Wednesday, June 27, 2012

बायको : तुमची बरेच दिवसापासून इच्छा होती ना!

बायको : तुमची बरेच दिवसापासून
इच्छा होती ना!
मग आज रात्री मी पुरी करणार आहे... ;)

नवरा : ठीक आहे मग मी श्रीखंड घेऊन येतो. -
-
... -
-
-
-
-
नाही समजल तर पुन्हा वाच

नेत्यांच्या स्टाईलने……………….

नेत्यांच्या स्टाईलने……………….

महात्मा गांधी– कोंबडी पळवली जाणे ही दुखद घटना आहे. या घटनेने मला अतिशय धक्का बसलेला आहे, परंतु, चोर सापडल्यास त्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता त्याला मोकळे सोडून दिले जावे. अशाने त्याचे हृदय परिवर्तन होईल.

लोकमान्य टिळक– कोंबडी पळविणाऱ्या चोराचे डोके ठिकाणावर आहे काय?

बाळासाहेब ठाकरे– जर कोंबडी वापस मिळाली नाही तर, त्या कोंबड्याला <चोराला> पहाटे आरवायला लावू. हे कोंबडी चोराने हे लक्षात ठेवावं.

राष्ट्रपती ताई– कोंबडी चोरीला जाणे ही अतिशय वेदानादेह घटना आहे. मी ह्या घटनेचा ‘तीव्र’ शब्दात निषेध नोंदवते.

मनमोहन सिंग – कोंबडी चोरीच्या घटनेची मी कठोर शब्दात निंदा करतो. सर्वांना मी शांततेचे आवाहन करतो.

पी. चितंबरम- यात परकीय शक्तींचा हात आहे का? याची तपासणी चालू आहे.

दिग्विजयसिंह– कोंबडी पळवण्याच्या मागे संघाचा हात आहे.

अण्णा हजारे – जर कोंबडी आणि कोंबडी चोर हे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत सापडले नाही तर, मी पुन्हा ‘आमरण उपोषणाला’ बसेन.

रामदेवबाबा – कोंबडी पळवणे म्हणजे देशद्रोह आहे. अरे! जर कोंबडी सापडली नाही. तर अंडी कोठून मिळणार? आणि देश स्वस्थ कसा राहणार?

अटलबिहारी वाजपेयी– कोंबडी पळवणे……… ही........ चांगली गोष्ट नाही...... मी सरकारला……. अनुरोध...... करेन की……. त्यांनी लवकरात लवकर……. त्या कोंबडी चोराचा छडा....... लावावा.

अजित पवार – मी कोंबडी पळवली नाही. माझ्या वाटेला जाल तर याद राखा.

लालू प्रसाद यादव– अरे मुर्गी थो चोरी हुई है न! मिल जायेगी|भेस थोडी है जो नीतीस के घर जायेगी||

राज ठाकरे – जर कोंबडी मराठी असेल तर, कोंबडी चोराला तंगडी धरून लंगडी घालायला लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.

उद्धव ठाकरे – गेल्या चाळीस वर्षापासून आम्हीच कोंबडी चोरीचा मुद्दा मांडत आलो आहोत. इतरांनी नाक खुपसू नये.

आर आर पाटील – मोठ्या शहरात अशा छोट् छोट्या घटना घडत असतात. परंतु, कुणीही कायदा हातात घेऊ नये.

राहुल गांधी – कोंबडी चोर कोण है? महाराष्ट्रीयन है|

बराक ओबामा – ओह नो! आय कांन्ट..

नारायण राणे – हिम्मत असेल तर कोंबडी चोराने मालवणात येऊन दाखवावे.

मायावती – कोंबडी पळवणे हे विरोधी पक्षांचे षडयंत्र आहे.

नितीन गडकरी – कोंबडी चोर हा काय सरकारचा जावई आहे?

शिक्षक : रामा इज ईक्वल टू पक्या कसे प्रूव्ह कराल?

शिक्षक : रामा इज ईक्वल टू पक्या कसे प्रूव्ह कराल?
मकरंद अनासपुरे : सोपे आहे गुरुजी,
रामाच्या उलटे करा
काय झाले
मारा,
आता माराला हिंदीत दुसरा कुठला शब्द आहे?
पीटो
आता पीटो च्या उलटे करा
टोपी
आता टोपी ला मराठी ग्रामीण भाषेत काय म्हणतात?
क्याप
आता क्याप च्या उलटे करा
पक्या.
म्हणून रामा इज ईक्वल टू पक्या हे प्रूव झाले....

