजनसिंह हा उदयपुरच्या राजघराण्यातील होता. दक्षिणेत आल्यावर यानी हसन गंगूची सत्ता मजबूत करण्यासाठी पुष्कल मेहनत घेतली. याच सुजनसिंहच्या पणतूस (भैरवसिंह) मुधोलची ८४ गावांची जहागीर प्राप्त झाली. भैरवसिंह यांस "भुशल धारी" असे संभोदले आहे. भुशल धारी म्हणजेच"भूतलावरिल शस्त्रधारी" म्हणजेच"क्षत्रिय योद्धा". पुढे कालांतराने भुशलचे भुशाल, भुसाल, भोसाल, भोसल, भोसला, भोसले असे हो़त गेले. मालिक उत्तुजरास खेळणा किल्ल्याच्या पायथ्याच्या जंगलात शिर्के आणि शंकरराव मोरे यांच्या फौजांनी हरवले. पण १४६९ साली मंहमद गवान याने कोकणची मोहिम हाती घेतली. यात त्याला भैरवसिंहचा पणतू कर्णसिंह आणि या कर्णसिंहचा पुत्र भीमसिंह यांची मोलाची साथ लाभली. जे सुलतानी फौजेला जमले नाही ते यापितापुत्र जोड़ीने केले. त्यांनी खेळणा किल्ला घोरपडीच्या साह्याने सर केला आणि हा दुर्गम किल्ला बहमनी सुलतानास बहाल केला. या युद्धात कर्णसिंह मारला गेला. तर भीमसिंहंस "राजा घोरपडे बहाद्दर" हा किताब बहाल करण्यात आला त्याच बरोबर घोरपडीच्या रंगाचे निशाण सुद्धा देण्यात आले. (संदर्भ- मुधोल घोरपडे घराण्याचा इतिहास) पुढे भीमसिंहचे वंशज घोरपडे बहाद्दर हे पद नावा नंतर लाऊ लागले. बाहमनी अस्तानंतर दक्षिणेत पाच शह्या निर्माण झाल्या.

एक ग्लास पाणी



एका गांवात एक स्त्री गांवाबाहेर आपल्या लहान मुलाला घेऊन एकटीच रहात होती. मुलाचे वडील त्याच्या लहानपणीच देवाघरी गेले होते. मुलाचे नाव होते लक्ष्मणदेव. आई धुणीभांडी करून आपला चरितार्थ चालवित होती. मुलगाही आईला कामात मदत करत असे. काम करून तो लांबच्या शाळेत पण जाई.

एक दिवस तो शाळेतून परत आला तर आई झोपलेली होती. तिला खूप ताप भरला होता. लक्ष्मण आईची सेवा करू लागला. बरेच दिवस झाले तरी आईचा ताप उतरेना. खांण बंद झालं. ती खूप अशक्त झाली. लक्ष्मणाला घरची बाहेरची सर्वच कामे करावी लागत. आईची सेवा तो अगदी मन लावून करत असे. तिला दूध गरम करून देणे तिची औषधं वेळच्या वेळी देणे.

एका रात्री आईने लक्ष्मणाला हाक मारली.'लक्ष्मणा थोडे पाणी देतोस'लक्ष्मण घरात पाणी आणायला गेला. पाणी घेऊन तो परत आला तेवढयात आईला झोप लागली. गुंगीत आई पडून होती. रात्र संपली पहाट झाली. गार वार्‍याच्या झुळुकीबरोबर आईला जाग आली. तिने पाहिले समोर हातात पाण्याचा पेला घेऊन लक्ष्मण उभा होता. आई म्हणाली'लक्ष्मणा अरे तु रात्री झोपलाच नाहीस का ? वेडया अरे मला उठवायचे नाही कां ?

लक्ष्मण आईच्या हातात पाण्याचा पेला देत म्हणाला,'आई अग माझ्या लहानपणी माझ्यासाठी तु किती रात्री जागुन काढल्यास मग मी एक रात्र तुझ्या करता जागलो तर काय झालं'.
--------------- --------------- ------------

"जय शिवाजी" बोलल्याने

ओम" बोलल्याने मनाला शांती ,
"साई" बोलल्याने मनाला शक्ती,
"राम" बोलल्याने पाप मुक्ती,
पण "जय शिवाजी" बोलल्याने
आम्हाला
१०० वाघांची ताकद मिळते.
"आम्ही फक्त आणि फक्त शिव-शंभु
राजमाता जिजाऊ आणि मराठीचेच भक्त"
"महाराजांना मानाचा मुजरा"
|| जय शिवराय ||
|| जय राजमाता जिजाऊ ||
-गौरव पठाडे
  

हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.

हेर म्हणजे
राजाचा तिसरा डोळा.
महाराजांचं हेर खातं अत्यंत सावध आणि कुशल होतं. त्यात एकूण किती माणसं काम करीत होती हेतपशीलवार मिळत
नाही. बहिर्जी नाईक जाधव , वल्लभदास गुजराथी , सुंदरजी परभुजी गुजराथी , विश्वासराव दिघे एवढीच
नावे सापडतात. पण गुप्तरितीनं
वावरणाऱ्या या गुप्तहेर खात्यात बरीच माणसे असली पाहिजेत असे वाटते.
परदरबारात राजकीय
बोलणी करण्यासाठी जाणारे स्वराज्याचे सारे वकीलएकप्रकारे गुप्तहेरच होते.
मुल्ला हैदर , सखोजी लोहोकरे ,
कर्माजी , रघुनाथ बल्लाळ कोरडे
आदी मंडळी महाराजांच्या वतीने परराज्यांत वकील म्हणून जात होती. पण तेवढीच हेरागिरीही करताना ती दिसतात. पण आणखीन एक
उदाहरण या शाहिस्तेखान प्रकरणातओझरते दिसते.
लाल महालात असलेल्या छोट्याशा बागेचे काम करणारा माळी महाराजांचा गुप्तहेर असावा. लाल महालांत घडणाऱ्या अनेक घटना अगदी तपशीलाने
महाराजांना समजत होत्या , हे आपल्या सहज लक्षात येते.
शाहिस्तेखानाच्य ा ज्या ज्या सरदारांनी कोकण भागात स्वाऱ्या केल्या , त्या प्रत्येकस्वारीत शिवाजीराजांनी अत्यंतत्वरेने आणि तडफेने त्या स्वाऱ्या पार उधळून लावल्या. हे या मराठी हेरागिरीचेही यश आहे.
अफाट समुदावर तर
हेरागिरी करणं किती अवघड ,
मराठ्यांनी सागरी हेरागिरीही फत्ते केली आहे.

आई....


आई...........!! !

आई म्हणजे देव पृथ्वीवरचा,
आई म्हणजे साठा सुखाचा....
.............आई म्हणजे मैत्रीण गोड,
.............आई म्हणजे मायेची ओढ.....
आई म्हणजे प्रेमाची भाउली,
आई म्हणजे दयेची सावली......
.............आई म्हणजे स्वतः उपाशी राहून,
.............आप ल्याला भरवणारी.......
.............आई म्हणजे जीवाचं रान करून,
.............अप ल्यासाठी राबणारी.......
आई म्हणजे जगण्याचा अर्थ शिकवणारी,
जे कधी ओरडून समजावणारी,
आईच बोट धरून चालायला शिकवणारी,
आईच आपले अस्तित्व घडवणारी.......

मित्रांनो.. २२ मार्च ,

मित्रांनो.. २२ मार्च ,
धर्मासाठी बलीदान करून इतिहासात अमर झालेले धर्मवीर शंभूराजे यांची पुण्यतिथीदिनी महाराष्ट्राचा मानाचामुजरा !
१५ फेब्रुवारी १६८९ या दिवशी औरंगजेबाबरोबर राजांची दृष्टीभेट पेडगावच्या किल्ल्यातझाली. `काफिरांचा राजा सापडला' म्हणून औरंगजेबाने नमाज पढून अल्लाचे आभार मानून अत्यानंद व्यक्‍त केला. त्या वेळी संभाजीराजांना औरंगजेबाचा वजीर इरवलासखान याने शरण येण्याचे आवाहन केले. संतप्‍त संभाजीराजांनी औरंगजेबाला मुजरा करण्यास नकार दिला. तो एकनिर्णायक क्षण होता. महाराजांनी वैयक्‍तिकसुखाच्या अभिलाषेपेक्षा हिंदुत्वाचा अभिमान महत्त्वाचा मानला. आपल्या वडिलांनी निर्माण केलेली स्वाभिमानाची महान परंपरा त्यांनी जपली. यानंतर दोन दिवसांत औरंगजेबाच्या अनेक सरदारांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्‍न केला. त्यांना `मुसलमानझाल्यास जीवदान मिळेल',असे सांगण्यात आले; परंतु स्वाभिमानी संभाजीराजांनी या मुसलमान सरदारांचा सतत अपमान केला.
शेवटी पापी औरंग्याने त्यांचे डोळे फोडले, जीभ छाटली तरीही राजांना मृत्यू स्पर्श करू शकला नाही. दुष्ट मोगल सरदारांनी त्यांना प्रचंड यातना दिल्या. त्यांच्या दिव्य धर्माभिमानाबद्द ल त्यांना हे सारे भोगावेच लागले. १२ मार्च १६८९ या दिवशी गुढीपाडवा होता. हिंदूंच्या सणाच्या दिवशी त्यांचा अपमान करण्यासाठी ११ मार्चच्या फाल्गुन अमावस्येला संभाजीराजांची हत्या करण्यात आली. भाल्याला त्यांचे मस्तक टोचून मोगलांनी त्याची धिंड काढली. अशा प्रकारे १ फेब्रुवारी ते ११ मार्च असे ३९ दिवस यमयातना सहन करून संभाजीराजांनी हिंदुत्वाचे तेज वाढवले. धर्मासाठी बलीदान करणारा हा राजा इतिहासात अमर झाला. औरंगजेब मात्र राजधर्म पायदळी तुडवणारा इतिहासाच्यादरबारातील गुन्हेगार ठरला.
संभाजीराजांच्या या बलीदानामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि पापी औरंग्याबरोबर मराठ्यांचा निर्णायक संघर्ष सुरू झाला. `गवताला भाले फुटले आणिघराघरांचे किल्ले झाले, घराघरातील माता-भगिनी आपल्या मर्दाला राजाच्या हत्येचा सूड घ्यायला सांगू लागल्या', असे त्या काळाचे सार्थ वर्णन आहे. संभाजी महाराजांच्या बलीदानामुळे मराठ्यांचा स्वाभिमानपुन्हा जागा झाला, ही तीनशे वर्षांपूर्वीच्य ा राष्ट्रजीवनातील अतिशय महत्त्वाची बाब ठरली. यामुळे इतिहासाला कलाटणी मिळाली. जनतेच्या पाठिंब्यामुळे मराठ्यांचे सैन्य वाढत गेले आणि सैन्याची संख्या दोन लाखांपर्यंत पोहोचली.

