Wednesday, April 25, 2012

४ फेब्रुवारी १६७० ची रात्र


४ फेब्रुवारी १६७० ची रात्र आणि तानाजी मालुसरेंचा पराक्रम
शिवकाळात किल्ल्याना अनन्य साधारण महत्व होते.मात्र किल्ले घेण्याच्या इस्लामी आणि शिवाजी राजांची पद्धत यामध्ये जमीन अस्मानाचा फरक होता.गतिमानता हा राजांच्या युद्धपद्धतीचा गाभा होता.पुरंदरच्या तहात गेलेल्या २३ किल्ल्यांपैकी एक म्हणजे कोंढाणा होय.
जानेवारी १६७० चा महिना संपत आला होता.त्यासाठी तानाजीने वेळ निवडली ती म्हणजे ४ फेब्रुवारीची (१६७०)संध्याकाळ .या दिवशी तिथी होती माघ वद्य नवमी.चंद्रोदय रात्री २ वाजता होणार होता.त्या आधी मिट्ट अंधारच...!!गुंजवणी नदी ओलांडली,सर्वजन विंडसई खिंडित पोचले.तोपर्यंत अंधार पडला होता.मशाल पेटवणे महा-धोक्याचे होते.दोन मावल्याना हा कडा त्याच्या खाचा-खोचांसकट माहित होता.मात्रयावेळी कडा चढताना सहा मावले कड्यावरुन पडून मरण पावले.त्यांची नावे आजही इतिहासाला अज्ञात आहेत.कड्याच्या वरच्या अंगाला दोर बांधण्यात आले.दोराच्या आधाराने सारे मावले वर आले अन घात झाला.उदयभानुला खबर लागली की कुणीतरी दोर चढून किल्ल्यावर घुसतय.एकच गोंधळ उडाला.चंद्रोदय झाला होता व् अगदी धूसर प्रकाश होता.गड जागा होत आहे याची चाहुल लागताच मराठयानी शस्त्रे परजली आणि सैनिकांच्या वस्तीवर धावले.काही सैनिक जागे होण्याच्या आतच त्याना मराठयानी कापून काढले.थोड्याच वेळात गडावर तीनशे मराठे आणि १५०० मोगली सैनिक असा सामना जुम्पला.
मराठ्यापुढे यश किंवा मृत्यु असे दोनचउदयभानुच ्या जोरकस वाराला अडवन्यासाठी तानाजीनेढाल पुढे केली आणि दुर्दैवाने ती ढालच तुटली.आत तानाजी उघडा पडला आणि उदय भानु जोशात आला.मर्मस्थानी वार बसून तानाजी घायल होवून खाली पडला आणि थोड्याच वेळात वीर गतीला गेला.उदयभानुही जखमा आणि रक्तस्त्रावाने खचला होता.थोड्याच वेळात तोही गतप्राण झाला.
तानाजी पडल्यावर मराठी सैन्यात चल बिचल झाली आणि त्यांचा धीर सुटतो की काय म्हणुन सूर्याजी पुढे झाला आणि त्याने त्याना धीर देवून युद्धास परावृत्त केले.झाले ........
विलक्षण अशा जोशात सर्व मराठे लढले मोगली सैन्याचा धीर पुरता खचला आणि त्यानी शरणागती पत्करली......शे वटी काय???
गड आला पण सिंह गेला......
.
.
.
आणि तो दिवस होता ४ फेब्रुवारी १६७० ची रात्र आणि ५ फेब्रुवारी १६७० ची पहाट........... .....!!!

No comments:

Post a Comment