एक हृदयस्पर्शी कथा.... :'(

एक हृदयस्पर्शी कथा.... :'(
तो अजुनहि झोपलाच होता,
वर टांगलेल सलाईन
वाऱ्या निशी हालत होत. त्यातून टपकनारे थेँब
त्याच्या रक्तात भिनत होते.झोप कसली येत
होती त्याला...?? उघड्या डोळ्याने तो एकाच
ठिकानी बघत होता. त्याची आई औषधे व गोळ्या घेवून आली, त्याला थोडे फार खाण्याची विनंती केली.
पण
त्याने गप्प राहून नकार दिला,
आई गेल्यानंतर त्याने
एका हाताने औषधे व गोळ्या घेतल्या........ .
घड्याळाच्या टोलानीँ त्याचेलक्ष वेधले. सहा वाजले होते,
त्याने चटकन चादर
बाजूला केली ' अरे बापरे ! क्लास तर संपून गेला असेल ' अंगात एवढेही बळ नसताना त्याने हातातली सुई खेचून
काढली. भळ-भळनाऱ्या रक्तावर कापसाचा बोळा पकडून
तो सायकल जवळ गेला. त्याच्याकडे कुणाचेही लक्ष
नव्हत. भर पावसात
तो सायकल घेवून क्लासकडे गेला.
क्लास तर केव्हाच संपून गेला होता. बहूतेक सर्वजण घरी निघून गेले होते थोडी पावसाची भूर-भूर चालूच
होती....
ती आजून हि क्लासच्या बाहेरत्याची वाट पाहत
उभीच
होती. त्याला बघितल्यावर तिचे डोले चमकले.
तिला त्याचा राग आला होता, झपझप चालत
त्याच्याजवळ पोहचली. त्याच्या डोक्यावर छञी पकडून त्याचा कान धरला, "तू आजारी असताना इथं का आलास ?
आणि पून्हा छञी विसरलास, बापरे ! किती पाणी"
त्याच्या डोक्यावरून पाणी झटकत ती म्हणाली, "पूर्ण
ओला झालाय आणि मग सर्दी झालीम्हणजे मलाच
म्हणशिल......" अरे ! किती बडबड
करते मी ? जाऊ दे बरं, डाँक्टर काय म्हाणालें तब्येत कशी आहे?
दोघेही क्लासच्या बाहेर पायरीवर जाऊन
बसले.
तो अजूनही काकडत होता. तिच्या डोळ्यामध्ये त्यांचे
बावरलेलं मन स्वत:ची खोलवर रूजलेली प्रतिमा शोधत
होत. तिचे निरागस डोळे माञ सदैव
त्याच्याच चिँतेत बूडालेलेदिसत होते. त्याच्या अतिभोळेपनाची तिलाकाळजी वाटायची,
त्याच्या प्रेमाच्या वेडेपणाची सीमा अजून
तिलाही ठरवता आली नव्हती. त्याच्या कपाळावर तिने
हात ठेवला आणि ती दचकलीच,
" बाप रे ! किती भयंकर ताप आलाय तूला ! अन, तरी तू
एवढ्या पावसात मला भेटायला आला? तूला काही झालं म्हणजे? नाही मीच
वेडी आहेँ. मीच थांबते ना ! आता मी थांबणारच नाही, तू
बघच मी, थांबतच नाही ! असं द्रृष्ट लागण्याजोगे प्रेम
बघून त्याच्या डोळ्यांमध्ये
पाणी जमा झालं,बोलण्याचा प्रयत्न
करताच त्याला खोकला आला.
तिने त्याला न बोलण्याची विनंती केली. त्याचा हात आपल्या हातात
घेताच, तिने हातावरुन ओघळणारे लाल रक्त बघीतले.
ती यावेळी माञ चिडलीच, "तू हे काय केलंस? तू सलाईन
काढले ना? का स्वता:ला ञास करून घेतोस?
तुला होणाऱ्या वेदना काळजातसूई प्रमाणे घुसतात,जा !
मी बोलणारच नाही. अरे तुला काही झाले म्हणजे मी आणि माझे जीवन........... ..." त्याने तिच्या ओठांवर
हात ठेवला.
पुढचे शब्द
काळजाला चिरणारे होते.त्याच्या डोळ्यातून थेँब
ओघळला. तिच्या निस्सिम प्रेमासाठी-
आणि तिच्यासाठी,तरीह