---|| राजमाता जिजाऊ ||---

---|| राजमाता जिजाऊ ||---
---|| राजमाता जिजाऊ साहेबांना मनाचा मुजरा ||--- महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्यामनात आणि आचरणात ज्यानं स्वाभिमान आणि स्वातंत्र् य पेरलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच् या मनात ते स्वाभिमान आणि स्वातंत्र् याच बीज ज्या आईने पेरलं, ती आई म्हणजे जिजाऊसाहेब . त्यांना फक्त शिवबांच्या च नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या आई म्हणाव लागेल, म्हणूनच राष्ट्रमाता आणि राजमाता हे नाव जिजाऊ साहेबांना अगदी शोभते. काहीशतकांनंतर सुद्धाछत्रपतींचे विचार किती सद्य परिस्थितीला साजेशे वाटतात. सामाजिक समता, मानवी हक्क, स्त्रियांचा हक्क, सर्वांसाठी समान न्याय आणि अनेक मानवी मुल्यांचा आदर करणारे विचार, जे छत्रपतींच् या आचरणात होते, आपण म्हणू शकतो या आईनेच त्यांना दिले; त्यासाठीचे वातावरण आणि संस्कार जिजाऊ साहेबांनी शिवरायांनादिले. हा सह्याद्रीचा राजा, सहयाद्री सारखाच कणखर आणि अंगाईसारखा दयाळू व मायाळू या आईच्या पदराखालीच झाला. पुढे छत्रपतींच बाळ, बाळराजे, धर्मवीर संभाजी महाराज ही याच कुशीत आणि संस्कारात वाढले
.
याच आऊसाहेबांची साथ शहाजी राजांना होती, ज्यांनी स्वराज्याच स्वप्न जिजाऊ साहेबांसोब त पाहिलं; जिजाऊनी ते छत्रपतींकडून साकार करून घेतलं.[या वाक्यानं छत्रपती परप्रकाशित होतनाहीत; आणि तो उदेष्य ही नाही. कोणत्याही बाळाच्या यशात त्याच्या आईच्या संस्काराचा सिंहाचा वाटा असतोआणि राजे स्वयंप्रका शित सूर्य होते, ज्याला सदैव तितक्याच तेजाच्या आईचे मार्गदर्शन लाभले
]
स्वाभिमान आणि स्वातंत्र् याची साक्षात भवानी, एका सुर्याइतक् या तेजस्वी आणि सहयाद्री सारख्या कणखर आणि खंबीर असलेल्या युगपुरुषाची माता, धर्मवीर आणि ज्ञानवीर छत्रपती संभाजी राजांची आजी आणि आऊ असलेल्या राष्ट्रमाताराजमाता जिजाऊ साहेबांना मनाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम...जय जिजाऊ..
साभार - आकाश उबाळे पाटील.

खेळ मांडीयेला वाळवंटी..........


खेळ मांडीयेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे|
क्रोध अभिमान गेला पावटणी, एक एका लागतील पायी रे||

गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा|
टाळ मृदुंग घाई पुष्पवर्षाव, अनुपम्य सुखसोहळा रे||

वर्ण अभिमान विसरलीया ती, एक एका लोटांगणी जाती|
निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर फुटती रे||

होतो जयजयकार गर्जतो अंबर, मातले हे वैष्णव वीर रे|
तुका म्हणे सोपी केली पायवाट, उतरावया भवसागर रे||

-संत तुकाराम

मराठ मोळी आई



आपली मराठ मोळी आई म्हणजे एक मजेदार, प्रेमळ, अस रसायन आहे

*आई तुम्हाला दोन वेळां सल्ला देते. एक तुम्हाला हवा असतो त्या वेळी,व तुम्हाला नको असतो त्या वेळी सुध्धा•
*आई हि अशी एकच व्यक्ति आहे, जिला तुमच्या बद्दल, तुम्हाला तुमच्या बद्दल माहित आहे त्या पेक्षा ज्यास्त माहित असत.
*एखाद्या वेळी एखादी गोष्ट जर तुम्हाला नसेल,व आइला तुम्हि ती तिला विचारली अन जरी तिला ति माहीति नसली तरी ति, गोष्ट माहीति असल्यासारखी ठोकुन देते.
*आई जीतकी चांगली तितके मुंले वाया जाण्याच्या संभावना जादा
*अरे पावसांची चिन्हें आहेत रेनकोट घेउन जा अस ती म्हणते, तुम्हि नेहमी पणे,दुर्लक्ष करता, अन मधे कुठेंतरी नेमका तुम्हाला पाउस गाठ्तो.
* तुम्ही एखादी गोष्ट विसरला, तर ति तुमच्या साऱ्या चुकांची तुम्हाला आठ्वण करून देइल ज्यामुळें तुम्ही ति चुक परत करणार नाहीत.
*तुमच्या साऱ्या गोष्टीवर टीका करण्याचा तिला ह्क्क आहे,जरी त्यातली एखादी गोष्ट तुम्ही केली नसली तरी सुध्धा.
*आई च्या जेवणाला नावे ठेवण्याची चुक करु नका[मेल्या बाहेरच शिळ पाक घाण तेलातल मीटक्या मारत खाशील.]
* आई शी कधीच खोट बोलु नका अन जरी प्रयत्न केला तरी निश्चीत पकडलें जाताल•
*जस जस तुमच वय वाढत जात तस तस एखाद्या लहान मुलासारख तुम्हि तिच्याशी वागायला लागता•
*पैशांची कडकी असते, तिला पैसें मागा ति पैसे देइल अन,तुम्ही पैसे कसे उधळता या वर लेक्चरपण देइल•
*तुम्ही कीतिहि चुका करा, ति हजार वेळा तुम्हाला त्याची आठवण करुन देइल, पण मनांत कधीच ठेवणार नाही•
*तुम्ही एखादी गोष्ट केल्यानंतर[आधी नाही], ती आणखी कशी चांगली करता आली असती हे फक्त तिच सांगु शकते.
*तुमची आई कीतिही गरीब कींवा अशीक्षीत असो ति तुमच्या पेक्षा नेहमीच मोठी आसते.
*एखादी गोष्ट तुम्ही केली तर ति आणखी कशी चांगली करता येइल ते ती तुम्हाला सांगेल ,पण जर तीनें केली अन जर तुम्ही सांगायला गेला तर ती म्हणेंल, मग तुच का नाही करत.
*तुम्ही कितिही चांगला विनोद केला तरी तिला तो विनोद नेहमीच वाह्यात वाटतो.
*आइ काम संपवुन जरा बसली कि मुलाला भुक लागते.
*तुम्हि मोठ होउन नांव काढाव इतकच तिला वाटत असत. 
                                                               लेखक - अज्ञात

एकाकी - एका बापाची कथा


नवे फूल संसारवेलीस आले, मिळाली जशी बातमी, धावला
सुखाला न काहीच सीमा अता बाप वेडावला फक्त वेडावला
तिथे वेगळे दुःख आहे नशीबी जरा कल्पनाही मनाला नसे
नवे फूल देऊन गेली लता, वृक्ष संसाररूपी न फोफावला

अता बाळ आईविना राहिला, त्यास सांभाळले पाहिजे हे खरे
कसे का असेना मुलाला तरी वाढवायास आता हवे हे खरे
'तिचे रूप मानू मुलाला अता' बाप बोले स्वतः शी, धरे धीरही
कसेही असो दैव, मानून ते माणसाने पुढे जायचे हे खरे

घरी बाळ आला, तशी सांत्वनाला किती माणसे लोटली त्या घरी
मुठी चोखता बाळ पाहून घे विस्मयाने घराला कितीदा तरी
रडू येतसे भूक लागेल तेव्हा, नसे त्यास आई, बिचाराच तो
जरी बाप होता, तरी माय ती माय, तृष्णा न भागेल पाण्यावरी

कधी दूध पाजा नि आंघोळ घाला, कधी झोपवा आणि जागे रहा
कशाने रडे, तो न झोपे कशाने, कसे खेळवावे मुलाला पहा
कितीही जरी लोक आले "बघू का" म्हणायास, काही क्षणांचेच ते
असा काळ काढून बाळास आता पुरे होत आलेत महिने सहा

लळा लागला त्यास, बापास त्याचा, अता सर्व मार्गावरी लागले
अता बाप कामासही जात होता, कुणी ना कुणी बाळ सांभाळले
जरा काळ आणीक गेला, अता बाळ बोलायला लागला बोबडे
तरी शब्द पहिलाच 'आई' निघाला, नि ऐकून ते बापही गलबले

