Wednesday, April 25, 2012

शिवछत्रपतींबाबत

शिवछत्रपतींबाबत मी जितका विचार करतो तितकं गुंगुन जायला होतं. महाराजांच आयुष्य म्हणाल तर तुलनेने कमी होतं. पैकिपहिली १५ वर्ष सोडून द्यावीत कारण शिवाजीराजे असले तरी बालपण हे बालपणच असतं. त्यांना समज व त्यांवरचे आऊसाहेबांचे संस्कार ह्या त्यांच्या जमेच्या बाजू धरुनहि राजकिय विचार करता १५ वर्ष बाजूला काढायला हरकत नाहि. म्हणजे उरली३५ वर्ष ... ३५ वर्षात एक माणूस नेमकं असं काय करतो कि ३५० वर्षांनीहि त्याचे विचार, कृती हे तितकेच ताजे रहातात? इतकेच नव्हे तर जगाच्या इतिहासात दुसरे उदाहरण नाहि अश्या अनेक घटना शिवकालात व शिवोत्तर कालात मराठ्यांबाबत घडल्या.
विचार करा - ज्याने दिल्लीच्या राजपुत्राला रणांगणावर अडकवून ठेवले होते व ज्याचा डंका रुमशेमपावतो वाजत होता अश्या एका ताकदवान माणसाला आपल्याला हवे त्या भागात बोलावून स्वहस्ते कोथळा बाहेर काढलेली घटना जगात दुसरी कुठली आहे? - नाही!
तब्बल सव्वालाखांहून जास्त फौजेत चारशे - पाचशे माणसांसकट घूसून कामगिरी फत्ते करुन सुखरुप परत येणे हि घटना घडली आहे कुठे? - नाहि! तसे बघायला गेलेतर राजकिय व सामरिक दृष्ट्या खुद्द"राजाने" असे करणे हा वेडेपणाच होता, एक माणूस फितूर आणि सगळे संपले, एक गळपटला असता तर सगळे उधळले गेले असते, खुद्द राजांच्या जीवाला धोका होता. पण हि संधी अखेरची कारण एकदा कोकणात खानाच्या लोकांनी छावणी केली कि तळकोकण स्वराज्यापासून तुटलेअसते. शिवाय रणात मारुनकाढावे इतकि ताकद मराठ्यांत तेव्हा आली नव्हती. जनता नागवली जात होती. हा जाणता राजा जनतेची किती काळजी घेत होता हे ह्याकाळातील बाजी जेधेंना लिहिलेल्या २-३ पत्रांतून दिसुन येते पण बरोबरच खानाचं संकट किती मोठं होतं व महाराजांवर किती ताण होता तेहि समजते. ’इस पार या उस पार’ ह्या विचारानेच जनतेसाठी स्वत:चा जीव ह्या देवमाणसाने धोक्यात घातला. ’कमांडो ऑपरेशन’ कशाला म्हणातात ते समजण्यासाठी शास्ताखानावरचा छापा त्यामगचा विचार व केलेली कृती हे पुन: पुन: वाचून त्यावर विचार करण्यसारखा आहे. आणि कल्पनेबाहेर हे ’कमांडो ऑपरेशन’ यशस्वीझाले. पुन्हा सांगतो - " निदान पहिल्या महायुध्दा आधी जगात एकहि असे उदाहरण नाहि."
तब्बल ४५० - ५०० किमी वरची शत्रूची "आर्थिक राजधानी" दोनवेळा धूवून काढायची आणि शत्रुच्या नाकाखालून सगळी संप्पत्ती घेऊन यायची, जगाच्या इतिहासात दुसरे उदाहरण नाहि.
   आभार - मुकुंद पिंगळे आणि त्यांचे सहकारी 





No comments:

Post a Comment