ी त्याच्या डोळ्यातल्या अश्रुनी तिला अस्वस्थ करुन टाकले. तिच्याहि डोळ्यांतून पाणी टपकत होते,"खरच,
इतक प्रेम करतोस का रे माझ्यावर...???
मग का असा ञास
देतोय? तुझ्या या वेडेपणानेच मला वेड
लावंल-तुझ-तुझ्य ा प्रेमाचंमी सुध्दा इतकी वेडी आहे ना-
मी थांबते म्हणून तर तू येतोस. दोघेपण अगदी वेडे आहोत.
तिने त्याच्या खांद्यावर मान टेकवली.
तिचे डोके थापटत, तो माञ कुठल्यातरी वेगळ्याच विश्वात हरवून
गेला होता, तिथे फक्त तिच्याबांगड्यांची किण-किण
आणि तिचा आवाज कानी येत होता. तेवढ्यात
त्याच्या सरांची थाप त्याच्या पाठीवर पडली, "
काय रे ? केव्हाचा आवाज देतोय-काय करतोय इथं एकटा ?
एवढ्या पावसात का बसलाय ? घरचे म्हणत होते तू आजारी आहेस म्हणुन "
सरांच्या आवाजाने तो भानावरआला.... त्याने मान
डोलवली. सर आत निघून गेले.
भरलेल्या डोळ्यानी किँचित मागे वळूनपाहिले.
क्लासमध्ये टांगलेल्या तिच्या फोटोची माळ
वाऱ्यानिशी हालत होती. ती क्लास मधली एक हूशार विद्यार्थीनी होती...!!! सर्व काही द्रृष्ट
लागल्या प्रमाने घडून गेलं होत.
स्वप्नाहूनही सुंदर अशा त्यांच्या दुनियेवर काळाने
अशी झडप घातली कि त्या दुनियेतील सर्व सुख काळ
आपल्या बरोबर घेऊन गेला होता.
फुलांआडून डोकवणाऱ्या तिच्या डोळ्यामध्ये घोर चिँता दिसून येत होती.
कोण समजून घेणार माझ्या या वेड्याला ? कोण
शिकवणार
याला माझ्याशिवाय जगणं? कोणी जपेल
का याला माझ्याप्रमाणे? असेअनेक प्रश्न तिला पडले
असावे. त्याचे मन माञ एखाद्या वेड्या हरणाप्रमाणे
तिच्या सावलीमागेच पळत होतं, ते हेमानायला तयारच नव्हत की तिच अस्तित्व आता संपलय म्हणून.
असे सावल्यांचे खेळ-आभास त्याच्या जिवनाचा एक भागच
बनून गेले होते. ह्रूदयात जपून
ठेवलेल्या तिच्या आठवणी अश्रु बनुन क्षणा-
क्षणाला बाहेर पडत होत्या. तिची प्रतिमा डोळ्यामध्ये
भरून जड अंत:करनाने तो सायकलजवळ गेला. काकडंत- काकडत त्याने सायकल घेतली वघराकडेचालू
लागला आणि चालता-चालता बेशुध्द होऊन पडला......
हे सर्व प्रेम होत कि वेड ! मी त्यावेळी हे सारे फार जवळून
बघितले होते. का कुणीतरी इतकही प्रेम करू शकत ? हे
असं कसं प्रेम होत जे म्रूत्युनंतर सुद्धा जिंवतहोत?
खरचं त्याच्या वेडे पणाला म्रूत्युच्याही मर्यादा कमीपडल्या होत्या....
या अगोदर तो खुप चांगला असायचा
क्षणोक्षणी त्याच्या चेहऱ्यावर आनंद असायचा, पन
त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर हास्य मी पहीलेच नाही.
आता त्याने आपल्या मनावर ताबा मिळवलाय.
सर्वाशी तो चांगला वागतो अगदी पूर्वीप्रमाणे. पण फरकएवढाच आहे की तो पूर्वी सर्वाशी बोलु शकत होता.
त्यावेळी आजारात त्याने आपली वाचा गमावली होती.
त्या दोघांच्या सुखासमोर स्वर्गसूद्धा फिका पडत
असावा म्हणुन देवालाही हेवावाटला आणि............ ....
जे खरोखर चांगल घडत असतं तेथेच नशिब तोकडे पडते
हा प्रश्न तर फार पूर्वीपासून अनुत्तरीतच आहे. ...... असचं नेहमी का घडतं?का ?