अता खेळणी, गोष्ट काऊचिऊची, सुरू जाहली जेवताना मजा
धरा रे, पळा रे, करा गाइ आता, किती यायची खेळताना मजा
कुशीतून बापास तो बोबडे बोल ऐकावयाचा नि झोपायचा
मजा झोपताना, मजा जागताना, मजा सर्व ते पाहताना मजा

हळू काळ गेला जरासा पुढे, चार वर्षे पुरी होत आली अता
अता घातले त्यास शाळेत, इच्छा पित्याची फलद्रूप झाली अता
डब्याला बिचारा स्वतः लाटुनी बाप पोळ्या असे देत बाळास त्या
तसा रोजचाही स्वयंपाक शिकला, घराचा असे तोच वाली अता

कधीही न रागावला बाप पोरावरी, एकदाही न फटका दिला
बघे चित्र तो बायकोचे, रडे आणि सांगे कहाण्या मुलाच्या तिला
वही, पुस्तके, दप्तरे, खेळणी, सर्व संस्कार, अभ्यास चालू असे
कसासा तिच्यावीण तो काळ त्याने स्वतः एकट्याने असा काढिला

"कधीही न नेलेत हॉटेलमध्ये, कधीही न मी चित्रपट पाहिला
कधीही न मी बागही पाहिली, सर्कशीचा तसा योगही राहिला"
"तसा फार पैसा नसे" बोलला बाप "माझ्याकडे बाळ, सांगू कसे?"
बिछान्यात रात्री बिचारा रडे एकटा बाप, अश्रू छुपा वाहिला

उधारी करोनी पुरे लाड केले, कशीशी उधारी पुरी फेडली
स्वतःची दिली चार पैश्यात आणी मुलाला नवी सायकल घेतली
जरा ताप आला मुलाला कधी की पुरी रात्र जागायचा बाप तो
स्वतःची कधी प्रकृती पाहिली ना जरा तापता पाठही टेकली

सफारी मुलाला हवा याचसाठी दिली ट्रंक भगारवाल्यासही
सहल-वर्गणीला करे काम जास्ती पुन्हा येउनी सर्व स्वैपाकही
दहाव्वीस आले बरे गूण आता पुढे शिक्षणाला किती खर्च तो
करे नोकऱ्या तीन, कर्जे करोनी प्रवेशास दे देणगी बापही

कधी ऐकले, पोरगा बोलला वाक्य मित्रांपुढे एक खुश्शालसा
"कसे यायचे आज पार्टीस मी बाप माझा असे यार कंगालसा"
तसे वाक्य ऐकून, वाईट वाटून, पाणावली लोचनेही जरी
स्वतः औषधे टाळुनी देत पैसे मुलाला म्हणे 'जाच खुश्शालसा"

जशी लागली नोकरी त्या मुलाला सुखावून गेला तसा बाप तो
उभा राहिला आपला बाळ आता, जरा आपलाही घटे व्याप तो
म्हणे पोरगा एक मैत्रीण आहे, तिच्याशी अता लग्न लावून द्या
मनाशी म्हणे बाप, हा काय आनंद आहे, मनाला पुऱ्या व्यापतो

जसे लग्न झाले, घराला जराशी कळा चांगली यायला लागली
नवी सून होती किती लाघवी, बाप मानायचा पोरगी आपली
घराला तिने सजविले, सर्व कामे बघू लागली एकट्यानेच ती
मुलाला उरे स्वर्ग बोटांवरी पाहुनी लाडकी बायको आपली

तशातच घरी पत्र आले मुलाला, नव्या नोकरीचे, मनासारख्या
पगारात होती किती शुन्य जाणे, सुवीधा न त्या मोजण्यासारख्या
म्हणे पर्वणी जाहली, बाप बोले, समाधान ती सूनही पावली
पुढे बाळ बोले अशी पाहिजे, नोकऱ्या त्या नको 'भारतासारख्या'

कळेनाच बापास की काय बोलून गेला असे पोरगा आपला
जराश्यात ते स्पष्ट झाले नसे नोकरी येथली, बाप खंतावला
"नको रे मुला, का कशाला उगी जायचे त्या तिथे, काय आहे तिथे?"
परंतू सुनेने मुलाचीच बाजू जशी घेतली, तो म्हणू लागला

"मुलांनो, अरे मी कसे यायचे त्यातिथे, जन्म माझा असे येथला"
मुलाने शिसे ओतले, कान जाळून तो शब्द बापाकडे पोचला
"तुम्हाला कुठे यायचे त्यातिथे, त्यातिथे फक्त आम्हीच जाणार हो"
असे वाक्य ऐकून, आधार शोधायला लागला, बाप तो मोडला

रडू थांबता आज थांबेचना, बाप बोले "नकारे, नका जाउ की"
"कसेही असो आज उत्पन्न, आपण सुखाने घरी आपल्या राहु की"
म्हणे पोरगा "अल्पसंतुष्टता हीच तुमची सदा भोवली आजवर"
तरीही बिचारा म्हणे बाप "जाऊ नका रे, कुठेही नका जाउ की"

"अरे एकट्याने कसे मी जगावे, मला सांग तुमच्यामुळे मी जगे"
"न आई तुझी राहिली, सांग पोरा, कसे एकट्याने जगावे म्हणे? "
मुलाला, सुनेला न काहीच होते, निघालेच ते दूरदेशाकडे
पुरी तीन वर्षे अता जाहली, बाप आता इथे एकट्याने जगे

कधी जाग येते, जणू बाळ रडले, असे वाटते, तो रडू लागतो
कधी घास काऊचिऊचा न चाले, असे वाटते, तो रडू लागतो
कधी सर्कशीला न पैसेच उरले, असे वाटते, तो रडू लागतो
कधी सायकल घेतली, छान झाले, असे वाटते, तो रडू लागतो

कधी घेतलेल्या सफारीत चाले, असे वाटते, तो रडू लागतो
कधी देणगीचे पुरे कर्ज झाले, असे वाटते, तो रडू लागतो
कधी एक पार्टीस पैसे पुरवले, असे वाटते, तो रडू लागतो
कधी वाटते मूल झालेच नाही, असे वाटता तो रडू लागतो

अता प्रकृती साथ देते कुठे, आज कोणीच नाही बिचाऱ्यास त्या
पुरा जन्म वायाच गेल्यापरी भावना व्यापणारी बिचाऱ्यास त्या
कधीही नका यार आधार काढू पित्याचा कुणी, एवढेसे करा
कथा आठवा एवढी, द्या समाधान, आणीक शांती बिचाऱ्यास त्या

                                                                                     आभार -मुन्ना बागुल

उखाणे..


उखाणे... थोडी गंमत!
                                                                            - अनुराधा गांगल

दिवाळी संपल्यावर लग्नाचा सीझन सुरू झालाय. या वर्षी मार्गशीर्षात सगळ्यांची घाई उडालीय. कारण पौषात लग्नं करायची नाहीत. पौष संपला, की सीझन सुरू होतो परीक्षांचा आणि यंदा मे महिन्यात चांगले मुहूर्तच नाहीत... म्हणूनच सध्या लग्नांची धूम आहे आणि त्याचमुळे उखाणे घेण्याचीही...

साठ-सत्तर वर्षांपूर्वीचा काळ. मुलीचं लग्न ठरलं, की घरात अनेक प्रकारांची "गडबड' सुरू होई. आई, आजी मुलीला येता-जाता उपदेशाचे डोस पाजत. असे वागावे, तसे वागावे, असे सांगत असताना घरातील आजी तिला हळूच कानात दोन उखाणेही सांगत असे... मुलगी लाजतच ते ऐके आणि स्वत:च्याही नकळत पाठ करी...
आताच्या मुली उखाणा घ्यायला सांगितला, तर अरुण, विनय, सुमन, शंतनू, मंदार असं पटकन नाव घेऊन मोकळ्या होतात.

उखाणा घेणं, उखाण्यात नवरोजीचं नाव घेणं, ते घेत असताना लाजून मान खाली जाणं... अगदी पूर्वीचं झालं हे; पण या सर्व गोष्टी अगदी नव्या-नव्या लग्न झालेल्या "नवथर' मुलीलाच छान शोभून दिसत. (म्हणजे अजूनही दिसतील खरं तर; पण...) उखाणा घे, असं सांगताच नवी नवरी शालू सावरत उठे, उभी राही, इकडे-तिकडे बारीकसा कटाक्ष टाके... नवरोजी ऐकायला आहेत का? हेही त्या कटाक्षात तिला कळे. मग आढेवेढे घेत, आवंढे गिळत "घेते हं' असं म्हणत हळुवारपणे एखादा उखाणा तिच्या तोंडून बाहेर पडे...
मंगळागौरीच्या खेळात सगळीच धम्माल गंमत. अजूनही मंगळागौरीला मात्र उखाण्याच्या कार्यक्रमात एखादी आजी पटकन उखाणा घेते...

"आम्हा एकट्या बायकांचा कोण बरं वाली?
हे गेले वर, मी बसले खाली!'
किंवा एखादी लग्न न झालेली मुलगी म्हणते,
"समोरच्या कोनाड्यात ठेवलेत गहू
लग्न नाही झाले तर नाव कोणाचे घेऊ?'

उत्तम वाचन, उत्तम गुणग्राहकता, उत्तम रचना, उत्तम साहित्यिक गुण, उत्तम काव्यगुण उखाण्यांमधून दिसून येतात. "उखाणा' रचणं हेही "क्रिएटिव्ह' काम आहे. काही "उखाणे' बघा बरं...