चंदूच्या बायोकोचे मराठी थोडे कच्चे असते.

चंदूच्या बायोकोचे मराठी थोडे कच्चे असते........
तिला पूर्ण विराम कोठे द्यायचं ते काळात नसते........
तरी तिने चंदुला पत्र लिहिले आणि मग पूर्ण विराम देऊन टाकले मध्ये मध्ये ......
ते असे.......
" प्रिय प्राण नाथ,
तुमची आठवण येते माझ्या मैत्रिणीला.
काल मुलगा झाला आजीला.
दम्याचा त्रास होतो कुत्रीला.
आज चार पिल्ले झाली मामाला.
दाढी करताना ब्लेड लागली वहिनीला.
दवाखान्यात अद्मित केले बकरीला.
हजार रुपयात विकले आत्याला.

नमस्कार तुमची लाडकी गंगू...

प्रेमाची तुलना....

प्रेमाची तुलना....
एक गरिब मुलगा
श्रीमंत मुलीवर प्रेम करत असतो.
एके
दीवशी तो तीला मागणी घालतो.
मुलीला श्रीमंतीचा गर्व असतो
ती म्हणते, " हे बघ.!
तुझ्या महीना भराची कमाई
ही माझ्या
एका दिवसाचा खर्च आहे.
तुला वाट्टे मी तुझ्या सोबत
राहील.?
तु असा विचारच कसा केलास.?
मि तुझ्यावर कधीच प्रेम करु शकत
नाही. तर,
विसरुन जा मला ' अन तुझ्या Level
च्या एखादीशी लग्न कर." पण
हे सर्व विसरणे
त्या मुला साठी इतके सोपे नव्हते.
.
दहा वर्षा नंतर.
त्या दोघांचा आमना-
सामना एका Mall मध्ये
झाला.
मुलगी त्याला
म्हणाली,
"Hey! you! How are you.?
माझ आता लग्नं झाले आहे.
तुला माहीती आहे
का माझ्या नवऱ्याचा पगार
कीती असेल.? दोन लाख दर
महीना.!
तु विचार तरी करु शकतोस का.?
'अन तो पण दिसायला सुंदर
आणी माझ्या योग्यतेचा आहे."
तिचे हे शब्द एकून तो काहीच
बोलला
नाही.
क्षणात त्याच्या डोळ्यात अश्रू
आले.
इतक्या तो तिला काही म्हणनार
तर तीचा पती तेथे आला,..
तिचा नवरा येताच त्याने तिला
त्याच मुलाबद्दल
सांगायला सुरवात केली...
"सर ! तुम्ही इथे.?
ही माझी पत्नी."
पती त्याच्या पत्नीला म्हणाला,
" मि यांच
सरांकडे एका प्रोजेक्टवर काम करत
आहे
जो २००कोटी चा आहे .
' तुला एक खर माहीतेय का.?
सर पण एका मुलीवर प्रेम करत
होते पण
ती भेटली नाही म्हणुन
यांच करणामुळे ते
अजुनही अविवाहीत आहेत.
खरच कीती नशिबवान मुलगी असेल
ना ती.?
पण आजकाल कुठे बघायला मिळते
का असे प्रेम.?"
.
शिकवण: आयुष्य हे खुप छोटे आहे. तर,
स्वतःवर इतका गर्व करु नये
आणि दुसऱ्याला कमी पणा दाखऊ
नये. ..
वेळेनुसार
परिस्थिती केव्हाही बदलृ शकते तर
नेहमी प्रेमाचा आदर
करायला शिका..

ना नात्यातली, ना वंशातली

ना नात्यातली, ना वंशातली
ना रक्ताची, ना रक्ताच्या नात्याची
जशी तुमची माझी मैत्री...........
फक्त मनामनाची.......
आपलेपणाची...........
एकमेकांच्या सुख दुखात हसणारी रडणारी..........
आणि हसवणारी / रडवणारीही
क्षणात तुटून क्षणात जोडणारी.....
अशी असावी मैत्री II

अशी नसावी मैत्री स्वार्थासाठी जगणारी
मोहात अडकलेली......
रखरखत्या उन्हात
क्षणभर सावलीला तरसणारी....
हृदयावर घाव करून...
कायमची विसरून जाणारी........
किनार्यावरच्या लाटेसारखी उसणा गारवा देणारी..

एक दिवस असा येईल,

एक दिवस असा येईल,
महाराष्ट्र शिवाजीमय होऊन दिसेल...
हातात पैसा नाही,
शिवमुद्रा दिसेल...
जिकडे पाहू तिकडे दिसतील फक्त आणि फक्त
"मराठा".
जय जिजाऊ..../>
जय शिवराय..../>
जय शंभुराजे..../>
जयोस्तु मराठा.../>
मराठा रियासत.../>

एक मराठा..

एक मराठा..
सोप्या नसतात कधी ईतिहासाच्या वाटा..
छातिवर घ्याव्या लागतात
माजलेल्या समुद्राच्या लाटा..
या रक्तभंबाळ देहाच झाड झाल तुमची सावली म्हणुन..
रक्ताच पाणी केल रणांगणात रयत
सुखी रहावी म्हणुन..
झुझंलो आम्ही वाघावानी..
टकरा आमच्याशी घेतल्या लांडग्याच्या टोळक्यानी..
लाख्खो मावळ्यानी पराक्रमाची पराकाष्टा केली.. तेंव्हा कुठ या स्वराज्याची निर्मिती झाली..
तुमच्यासाठी..
अगनीक झुंझी दिल्या तुफाणी वादळाशी..
दऱ्याखोऱ्यातुन अंधाऱ्या काळोखाशी..
स्वराज्याच स्वप्न घेउन
विसावलो नाही कधी डोंगराच्या पायथ्याशी.. गाठ
बांधली आबासाहेबांनी आमच्या जन्माची स्वातंत्र्याशी. .
सह्यांद्रिचा वाघ म्हणतात या मर्द
माराठ्यांच्या जातीला..
आरे स्वताःच्या रक्तान लाल केलय आम्हीच
या महाराष्ट्राच्या मातीला.. विसरनार नाहि ईतिहास आऊसाहेब
जिजाऊला..
माझ्या शंभुच्या बलीदानाला..
माझ्या शुरविर मावळ्याच्यां पराक्रमाला..
विसरु देणार नाही मराठे..
त्यांना समजु नका एकटे.. ताकद आहे आमच्यात मर्दानी..
भगवा झेंडा हिच आमची निशाणी..
जे लागतील आमच्या नांदि..
मार खातील कुत्र्यावानी..
हो आहेच ती धमक आमच्यात..
हातपाय तोडायचा आला कि टपक्यात.. असाच नाहि म्हणत
दुनिया आमचा ईतिहासात सिंहाचा वाट..
आरे हो आहोच आम्ही..
एक मराठा..
स्त्रोत ..नव उदय
आभार - छत्रपती प्रतिष्ठान 

एक मराठा..
सोप्या नसतात कधी ईतिहासाच्या वाटा..
छातिवर घ्याव्या लागतात
माजलेल्या समुद्राच्या लाटा..
या रक्तभंबाळ देहाच झाड झाल तुमची सावली म्हणुन..
रक्ताच पाणी केल रणांगणात रयत
सुखी रहावी म्हणुन..
झुझंलो आम्ही वाघावानी..
टकरा आमच्याशी घेतल्या लांडग्याच्या टोळक्यानी..
लाख्खो मावळ्यानी पराक्रमाची पराकाष्टा केली.. तेंव्हा कुठ या स्वराज्याची निर्मिती झाली..
तुमच्यासाठी..
अगनीक झुंझी दिल्या तुफाणी वादळाशी..
दऱ्याखोऱ्यातुन अंधाऱ्या काळोखाशी..
स्वराज्याच स्वप्न घेउन
विसावलो नाही कधी डोंगराच्या पायथ्याशी.. गाठ
बांधली आबासाहेबांनी आमच्या जन्माची स्वातंत्र्याशी. .
सह्यांद्रिचा वाघ म्हणतात या मर्द
माराठ्यांच्या जातीला..
आरे स्वताःच्या रक्तान लाल केलय आम्हीच
या महाराष्ट्राच्या मातीला.. विसरनार नाहि ईतिहास आऊसाहेब
जिजाऊला..
माझ्या शंभुच्या बलीदानाला..
माझ्या शुरविर मावळ्याच्यां पराक्रमाला..
विसरु देणार नाही मराठे..
त्यांना समजु नका एकटे.. ताकद आहे आमच्यात मर्दानी..
भगवा झेंडा हिच आमची निशाणी..
जे लागतील आमच्या नांदि..
मार खातील कुत्र्यावानी..
हो आहेच ती धमक आमच्यात..
हातपाय तोडायचा आला कि टपक्यात.. असाच नाहि म्हणत
दुनिया आमचा ईतिहासात सिंहाचा वाट..
आरे हो आहोच आम्ही..
एक मराठा..
स्त्रोत ..नव उदय

फक्त भगवा

जयतु हिँदु राष्ट्रम
.
पावसाच्या गारा मी,
सह्याद्रीचा वारा मी,
शीतलतेचा चंद्र मी,
मराठ्यांचा मर्द मी,
उफळता लाव्हा मी,
सह्याद्रीचा छावा मी,
मावळ्यांचे रक्त मी,
शिवबांचा भक्त मी
|| सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचेरक्त ||
||आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त ||
!! जय जिजाऊ !!
!! जय शिवराय !!
!! जय शंभुराजे !!
फक्त भगवा

जयतु हिँदु राष्ट्रम
.
पावसाच्या गारा मी,
सह्याद्रीचा वारा मी,
शीतलतेचा चंद्र मी,
मराठ्यांचा मर्द मी,
उफळता लाव्हा मी,
सह्याद्रीचा छावा मी,
मावळ्यांचे रक्त मी,
शिवबांचा भक्त मी
|| सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचेरक्त ||
||आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त ||
!! जय जिजाऊ !!
!! जय शिवराय !!
!! जय शंभुराजे !!
फक्त भगवा

Tuesday, June 26, 2012

आपले शंभुराजे..