कोकिळेच्या कुजनात वसंत ऋतू गेला झटकन
...चे नाव पाहा घेतले, की नाही पटकन

आकाशाच्या निलिम्यावर इंद्रधनुष्याचा पट्टा
...चे नाव घेते पुरे करा बाई थट्टा

वर्षा ऋतूत आकाशात लकाकतात विजा
...च्यासह केली श्री सत्यनारायणाची पूजा

पृथ्वीवर पसरते, कधी पूनव कधी आवस
...चे नाव घेते हळदीकुंकवाचा (डोहाळजेवणाचा, पूजेचा, कशाचाही) आहे दिवस

लतिकांनी भरले हिरव्या पानांचे चुडे
...चे नाव घेते मंगळागौरीपुढे

फुलांची भरली वाडी, सजवला मला साज
...चे नाव घेते डोहाळजेवण (किंवा काहीही) आहे आज

चंदेरी चांदण्यात पडली वसुंधरेला भूल
...सह मला लागली भावी बाळाची चाहूल

सायंकाळी तुळशीपाशी, मंद ज्योत तेवते
बारशाचा दिवस म्हणून ...चे नाव घेते

आशीवार्दाची फुले वेचते वाकून
...चे नाव घेते तुमचा मान राखून

चंदनाच्या झाडाला सुवासाचा वेढा
... आणि मी दोघांचा भाग्यशाली जोडा

समुद्राला आली भरती, नदीला आला पूर
...करता माहेर केले मी दूर

अरबी समुद्रात उसळल्या लाटा
...च्या सुख-दुःखात माझाही वाटा

अशोकवनात कोकिळा गाते
...चे नाव ... घेते

द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
...चे नाव घेते ऐका देऊन कान
वृक्षाच्या छायेत, वनदेवी घेते विसावा
...चे नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा

गीतात जसा भाव, फुलांत जसा सुगंध
...च्या जीवनात मला भरभरून आनंद

साधी राहणी, उच्च विचारसरणी
याच तत्त्वाने वागेल ...ची गृहिणी

भरल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची
पंगत बसली ...रावांच्या मित्रांची

चांदीच्या करंड्याला नक्षीदार झाकण
...रावांचं नाव घेऊन सोडते कंकण

शुभ काळी शुभ वेळी आली आमची वरात
...रावांचे नाव घेते सासरच्या घरात

पानापानावर पसरले कोवळे कोवळे ऊन
...रावांचं नाव घेते ...ची सून

वर्तन असावे नम्र, शब्द असावा गोड
...रावांच्या संसाराला माझी आनंदी जोड

राजहंस पक्षी मोतीचारा भक्षी
...रावांचं नाव घेते तुम्ही सर्व साक्षी

मंगल झाली प्रभात, विहंग उडाले गात
...रावांच्या हाती दिला हात
करायला जन्मोजन्मीची साथ

नमस्कार फुकाचा, आशीर्वाद लाखाचा
...रावांसह संसार करेन तुमच्या आशीर्वादाने सुखाचा

वृंदावनात घुमला, श्रीकृष्णाचा पावा
साऱ्या हौशी पुरवायला ...सारखा पती हवा

चंद्राचं प्रतिबिंब, पडलं तळ्यात
...रावांचं नाव घेते मैत्रिणींच्या मेळ्यात

परस्परांचे झालो सोबती, सुख-दुःखाचे भागीदार
.... झालो जन्मोजन्मीचे जोडीदार

हिरकणी बुरूज अमर झाला मातेच्या प्रेमाने
...रावांचे नाव घेते प्रेमाने अन्‌ आदराने

श्रीकृष्ण अन्‌ रामाच्या सर्वत्र आहेत मूर्ती
...रावांची पसरो जगभर कीर्ती

अशोकवनात कोकिळा गाते
...रावांचे नाव ...घेते

हे आहेत काही सोपे, सुटसुटीत, छान, पटकन घेता येण्यासारखे उखाणे. हे सर्व उखाणे खास नववधूंसाठीच आहेत. पूर्वी काही स्त्रिया अगदी मोठमोठ्या कवनात, मोठमोठ्या ओव्या रचून, त्यात "रावांचं' नाव गुंफून उखाणा घेत असत; परंतु आता अनेक गोष्टींत बदल घडून येत आहे, तो आपण बघतच आहोत.

"स्त्री'चं शिक्षण, तिचं करिअर, तिचा अभ्यास, तिचं घर, तिचा पती अन्‌ मुलं यात तिला घरी आणि दारी भरपूर वेळ द्यावा लागतो. या सर्वांमध्ये ती पार गुरफटून गेली आहे. तरीसुद्धा रोजच्या त्याच त्या गर्तेतून, मुला-बाळांमधून, सासू-सासऱ्यांमधून, पतीच्या "अगं, अगं'पणातून तिच्या खास करमणुकीसाठी किंवा तिच्या विरंगुळ्यापोटी ती आसपासच्या गृहिणींत किंवा मैत्रिणींमध्ये असा वेळ देतच असते अन्‌ म्हणूनच खास हे सुटसुटीत तिच्यासाठीचे छोटे छोटे उखाणे.

पन्नास वर्षांपूर्वी मुली आपल्या यजमानांना "अहो' हाक मारीत; पण आताच्या करिअरवाल्या, नोकरी करणाऱ्या, पद भूषविणाऱ्या मुली आपल्या "नवरोबांना' अरे-तुरे म्हणतात. या अशा आधुनिक सहचर अन्‌ सहचारिणींसाठी हे काही "उखाणे'. बघा तर!

नमस्कार करता येतो मला, छान वाकून
...चं नाव घेते तुमचा मान राखून

शंकराला वाहिलं बेलाचं पान
...चं नाव घेते हं, ऐका देऊन कान

गुलाबाच्या फुलांचा येतो मंद सुगंध
...बरोबर राहताना मला होईल आनंद

गोकुळातील मेळाव्यात श्रीकृष्ण वाजवतो पावा
...सारखा जोडीदार मला जन्मोजन्मी हवा

आहे चैत्र-वैशाख महिना, सुरात कोकिळा गाते
...चं नाव ... घेते

रामाची सीतामाई झाली होती लुप्त
... अन्‌ मी राहू नेहमी तृप्त

रजिस्टर केलं लग्न, नाही चौघडा-सनई
... आता खाऊ या, मस्त मेवा मिठाई

पोळी-भाजी नको, नको वरण-भात
..., पाव-भाजी खात, करू या छान बात

नवरोजी म्हणतात -

...भोवती आहे सतत मैत्रिणींचा घोळका
पैठणी का शालू दिलाय ते सर्वांनी ओळखा

नका करू आरडाओरड तुम्ही सर्व जणी
... आहे माझी खरंच पट्टराणी

मोठ्यांसमोर सर्वच गोष्टींत मी झालो पास
....ला देतो गुलाबजामचा घास

कॉम्प्युटर-मोबाईलचा उपयोग झाला छान
... आता प्रत्यक्ष गप्पा मार, ऐकते देऊन कान 
                                                        आभार - मराठी कविता.co

छोटीशी पण मध्यम वर्गीय प्रियकराची गोड प्रेम कहाणी,

 छोटीशी पण मध्यम वर्गीय प्रियकराची गोड प्रेम कहाणी,
 प्रियकर :- हा बघ मी नवीन मोबाईल घेतला .....
प्रेयसी :- सहीच, मोठ्ठी पार्टी पाहिजे ..... :-))
( संध्याकाळी प्रियकर तिला ताज हॉटेल मध्ये घेऊन जातो व बोलल्याप्रमाणे मोठ्ठी पार्टी देतो , तेव्हा पार्टी नंतर ........ )
प्रेयसी :- तू एवढे पैसे कसे म्यानेज केलेस ??? प्रियकर :- माझा मोबाईल विकला ..
यालाच म्हणतात निस्वार्थी प्रेम 

किती कठीण असतं


किती कठीण असतं
वाट्याला आलेलं आयुष्य मनापासून जगणं,
हवा तो आकार देणं. .

किती कठीण असतं
हवं तिथं पोहोचणं,
उघड्या डोळ्यांनी स्वप्नं पाहणं..

किती कठीण असतं आपली वाट निवडणं,
कडवटपणा गिळून सारा गोडवा टिकवून ठेवणं..

किती कठीण असतं नको त्या माणसांत मिसळणं,
आणि हव्या त्या माणसापासून दूर जाणं...........!