आपले शंभुराजे....... .......
आपले शंभुराजे....... ........सिंहाच् या जबड्यात हात घालून दात मोजणारा आमचा शंभूराजा । बळीराजाचा अवतार म्हणजे शंभूराजा । शहाजीँचे स्वप्न म्हणजे शंभूराजा । सळसळत्या रक्तात धगधगता अंगार म्हणजे शंभूराजा । 14मे 1657 साली पुरंदरा वरती धुरंधराच्या पोटी जन्माला आलेला म्हणजे शंभूराजा । वयाच्या 2र्या वर्षी आईविना पोरका झालेला म्हणजे शंभूराजा । वयाच्या 9व्या वर्षी 4000 ची मन्सबदारी स्विकारणारा म्हणजे शंभू राजा । वयाच्या 10 व्या वर्षी आग्रेच्या भेटीला जाणारा शिवपुत्र म्हणजे शंभूराजा । वयाच्या 11व्या वर्षी 5000ची मन्सबदारी स्विकारणारा म्हणजे शंभूराजा । वयाच्या 13व्या वर्षी भर दरबारात रायप्पा महाराजांचा सत्कार करणारा सच्चा मित्र म्हणजे शंभूराजा । वयाच्या 14 व्या वर्षी बुधभूषनम् नावाचा संस्क्रूत महाग्रंथ लिहिणारा महान पंडीत म्हणजे शंभूराजा । वयाच्या 15 व्या वर्षी नतशिक ,नायकाभेद , सातसतक सारखे हिंदी ब्रिदभाषेतील , भोजपुरी भाषेतील ग्रंथ लिहीणारा महान हिँदी पंडीत म्हणजे शंभूराजा । वयाच्या 16 व्या वर्षी 10000 फौजेचे कुशल नेत्रूत्व करणारा कुशल सेनानी म्हणजे शंभूराजा । वयाच्या 17 व्या वर्षी छत्रपतीँच्या गादीचा पहिला युवराज म्हणजे शंभूराजा । वयाच्या 19व्या वर्षी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची देहू ते पंढरपूर ही जगातली पहिली वारी सुरु करणारा शिवबाचा धारकरी विठोबाचा वारकरी आणि वारकरी संप्रदायाचा आधार म्हणजे शंभूराजा । वयाच्या 23व्या वर्षी छत्रपतीँच्या गादीवर बसलेला दुसरा छत्रपती म्हणजे शंभूराजा । वयाच्या 23व्या वर्षापासून 32व्या वर्षापर्यँत इंग्रज , डच , पोर्तूगीज , फ्रेँच आणि मोगल या पाच महासत्तांशी प्राणपनाणे लढणारा , सह्याद्रीच्या वनामद्धे वनराजा प्रमाणे फिरणारा , वादळामद्धे दिवा बनूनजगणारा सळसळत्या रक्ताचा धगधगता अंगारम्हणजे शंभूराजा। वयाच्या 32व्या वर्षीया राष्ट्रासाठी व शिवाजी महाराजांच्या राज्यासाठी स्वतःच्यादेहाचं बलिदान करणारा आमचा शंभूराजा .........।

सह्याद्री -मानवंदना. . .. .

सह्याद्री -मानवंदना. . .. .
सह्याद्री नामा नग हा प्रखंड,हा दक्षिणेचा अभिमानदण्ड |
ज्वालामुखींनी जरी निर्मियेला,पवित ्र तो रामपदे जहाला |
शिरावरी शंभू विराजताहे,कन्या कुमारी पद धूत आहे |
स्कंधावरी दुर्गम दुर्ग ज्याच्या, हाती झळाळे परशु तयाच्या |
उन्मत्त निर्दालन दक्ष राही,निर्वासिता ं आश्रय लाभ देई ,
ही पुण्यभूमी तशी त्यागभूमी|
स्वातंत्र्यलक्ष ्मी तशी कर्मभूमी ||
आधार, आदर्श हि भारताला, प्रसाद त्याचाच आम्हामिळाला |
झेंडा तयाचा भगवा विराजे, तयापुढे मस्तक नम्र माझे |

तिच नाव लिहून...

तिच नाव लिहून लिहून पुसायला विसरून जातो
तिची जेव्हा आठवण काढतो विसरायला विसरून जातो

फार काही सांगायचं असत तिला जे हरुदयात आहे
पण जेव्हा पण भेटतो ऐकवायला विसरून जातो

आता तिच्या शिवाय दिवस सरता सरत नाही
पन नेहमी स्वप्नात तिला हे सांगायच विसरून जातो

माझी प्रत्येक संध्याकाळ सांगते विसर तिला आता
पण सकाळ झाली कि तिला विसरायचं हेच विसरून जातो .........

आठवण माझी आली कधी

आठवण माझी आली कधी
तर पापण्या जरा मीटून बघ.
सरलेल्या क्षनान्म्धले
संवाद जरा आठवून बघ.