एकटी


एकटी

हि कथा आहे निकिता आणि संजयची.....आज सात वर्षांनी निकिताच्या चेहऱ्यावर आनंदओसंडून वाहत होता. किती दिवसाची प्रतीक्षा आज संपल्यासारखी तिला वाटत होती.
आधी:
तीच संजयवर एकतर्फी प्रेम होत ते क्लासमध्ये नववीत असल्यापासून, तिला तो खूप आवडायचा पण तिने कधीच त्याला ते सांगायची हिम्मत केली नव्हती. तो तिला फक्त क्लासच्या वेळेतच समोर दिसायचा. तिला बाकी काहीच माहिती नव्हती त्याच्याबद्दल. आणि स्वभावाने खूप लाजाळू असल्यामुळे तिने त्याच्या बद्दल कधी तिच्या मैत्रिणींकडे सुद्धा विषय काढला नाही. पण तिने शेवटी ठरवले कि क्लासच्या शेवटच्या दिवशी त्याला सांगायचं कि माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू मला आवडतोस. पण नियतीच्या मनात काही वेगळ होत. क्लासचा शेवटचा दिवस होता २५ मार्च पण त्या आधीच एक आठवडा संजयचा अपघात झाला आणि तो त्या अपघातामुळे ती शेवटची परीक्षा पण देवू शकला नाही. त्यामुळेच त्याच क्लासला येनच काय घरातून बाहेर पडण पण बंद झाल. तिने खूप प्रयत्न केला त्याला contact करण्याचा पत्ता शोधून ती त्याला भेटायला त्याच्या घरीपण गेली. पण आता तिला ते विचारण शक्यच नव्हत.
तिने विचार केला कि हा यातून पूर्ण बारा झाला कि नक्की विचारू. पण त्याच वर्षी संजय ते शहर सोडून दुसरीकडे शिफ्ट झाला. आणि निकिताच्या सर्व अशा-आकांशधुळीत मिळाल्या. ती खूप रडली जमेल तितका प्रयत्न केला त्याचा ठावठिकाणा शोधण्याचा. पण एकाही मैत्रिणीला तिने हे न सांगितल्यामुळे तिला कुणाची मदत पण नाही मिळाली. आता त्या गोष्टीला सात वर्षझाली होती अजूनही तिने मनातून संजयलाच आपला life partner म्हणून निवडलं होत. तिने Facebook वर account बनवल होत. तिला मैत्रिणींकडून कळाल होत कि आपले सर्व शाळेतले मित्र-मैत्रिणी facebook वर आहेत. म्हणून तिनेही सर्च केल आणितिला आज संजयचं profile दिसल.तिने त्याला request पाठवली. आणि बरोबर message करून आपली ओळख करून दिली. त्याच दिवशी संजयने requestaccept केली. तिने संजय कडे त्याचा नंबर मागितला होता तो त्याने तिला दिला. मग तिने त्याला कॉल करून खूप गप्पा मारल्या क्लास मधल्या गमती जमतींच्या. आणितिने संजयला भेटायला बोलावल संजयने तिला सांगितल कि तो आज खूप buzy आहे तर आपण उद्या भेटू.
भेटीचा दिवस
"मी तुला ओळखलंच नाही कशी दिसायचीस तू क्लासमध्ये असताना आणि आता totally different "
"हो रे थोडा बदल झालाय खरा, पण तू मात्र अजूनही तसाच दिसतोयस, कस चाललाय?"
"माझ एकदम मजेत, अजून कोणी आहे का तुझ्या contact मध्येक्लास मधले"
"हो रे त्या क्लास मधल्या सर्व मैत्रिणी आहेत संपर्कात. पण तू तर अचानक गायब झालास"
"हो ग नवीन घर घेतल होत आणि आम्ही शिफ्ट होणारच होतो त्यावर्षी...so झालो एकदम अचानक"
"लग्न कधी करतेयस? का झालपण?"
"नाही रे अजून नाही......कुणाच ीतरी वाट बघतेय म्हणून अजूनथांबलेय लग्नासाठी....पण आता विचार सुरु आहे बघू कदाचित लवकरच.....ये पण तुझ झाल का लग्न?"
"मागच्याच वर्षी झाल 'LOVE MARRIGE ' जरा लवकरच झाल पण जो होता हैं वो अच्हे के लिये होता हैं.......अस विचार केला आणि केल लग्न"
बस त्यानंतर निकिता फक्त रडायची बाकी होती.....तिने कसातरी पटापट तिथून निघण्याचा प्रयत्न केला....संजयला पण थोड विचित्र वाटल पण त्यालाही घाई असल्यामुळे तोही निरोप घेवून तिथून निघाला. त्यानंतर अक्खी रात्र तिने रडून रडून घालवली. आता हाच मोठा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला ज्या प्रेमाची सात वर्ष वाट बघितली त्याचाअंत अस सात मिनिटात का झाला?
           आभार - मी मराठी असल्याचा अभिमान आहे

श्रीमंत आई-बापाची पोरगी....... .......


श्रीमंत आई-बापाची पोरगी.......
.......
खर सांगू देवा,
एक इच्छा माझी पूर्ण कर.
ह्या जन्मी नाही जमल पण
पण पुढच्या जन्मी तरी मला,
श्रीमंत आई-बापाची पोरगी कर.
.
कारण आज-काल लग्नाच्या बाजारात,
पोरीच्या गुणापेक्षा,
आई-बापाच्या पैश्याला जास्त महत्व
आहे.
कितीही काही झाले तरी पोरगी मात्र
तोला-मोलाच्या घरातली हवी,
हे प्रत्येक वर पित्याचे तत्व आहे.
मग तूच सांग बर देवा आता,
गरीबाच्या पोरींचं काय बर होणार..?
आमची पण काही स्वप्न आहे कशी बर
ती पूर्ण होणार..?
.
काय गुन्हा देवा माझा गरीबाच्या घरी
जन्माला आले.
आई-बापाचे कष्ट वाटून घेतले,
घरासाठी राब राब राबले.
लोकाची काम करून शिक्षण माझे पूर्ण
केले.
गरीबीचे टाके शिवता शिवता,
चार चौघीनसारखे स्वताला बनवले.
स्वताच्या पायावर स्वत उभी राहिले.
पण तरी सुद्धा घर
आणि नोकरी दोनीहि नीट सांभाळत
राहिले.

आई
बापाच्या संस्काराला पुन्हा पुन्हा जपत
राहिले.
संस्कृतीच्या वरस्याला पुन्हा पुन्हा
जोपासत राहिले.
पण
तरी सुद्धा ह्या लोकांना
मी तोला-मोलाची कधी वाटलीच नाही.
कारण श्रीमंत आई
बापाच्या पोटी मी जन्मलीच नाही.
.
म्हणून सांगते देवा आता तरी मागण माझ
पूर्ण कर,
ह्या जन्मी नाही जमल पण
पण पुढच्या जन्मी तरी मला,
श्रीमंत आई-बापाची पोरगी कर

प्रत्येकाच्या जीवनात.....


प्रत्येकाच्या जीवनात प्रेमाच वादळ येत असतं.
कोणी भरकटत असतं
तर कोणी टिकत असतं.
कोणी व्यक्त करत असतं
तर कोणी लपवत.
प्रेम लपत नसतं तसच दिसतही नसतं,
असं हे प्रेम असतं.........

आत्ताच येताना एक माणूस भेटला.........


आत्ताच येताना एक माणूस भेटला. अगदी साधा, सडपातळ, जेमतेम उंची, गरीब दिसत होता, हातात सायकल होती. मला म्हणाला.....
"अवो इथ पिझ्झा कुठ मिळतो".....
त्याच्या त्या'अवो'ने मी जरासा गोंधळूनच म्हणालो
"हा इथून खाली".

त्याचा आवाज अगदीच घाबरा आणि कोमेजलेला होता, तो बोलतानाही अंग चोरून उभा होता.

तो तेथून सायकल हातात धरून चालतच निघाला.त्याच्या कडे पाहून त्याला पिझ्झा खायची इच्छा झाली असेल असं कोणीच म्हणणार नाही आणि झाली तरी त्याच्या खिशाला ती परवडणारी नव्हतीच. म्हणजे घरात पोरगा रडत असणार, पिझ्झाच हवा म्हणत असणार,...

खूप वाईट वाटलं. त्याचा तो दीनवाणा चेहरा डोळ्यासमोरून जातच नव्हता. सगळं डोळ्यापुढे येत होतं--'हा डॉमिनोज मध्ये जाणार, सगळे त्याला हसणार, तो कसाबसा मुलासाठी तो अपमान सहन करून पिझ्झा मागणार . तेवढे पैसे जवळ असतील तर ठीक नाहीतर मुलाचा रडका चेहरा आठवत तसाच बाहेर पडणार....

मित्रांनो आपले आई बापही असेच आपले हट्ट पुरवत असतील, कदाचित आपल्याला ते माहीतही नसेल, आई वडील असे एकमेव असतात ज्यांचा प्रेम आपल्या जन्मापासून मरणापर्यंत कधीही बदलत नाही. बाकी सगळ्यांचं प्रेम वेळेनुसार बदलू शकतं.....विचार करून पहा हवं तर..

                                                 (मूळ विचारवंताचे आभार ) 

किती क्षणाचं आयुष्य असतं...


किती क्षणाचं आयुष्य असतं.......
आज असतं तर उद्या नसतं...........
म्हणूनच ते हसत हसत जगायचं असतं............
कारण इथं कुणी कुणाच नसतं........
जाणारे दिवस जात असतात....
येणारे दिवस येतच असतात.................
जाणा-यांना जपायचं असतं....... ♥.......
येणा-यांना घडवायचं असत ............
आणि जीवनाच गणित सोडवायचं असतं...!!!!!!!!!

किती कठीण असतं


किती कठीण असतं
वाट्याला आलेलं आयुष्य मनापासून जगणं,
हवा तो आकार देणं. .

किती कठीण असतं
हवं तिथं पोहोचणं,
उघड्या डोळ्यांनी स्वप्नं पाहणं..

किती कठीण असतं आपली वाट निवडणं,
कडवटपणा गिळून सारा गोडवा टिकवून ठेवणं..

किती कठीण असतं नको त्या माणसांत मिसळणं,
आणि हव्या त्या माणसापासून दूर जाणं.!♥♥

"या जगात


"या जगात रोज जन्मुन मरणा-या असंख्य किटकांप्रमाणे जीवन जगण्यासाठी माझा जन्म नाही.
माझ्या कोकणच्या भुमीच्या माझ्याकडुन काही अपेक्षा आहेत
आणि
त्या पुर्ण करुन तिचे ऋण फेडण्यासाठी मी सदैव तत्पर राहिन...

कोणताच देश परिपुर्ण असु शकत नाही,
त्याला परिपुर्ण बनवाव लागत...

कोणताही सामान्य माणुस तोपर्यँत सामान्यच राहतो जोपर्यँत तो स्वतःला कमजोर समजत असतो.
जेव्हा आपल पुर्ण कर्तुत्व पणाला लावुन तो जगात उतरतो तेव्हा कोणतीच ताकद त्याला असामान्य बनण्यापासुन रोखु शकत नाही.

हिटलरला मी देव मानतो कारण फुटपाथवर राहणारा एक सामान्य पोरगा देशभक्तीने पेटुन उठला आणि आपल्या कर्तुत्वावर जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष बनुन असामान्य झाला.
हिटलरने आपली ताकद ओळखली होती.
आज आपणा सर्वाँना ती ओळखायची गरज आहे कारण त्यातच आपल्या देशाच भविष्य लपलय.

आपण निवडुन दिलेले नेते आपले नोकर आहेत आणि जनता मालक असल्याने त्यांच्याकडुन काम करुन घेण आपल कर्तव्य बनत आणि ते कुठे चुकत असतील तर त्यावर टिका करण हा आपला मुलभुत अधिकार आहे.

मेँढरांप्रमाणे किँवा डोळ्यांवर झापड लावुन धावणा-या घोड्यांप्रमाणे आपले वर्तन असता कामा नये.
देशाकडे डोळसपणे पहायला शिका.
इतिहासाचा अभ्यास महत्वाचा आहे कारण त्यामुळेच प्रगतीची दिशा ठरवता येते.
काँग्रेसचे लोक आपल्या राजकरणासाठी गांधीना "महात्मा" बनवतात आणि आपण मुर्ख बनतो ही व्रुत्ती कुठेतरी थांबवा.

मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही कारण सगळेच पक्ष स्वार्थी आणि भ्रष्ट आहेत.

"कोकण" माझ पहिल प्रेम आहे.
काही राजकरणी लोक स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी मायनिँग करुन तसेच जैतापुर सारख्या प्रदुषणकारी प्रकल्पाला पाठिँबा देत कोकणच्या हिरव्यागार निसर्गाचा सत्यानाश करण्याच्या तयारीत आहेत.
कोकणला त्यांच्या तावडीतुन वाचवण्यासाठी मी कोणत्याही थराला जायला तयार आहे मग भले त्यात माझ्या जीवाचं बरं-वाईट झाल तरी मला पर्वा नाही कारण माझ्या जन्मभुमीवर मी जिवापाड प्रेम करतो.
भगतसिँगांसारख्या क्रांतिकारकांनी देशासाठी हसत हसत फाशी स्वीकारली मग मी तरी जीवाच्या भितीने या राजकरण्यांच्या अत्याचारांना का म्हणुन भिक घालु...???

आता आमच्या सहनशक्तीचा अंत होऊ लागलाय.
मायनिँग आणि जैतापुर प्रकल्प वेळीच थांबवला गेला नाही तर सिँधुदुर्गातुन "दुसरा हिटलर" तयार होईल एवढ निश्चित...!!!

"I'm a LOVER,
Not a FIGHTER...
But I fight for,
What I love...!!!"
                                  आभार - मंजिरी गवांदे

एका भाकरीची किंमत.........


एका भाकरीची किंमत
1980 पूर्वी मी अनुभवलेला हा प्रसंग. त्या वेळी मी तापोळे (महाबळेश्‍वर) भागात शिक्षण विस्तार अधिकारी या पदावर कार्यरत होतो. उपशिक्षणाधिकारी यांच्यासमवेत बामणोली भागातही शाळातपासणीसाठी जावे लागत असे.

एकदा उपशिक्षणाधिकारी यांच्याबरोबर तापोळ्याहून लॉंचने वाघावळे या गावी गेलो. कांदाटी नदीतून प्रवास. दोन्ही बाजूला उत्तुंग डोंगरांच्या रांगा. गर्द हिरवाई. दोन्ही बाजूंना घनदाट जंगल. सर्वत्र पसरलेला नयनरम्य निसर्गाचा आनंद मिळत होता. आक्राळ-विक्राळ डोंगररांगा पाहून छातीत धडधड चालू होती.

जावळीचे चंद्रराव मोरे यांच्यामुळे वाघावळे गाव प्रसिद्ध आहे. शेजारी उचाट या गावी चंद्रराव मोरे यांचा राजवाडा आहे. त्याचे अवशेष पाहावयास मिळतात. कांदाट नदीवरून नाव पडलेले कांदाट गाव जवळच आहे. एकूण प्रदेश अतिदुर्गम अन्‌ हिरवागर्द. पूर्वी वाघांची वर्दळ या भागात होती, यावरून या गावास वाघावळे हे नाव पडले.

वाघावळे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग गोपाळराव मोरे हे अगत्यशील व्यक्तिमत्त्व. विनयता आणि शालीनता हे त्यांचे व्यक्तिमत्त्वाचे पैलू आहेत. आलेल्यांचे आगत-स्वागत उत्तम प्रकारे करीत. वाघावळे येथे वसतिगृहयुक्त सातवीपर्यंत शाळा आहे.

आम्ही तपासणीसाठी गेलो ते दिवस थंडीचे होते. नदीजवळ असल्यामुळे अधिकच गारवा लागत होता. माझी सोय वसतिगृहाच्या स्वयंपाकघरात केली. रात्री जेवणानंतर पाणी प्यायल्याने हुडहुडी भरली. माझ्या सोबतीला एक शिक्षक होते. आम्ही स्वयंपाकघरातील चूल सतत पेटत ठेवली. लाकडे टाकत राहिलो. त्यामुळे अंगात ऊब येत होती. आम्ही शेकत-शेकत गप्पा मारीत होतो. खूप वेळ गेला. आता झोप येऊ लागली. आम्ही तेथेच आडवे झालो.
दुसऱ्या दिवशी मला तापोळ्याला परत जायचे होते. साहेबांना तसे सांगून ठेवले होते. सकाळी 10 वाजता लॉंच होती. मी आवराआवर केली. पिशवी घेऊन मी निघालो, तोच माझ्यासोबतच्या शिक्षकांनी तिळाची चटणी आत भरलेली नाचणीची एक दुमडलेली भाकरी माझ्या पिशवीत घातली. ते म्हणाले "असू द्या, असू द्या; प्रवासात उपयोगी पडेल.'' पिशवी घेऊन बरोबर 10 वाजता नदीवर गेलो. लॉंच आली नव्हती. वाट बघत बसून राहिलो. माझ्याबरोबर तापोळ्यास जाण्यास फक्त एकच प्रवासी होता. झरेकर मामा. आम्ही दोघे लॉंचची वाट पाहत होतो. खूप वेळ गेला. लॉंच येण्याची लक्षणे दिसत नव्हती. दुपारचा एक वाजला. झरेकर मामांनी शिदोरी आणली होती. त्यांनी ती दह्याबरोबर खाल्ली. मला माझ्या पिशवीतील भाकरीची आठवण झाली. मी पिशवीतून भाकरी काढली. केवढे अप्रूप वाटले. मनातून शिक्षकाचे आभार मानले. नाचणीची भाकरी व तिळाची चटणी खाऊन नदीचे पाणी प्यालो. खूप तरतरी आली. मी निवांत झाडाखाली लॉंचची वाट पाहत राहिलो.

सकाळच्या लॉंचचा पंखा तुटल्यामुळे ती आली नाही. दुपारी 4 वाजता लॉंचची दुसरी फेरी आली. लॉंचचा आवाज आला अन्‌ माझ्या जिवात जीव आला. लॉंच किनाऱ्यावर लागली. लॉंचमधील 4-5 प्रवासी उतरले. वाघावळेच्या दिशेने चालू लागले. झरेकर मामा व मी लॉंचमध्ये बसलो. ठक्‌-ठक्‌-ठक्‌ लॉंच तापोळ्याच्या दिशेने सुरू झाली. ठिकठिकाणी प्रवासी लॉंचमध्ये बसत होते. लॉंच पुढे-पुढे जात होती. जंगल, पाणी, डोंगर झाडी मागे पडत होते. मी तापोळ्याला 5 वाजता पोचलो.

माझ्या मनात विचार चालू होते. त्या देव माणसाने माझ्या पिशवीत एक भाकरी व चटणी ठेवली नसती तर मला दिवसभर उपाशी राहावे लागले असते. भुकेने माझा जीव कासावीस होऊन गेला असता. एका भाकरीची किंमत मला त्या दिवशी कळली. मी त्या शिक्षकांना खूप-खूप धन्यवाद दिले. हा प्रसंग मी कधीच विसरणे शक्‍य नाही.
                                                          लेखक - आर. जे. गायकवाड 
                                                          संधर्भ - सकाळ पेपर 

मैत्री जिवाभावाची..............


मैत्री जिवाभावाची
 
खरंच मैत्रीचा बंध अतूट असतो. बघा ना दुडूदुडू चालणारं बाळ आपल्याच वयाइतक्‍या मुलाकडे बघून खुदकन हसते. त्याने दिलेली ती मैत्रीची हाक असते. हळूहळू मोठं होत असताना आपल्याच वयाच्या मुलांमध्ये आपण रमायला लागतो. इथूनच खरी मैत्रीच्या नात्याला सुरवात होत असते.