आठवण माझी आली कधी
तर त्या वाट वळणाऱ्या वाटेवर बघ
त्या पाउल वाटेवरती
उमटलेली आपली पाउले बघ.

आठवण माझी आली कधी
तर उडणार्या पक्षांकडे बघ.
त्यांच्यासारखाच माझ मन
तूज्याकडे धावत आलेलं बघ.

आठवण माझी आली कधी
तर चांदण्या जरा मोजून बघ.
चांदण्या ratri घेतलेल्या शपथेचा
शब्द न शब्द आठवून बघ.

आठवण माझी आली कधी
तर सागरकिनारी जाऊन बघ.
हजारदा किनार्याला मीठीत घेऊन सुद्धा
परतणाऱ्या नीराश लाटेच वीव्ह्लन बघ.

आठवण माझी आली कधी
तर साद मला घालून बघ
तुझ्या अवतीभोवती फीरणार
माझ अस्तित्व जरा जाणवून बघ..

आहेत क्षण हे अपुरे,

आहेत क्षण हे अपुरे,
नाही लाभणार आयुष्य दुसरे.
फैलावून दे पंख भरारीचे,
तोडूनी बंधने, जग आयुष्य एकदाचे.
काळाच्या पडद्याआड, एक दिवस जायचे...
जग आयुष्य तू, ते उन , ती सावली, त्या पावसाचे,
जग तू वाट, सुखाची अन दुखाची, मैत्र पावलाचे.
जग तू आयुष्य, दात्या वृक्षाचे,
आयुष्यात कर्म फक्त परोपकाराचे.
काळाच्या पडद्याआड, एक दिवस जायचे...
जग तू आयुष्य, झुळझुळ झऱ्याचे,
खडतर प्रवासात, गीत गात वहायचे.
जग तू आयुष्य, गरुडझेपिचे ,
तोडून बंधने सारी आसमंत चुमण्याचे.
काळाच्या पडद्याआड, एक दिवस जायचे...
जग तू आयुष्य, तेवणाऱ्या दीपकाचे,
अंधारात वाट दाखवणाऱ्या, मार्गदर्शकाचे.
जग तू आयुष्य, त्या नाती, त्या मैत्री,
त्या प्रीतीचे,
देवू नकोस कोणा हृदया अबोलपण तुझ्या मनाचे.
काळाच्या पडद्याआड, एक दिवस जायचे...
जग तू आयुष्य, थोर माणसाचे,
माणुसकी जपणाऱ्या मानवाचे.
जग तू असे काही, मनांत ना काही राहायचे,
काळाच्या पडद्यावर ओळख करून जायचे.
काळाच्या पडद्याआड, एक दिवस जायचे...
जग तू आयुष्य, असे काही क्षणांचे,
काळाच्या मंचाने तुझे गीत गायाचे.
काळाच्या पडद्यावर, तुझी कीर्ती कोरण्याचे,
असुनी पडद्याआड, पण पडद्यावर चिरंजीव राहण्याचे.
काळाच्या पडद्याआड, एक दिवस जायचे..

जरा ऐक ना, काही सांगायचे आहे तुला...

जरा ऐक ना, काही सांगायचे आहे तुला.......
तुला भेटताना....
होणारी ह्रुदयाची धडधड ऐकवायची आहे मला,
तुला पाहताना......
हळूच झुकणारी माझी नजर दाखवायची आहे तुला,
तुझ्या बरोबर चालताना.....
हां रस्ता कधी संपू नये हे सांगायचे आहे तुला,
तू सोबत असताना....
सुर्याची किरणे देखील गार वाटतात हे सांगायचे आहे तुला,
तू नसताना.....
तुझाच चेहरा नजरेमधे असतो माझ्या हे सांगायचे आहे तुला,
तुज्या बरोबर बोलताना....
होणारी शब्दांची धडपड ऐकवायची आहे तुला,
तुझ्या शिवाय एक क्षण ही जात नाहीं माझा....
हे सांगायचे आहे तुला,
तुझ्या बद्दल माझ्या मनातल्या भावना सांगायच्या आहेत तुला.....
प्रेमातील नाजूक भावना सांगायच्या आहेत तुला..