माझं बालपण महाडजवळील बिरवाडी या छोट्याशा खेड्यात गेले. आजूबाजूला खूप मित्रमैत्रिणी होत्या. खेळायला मोठे अंगण होते. अशीच माझी बालपणीची एक मैत्रीण आहे, जिच्याबद्दल मला एक प्रसंग आठवतो. आमचे घर कौलारू, मातीच्या भिंती व चूल अशा पद्धतीचे होते. संध्याकाळी चुलीला पातेरे घालून म्हणजे लाल मातीने चूल सारवून घ्यायची व पुढचा भाग शेणाने सारवायचा अशी पद्धत होती. संध्याकाळी माझी शिकवणीला जायची गडबड असायची. माझी मैत्रीण नयना माझ्याकडे यायची. माझे आवरले नसेल तर ती स्वतः जमीन सारवायला घ्यायची, जेणेकरून आम्ही दोघी वेळेवर शिकवणीला पोचू. एवढी निर्वाज्य मैत्री आता बघायलाही मिळत नाही. आम्ही दोघी मिळून खळाळत्या पाण्यात खडकावर बसून अनेक स्वप्नं बघितली होती. आता आमची गाठभेट कार्यक्रमापुरतीच व फोनवरच होते.

नंतर शाळेत आम्हा अगदी जवळच्या मैत्रिणींचा असा चौघींचा ग्रुप होता. शाळेत, शिकवणीला सगळीकडे आम्ही एकत्रच जायचो. आम्हाला कॉलेजसाठी आमच्या गावापासून महाडला जावे लागे. चौघी एकाच एसटीने जायचो. कॉलेजपासून अकाउंट्‌स क्‍लास गावात तीन ते चार किलोमीटर लांब होता. पण चौघी एकत्रच चालत जायचो. त्या काळी मुली टू-व्हीलर वापरत नव्हत्या. एकदा आम्ही गावात खरेदीला गेलो व परत घरी जायला म्हणून एस.टी. स्टॉपवर आलो. तेव्हा माझ्या लक्षात आले, की माझी छत्री हरवली आहे. खरंतर ती छत्री माझ्या चुलत बहिणीची होती. त्याने मला आणखीनच वाईट वाटले व रडू कोसळले. पण माझ्या मैत्रिणींनी मला खूप धीर दिला. आम्ही सगळ्या परत जिथे जिथे गेलो होतो तिथे जाऊन आलो. अखेर एका दुकानात छत्री सापडली. त्या वेळचा मैत्रिणींचा आधार आजही फार मोलाचा वाटतो.

आमचे कापडदुकान असल्यामुळे दुकानचा माल आम्ही महाडहून आणत असू. मी कॉलेजला गेल्यावर येताना कापड खरेदी करत असे. माझी एक ना एक तरी मैत्रीण बरोबर असे. क्‍लासपासून दुकान लांब होते. तिथपासून गच्च भरलेल्या कापडाच्या पिशवीचा एक बंद माझी मैत्रीण धरत असे. त्या वेळी रिक्षा करणेही परवडत नसे. माझ्या मैत्रिणींची सांपत्तिक स्थिती चांगली होती. तरी त्या मला जी मदत करत ती फार मोलाची होती. आजही आम्हा चौघींची मैत्री अबाधित आहे. कुठल्याही वेळी, कुठेही काही निमित्ताने भेटलो तरी लग्नाआधीच्या सगळ्या आठवणी उचंबळून येतात. दोनच महिन्यांपूर्वी यांतील एका मैत्रिणीचा फोन आला. दोघींनाही वेळेचे भान राहिले नाही. सरत्या काळातील आठवणी, ज्या गोष्टी करायला लग्नाआधी जमले नाही त्या करण्याची धडपड व वयानुसार होत गेलेले बदल यावर मनमुराद गप्पा झाल्या. अखेर माझ्या मुलाने "आई बॅडमिंटनला मला जायचे आहे' अशी आठवण करून दिल्यावर आमचा आठवणींचा ओघ थांबला.

नंतर लग्न झाल्यावर नवीन ओळखी झाल्या. नवऱ्याचे मित्रमंडळ, मुलाच्या शाळेसंदर्भातल्या, खेळाच्या इथल्या अशा अनेक मैत्रिणी मिळत गेल्या. असेच माझे एकदा मोठे ऑपरेशन झाले. डॉक्‍टरांनी घरी जायला परवानगी दिली व गाडीतून जा म्हणाले. त्या वेळी आमच्याकडे गाडी नव्हती. मी माझ्या मैत्रिणीला फोन करून सांगितले. ती तिची चारचाकी गाडी घेऊन मला न्यायला आली. अशा वेळी आपण आपल्या मैत्रिणीला हक्काने सांगू शकतो.
माझ्या प्रेग्नसीच्या काळात मला गाडी चालवायची नव्हती. तेव्हा माझी ऑफिसमधील मैत्रीण मला संध्याकाळी तिच्या गाडीवरून घरी सोडत असे. माझी मैत्रीण माझ्यापेक्षा लहान होती. अत्यंत काळजीपूर्वक गाडी चालवत असे. एवढेच नाही, तर तिने तिच्या आईला सांगून माझे डोहाळेजेवणही केले. खरंच ते दिवस आठवले तरी आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला अशा मैत्रिणी मिळत गेल्या, याचा अपार आनंद होतो.

खरंच आपण आपल्या आयुष्याचा लांबचा पल्ला गाठत असतो. अशा वेळी सुख-दुःखात साथ द्यायला, वेळ पडलीच तर सावरायला, काही चुकत असेल तर सांगायला, आनंदात सहभागी व्हायला आपल्याला मित्रमैत्रिणी उपयोगी पडतात. आयुष्याच्या एका ठराविक वळणावर मित्र-मैत्रिणींची फार गरज असते. मन मोकळे करण्याची ती एक जागा असते.

""मैत्री असावी जिवाभावाची
सुख-दुःखातील सहभागाची
हसताना हसणारी, अश्रूही पुसणारी
यशामध्ये पाठ थोपटणारी
आठवणीत रमून जाणारी.'' 
 
लेखिका -     
प्राची कर्वे
संदर्भ - सकाळ पेपर  

पाटलांची मोगलाई उतरवली.....


पाटलांची मोगलाई उतरवली

२८ जाने। १६४६ चे
शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र
सापडले

राजे १५ वर्षांचे झाले होते. फर्जंद महाराज
साहेबांनी दिलेल्या विश्वासू, कर्तबगार,
हरहुन्नरी लोकांच्या सानिध्यात
आणि आईसाहेब जिजाऊ यांच्या कडक
शिस्तीच्या आणि तितक्याच
मायेच्या सानिध्यात शिवाबराजे
पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे वाढत होते. हळू हळू
मुलुख बदलत होता, पण
माणसांची मानसिकता अजून बदलत
नव्हती मुलखातील मोघलाई संपता संपत
नव्हती. काही लोक अजून जुन्याच वळणाचे होते.
गावचे पुढारी पाटील म्हणजेच रयतेचे मायबाप
असे नसून मालकी हक्कच गाजवत होते.

शिवशाहीच्या सूर्याने आसमंतात
उगविण्यापूर्वीची जणू लाली धरली होती
परंतु.पाटलांच्या,वतनदारांच्या मनात खोलवर
चिखलात रुतून पडलेल्या जनावराप्रमाणे घर
करून बसलेली मोगलाई मात्र उतरायचे नावच
घेत नव्हती. उगवत्या सूर्याकडे आशेने पहाताना
रयत राजरोज हुंदक्या मागून हुंदके देत होती.
कुंपणानेच शेत खाल्लं तर न्याय मागायचा
कुणाला आणि आपलं दुःख सांगायचे कुणाला.
आणि एके दिवशी असाच एक प्रकार
मासाहेबांच्या कानी आला
पुण्यापासून नऊ कोसांवर असलेल्या रांझे

या गावचा पाटील बाबाजी बिन
भिकाजी गुजर याने बदअमल केला.
रांझे,रांझे गावचा पाटील, सगळ्यांना प्रकरण
फारच गंभीर वाटू लागले
काही तरी मोठा प्रसंग घडणार हे मात्र
नक्की होते पण नक्की काय होणार
त्याच्या सोबत हेच फक्त जाणून घ्यायचे होते
ह्याच्या आधी देखील पाटलाने असेच शेण खाल्ले
होते परंतु निवडा करणारेच कोणी नव्हते. पण
जनेतेचे गाऱ्हाणे ऐकणारी आई
आता लालमहाली बसली होती. जणू
पोटाच्या पोराच्या मायेनेच ती त्यांचे
सांत्वन करी न्यान निवडा करी.
आणि त्यात रांझे हे गाव
आऊसाहेबांच्या मालकीचे त्यांच्या वैयक्तिक
खर्चासाठी ह्या गावची मालकी आऊसाहेबांकडे
आणि त्यांच्याच गावात हा गुन्हा म्हणजे घोर
पाप कारण रयतेवर प्रेम करणारी आई रयत
नासवना-यांच्या विरुद्ध जणू चंडीचे रूपच धारण
करी , हा निवडा मात्र राजांनी केला कारण
राजे जाणते देखील झाले होतेच।
राजांना हि वार्ता कळली त्यांनी बाबाजीस्
ताबडतोब सदरेस बोलावून घेतले. त्याची
चौकशी केली, चौकशीत गुन्हा सिद्ध झाला.
त्याचवेळी महाराजांनी त्वरित त्याची
पाटीलकी जप्त केली.

इतकेच नव्हे तर त्याचे
हात पाय कलम करून त्याला कामावरून दूर केले.
हिंदवी स्वराज्य हे मोगलाई पेक्षा कसे वेगळे
आहे ते स्वराज्यातील जनतेच्या लक्षात आले. !

गुन्हेगारास शिक्षा ठोठावणारे महाराज
कठोर वाटले तरी मनाने मृदू होते. बाबाजी
निपुत्रिक होता. त्यामळे अपंगावस्थेत त्याचा
संभाळ कारांयःची तयारी गुजर कुळीच्याच
सोनजी बिन बनाजी गुजराने दर्शविली तेव्हा
महाराजांनी मेहेरबान होऊन मौजे रांझेची
पाटीलकी सोनाजिच्या नावे करून दिली व
बाबाजीसही पालनपोषणार्थ त्याच्या
स्वाधीन केले ( शककर्ते शिवराय )
ह्याच संदर्भाचे २८ जाने। १६४६ चे
शिवबाराजांची मुद्रा असलेले पहिले पत्र
सापडले आहे

आभार अभिषेक कुभांर
संदर्भ - असे घड्ले शिवाजी  महाराज  फेसबुक

वेडात मराठे वीर दौडले सात.....


वेडात मराठे वीर दौडले सात.....

त्या सात योद्धांची नावे.
१) विसाजी बल्लाळ.
२) दीपोजी राउतराव.
३) विट्ठल पिलाजी अत्रे.
४) कृष्णाजी भास्कर.
५) सिद्धि हिलाल.
६) विठोजी शिंदे
७) आणि सरनौबत कुड्तोजी उर्फ़ प्रतापराव गुजर

बहलोलखान नावाचा आदिलशाही सरदार स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने रयतेवर अन्याय करणे चालू केले. महाराजांनी त्यास धुळीस मिळवण्याचा आदेश प्रतापरावांना दिला.

मराठ्यांच्या गनिमी काव्याने बहलोलखान जेरीस आला. वेळ प्रसंग पाहुन तो मरठयांना शरण आला आला. आता शरण आलेल्याला मारु नये असा हिंदु धर्म सांगतो; त्यामुळे त्या तत्वनीष्ठ मराठ्याने त्याला धर्मवाट दिली, व तो गनीम जिव वाचवून गेला.

पण नंतर दगाबाज बहलोलखान पुन्हा स्वराज्यावर चालुन आला. आणि शिवरायांनी रयतेला त्रास देणारा बहलोलखानास सोडल्या बद्दल प्रतापरावांचि पत्र पाठऊन कानऊघडणी केली. त्या पत्रात एक वाक्य होत जे प्रतापरावांच्या जिवास लागल. शिवरायांनी म्हटल होत की "बहलोलखानास पकडल्या शिवाय मला तोंड दाखवु नये".

हे वाक्य वाचुनत्यांनी आपल्या सहा सहकरयांकडे नजर टाकली आणी त्यांनी आपापले भाले सरसावले.त्या सात जणांनी मरणाला समोरा समोर ट्क्कर दीली.

निळ्या ध्वजाचा आम्हाला द्वेष नाही ..... हिरव्या ध्वजाचा आम्हाला राग नाही .....

निळ्या ध्वजाचा आम्हाला द्वेष नाही .....
हिरव्या ध्वजाचा आम्हाला राग नाही .....
पण ......
"भगव्या ध्वजाचा अभिमान
आम्हाला कधी लपणार नाही ......!!!!!"नक् कीच मस्जीदी बद्दल वाईट नाही ....!!!
मनात चर्च बद्दल अवमान नाही .....!!! पण ..... शिवारायान्पुडे नतमस्तक होण्यास
कुणी आम्हाला रोकु शकणार नाही ....!!!!! सर्वधर्मीयांचा मन राखू ....
त्यांच्याशी प्रेमानेवागू .... पण ...... हिंदुस्तानात"आम ्ही हिंदू"गर्वाने
सांगण्यास बंदी का लावू .......!!!!! नक्कीच भगवा वाघ पुढे सरसावणार ...
थिजलेल्या हिंदवी रक्ताला
नवचैतन्य लाभणार ......
जीजावू शिकवणीने पुन्हा शिवबा घडणार ..... हिंदवी स्वराज्याच खात्मा करू
पाहणार्यांचे स्वप्न....... नाही पुरे होवून देणार .......!!!!!
नाही पुरे होवून देणार.......!!!!! जय हिंद ,जय महाराष्ट्र ...!!!!!

देवा मला पुढच्या जन्माला..........


देवा मला पुढच्या जन्माला घालताना एक लक्षात ठेव...!!!
मी
दगड झालो तर...
सह्याद्रीचा होवूदे.!!
माती झालो तर....
रायगडाची होवूदे.!!
तलवार झालो तर....
भवानी तलवार होवूदे.!!
वाघ नको वाघनख्या होवूदे..!!!
मंदिर नको..
जगदीश्वराची पायरी होवूदे.!!
आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आलोच तर
"मराठी" म्हणूनच शिवाजी कर पण शिवाजी काशीद कर.....!!!
असं देवा तुला जमणारच नसेल तर मला पुन्हा जन्मालाच घालू नको मी याच जन्मी धन्य झालो..!!!
                                    आभार = किशोर सप्रे 

या सह्याद्रीला, या स्वराज्याला..


या सह्याद्रीला, या स्वराज्याला, या शिवराज्याला आपल्या रक्ताने अभिषेक घालणाऱ्या मावळ्यांना मानाचा मुजरा...
"कान्होजी आंग्रे-समुद्रावरचा शिवाजी"

सुमारे २५ वर्षे कोकणचा सागरी किनारा स्वराज्यात सुरक्षित ठेवण्यात यशस्वी ठरलेले ‘मराठी आरमार प्रमुख’!
...
स्वकर्तृत्वावर उत्तुंग झेप घेणारा, परकीय शत्रूंची दाणादाण करून त्यांची झोप उडविणारा मराठी सरदार, दर्याबहाद्दर कान्होजी ! पुणे जिल्ह्यातील खेडजवळील कालोसे गावी १६६९ मध्ये कान्होजी आंग्रे ह्यांचा जन्म झाला. कालोसे गावातील आंगरवाडी ह्या छोट्या भागावरून त्यांचे आंग्रे हे आडनाव रूढ झाले.

कर्तृत्व, पराक्रम आणि निष्ठा याची परंपरा कान्होजीला पूर्वजांकडून लाभलेली होती. तरीही स्वपराक्रमाने, स्वत:चा एक स्वतंत्र ठसा त्यांनी इतिहासात उमटविला. इ.सन १६८८ च्या सुमारास सिद्दी कासम ह्या औरंगजेबाच्या सेनापतीस कान्होजींच्या अभ्यासपूर्ण योजनेपुढे आणि जिद्दीपुढे हार पत्करावी लागली. आमिष दाखवून कोकणातील किल्ले ताब्यात घेणार्‍या मोगलांचे स्वप्न कान्होजींनी धुळीस मिळविले. सुवर्णदुर्गचा लढा यशस्वी करून त्यांनी आपल्या पराक्रमास सुरुवात केली. तसेच ह्या विजयानंतर मोगलांनी ताब्यात घेतलेले किल्ले काबीज करण्यास त्यांनी सुरुवात केली.

छत्रपती राजारामांच्या काळात मराठ्यांचे अस्तित्व टिकविण्याची जबाबदारी कान्होजींवर आली होती. अनुभवाने आणि मुत्सद्देगिरीने ते शत्रूला तोंड देत होते. त्यांची स्वतंत्र कामगिरी पाहूनच राजारामांनी त्यांना ‘सरखेल’ हे सन्मानाचे पद दिले. कान्होजींनी अलिबागचा कुलाबा किल्ला जिंकून घेऊन आपली राजधानी तेथे थाटली. छत्रपती राजारामांनी आंग्रे यांना आरमाराचा प्रमुख केले आणि आंग्रे कोकण किनार्‍याचे राजे झाले. इ.स. १७०० मध्ये राणी ताराबाईंनीही ह्या पराक्रमी वीराला सन्मानित करून सावंतवाडी ते मुंबईपर्यंतची किनारपट्टी रक्षणासाठी ताब्यात दिली. ह्या नव्या आव्हानाबरोबर कान्होजींना एकाच वेळी परकीय आणि स्वकीयांबरोबर लढा द्यावा लागत होता.

कोकणाबरोबरच कच्छ, सौराष्ट्रापासून त्रावणकोर, कोचीनपर्यंतची सागरी सत्ता कान्होजींच्या हाती होती. सागरी भागात मुक्तपणे संचार करणार्‍या परकीयांवर निर्बंध आले होते. १६९८ पासून मराठी राज्याची सारी सागरी सत्ता कान्होजींकडे आली होती. त्यांच्या परवान्याशिवाय कोणीही सागरावर व्यापार करू शकत नव्हते. ह्याचा प्रतिकार करण्याचे परकीयांनी ठरविले. सर्व परकीयांनी एकत्रित येऊन कान्होजींना संपविण्याचे ठरविले, तरीही त्यांनी इंग्रज, पोर्तुगीजांनाही पराभूत केले. शत्रूच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी कान्होजींनी दूरदृष्टीने अगोदरच अनेकांशी मैत्रीचे संबंध ठेवलेले होते. अशा संबंधांच्या मदतीने त्यांनी आपले आरमार अधिक शस्त्रसज्ज केले. पोर्तुगीजांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रनिर्मितीचा कारखाना आणि कुलाबा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग येथे सुधारीत पद्धतीचे जहाज बांधणीचे कारखाने त्यांनी उभारले. या सुसज्जतेसह कान्होजींनी समुद्र किनार्‍यावर एक दबदबा निर्माण केला होता.

कान्होजींचा लढा धार्मिक आक्रमणाची धार कमी करण्यासाठीही होता. कान्होजी आंग्रे यांनी कोकणातील मंदिरांसह पंढरपूर, आळंदी, जेजुरी, तुळजापूर येथील देवस्थानांना इनाम व रोख देणग्याही दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही औरंगजेबाला मराठी मुलूख काबीज करता आला नाही. यामागे अनेक शूर सरदारांचे योगदान होते. कोकण किनार्‍यावरील राजसत्तेचा जागता पहारा असणारे कान्होजी त्यांतीलच एक ! दिनांक ४ जुलै, १७२९ रोजी कान्होजींनी जगाचा निरोप घेतला.