माझी मर्हाठमोळी भाषा"

"माझी मर्हाठमोळी भाषा" माझ्या मर्हाठी मातीला गंध भक्तीच्या फुलांचा |ज्ञाना-तुकाने लावलावेळू ओव्या अभंगाचा ||
माझ्या मर्हाठी झेंड्याचीढाल जिजाई खंबीर |शिवबाच्या बाण्याम्होरंतुक े वैर्याचा खंजीर ||
माझ्या मर्हाठीची गोडीनसा नसात भिनते|साता समुद्रा पल्याडवारू मर्हाठी दौडते ||
मानी मर्हाठी ज्योतीलाछेडू नका कंदी कंदी |शे-शे मशालींची आगएका एका वाती मंदी ||
मर्हाठमोळी ही भाषासार्या विश्वात नांदते |तरी लहू मर्हाठीचेतीन रंगात रंगते ||
- मनोज वारुंगसे

कधी आलीस

कधी आलीस
तर नक्की येउन जा...........
तिथं जिथं ......
मी तुला नेहमी भेटायचो....
तिथं तुला आता.......
काहीच दिसणार नाही.......
तिथं दिसेल.....
फ़क्त तुला तुझ्या माझ्या आठवणींच अस्ताव्यस्त झोपड़
कधी आलीस तर नक्की कोणाला तरी विचार........
पुर्वीचा ओळखीचा पण सध्याचा अनोळखी
मी .. कुठे आहे???
तुला उत्तर मिळणार नाहीच.......... .
नंतर.....
तुझी पावल जड़ होतील तू माघारी फिरशील
डोळे ही पाणावतील तुझे थोड़े नंतर तू स्वताशिच म्हणशील
फ़क्त एकदा......
तुला भेटायचय .....
फ़क्त एकदा......!!

मला पुन्हा कॉलेजला येवू द्याना.... ... .. .

मी कॉलेजचा पहिला दिवस अजून सुद्धा आठवत होतो
त्यादिवशी वर जायचं कसं? ह्या भीती मुळे खालीच उभा होतो
खरतर कोणी नाही आहे आपल्या सोबत ह्याचाच विचार करत होतो
मला तर सगळ नवीन आहे, म्हणून फार अडखळत होतो
भीतभीतच का होई ना एक एक करत कॉलेज च्या पायरया चढत होतो
आठवतंय मला वर्गात सुद्धा एकटाच बेंच वर बसलो होतो
सुरवातीलाच काही अविस्मरणीय मित्राची ओळख झाली, धन्यवाद करतो त्यांना,
हात जोडून विनवणी करतो, मला पुन्हा कॉलेजला येवू द्याना.... ... .. .

कॉलेज मध्ये घालवलेला एक एक क्षण आठवत होतो
अजून काही मित्राची ओळख होवू दे, म्हणून वर्गातच बसलो होतो
नवीन नवीन होते कॉलेज म्हणून सर्व लेक्चर बसत होतो
समजत नव्ह्त सुरवातीला की, तरी मन लावून ऐकत होतो
नवीन नवीन असताना कॉलेज, मी कॉलेजला रोज येत होतो
पण कॉलेज सुटल्यावर मात्र खूप वेळ त्या मित्रासोबतच फिरत होतो
विसरू न शकणाऱ्या, त्या सर्व आठवणी, मला कोणी पुन्हा आणून द्या ना
हात जोडून विनवणी करतो, मला पुन्हा कॉलेजला येवू द्याना.... ... .. .

वर्गात मित्रासोबत घालवलेला एक एक क्षण पुन्हा आठवत होतो
बेंचवर सर्व मित्र एकाच बाजूला, ग्रुप नेच बसत होतो
सर जे काही सांगतात, त्यातल काही काहीच लिहित होतो
वहीवर नाही म्हणून काय झाले? बेंचवर सर्व कोरत होतो
सर्व मित्राची नावे पाठ होती, तरी बेंचवर लिहून काढत होतो
वहीची मागची पाने तर नवीन नवीन खेळ खेळूनच भरून घेत होतो
आता पुढे कोठल्याही खुर्चीत बसलो तरी पुन्हा एकदा बेंचवर बसू द्या ना
हात जोडून विनवणी करतो, मला पुन्हा कॉलेजला येवू द्याना.... ... .. .

कॉलेज मध्ये मित्रांबरोबर फिरलेला एक एक क्षण अजून एकदा आठवत होतो
वर्गातून कोणाला बाहेर काढलं तर सर्वच बाहेर जात होतो
वर्गात कमी पण कॉलेज समोर कट्ट्यावर रोज तासन तास गप्पा मारत होतो
नंतर नंतर सारे, डेफोल्तर (defaulter) लागलेल्या लेक्चरलाच बसत होतो
सकाळी सकाळी पहिल्या लेक्चरला फक्त चहाच पियुन येत होतो
म्हणून सारे जण त्या वडापावच्या गाडीवर रोजच जात होतो
ती कॉलेज ची सर्व वर्षे पुन्हा एकदा कोणीतरी <<<rewind करा ना
हात जोडून विनवणी करतो, मला पुन्हा कॉलेजला येवू द्याना.... ... .. .

कॉलेज मध्ये मित्रासोबत घालवलेले सर्व दिवस पुन्हा एकदा आठवत होतो
प्रोजेक्ट च्या नावाखाली भरपूर वेळा सायबर ला जात होतो
वर्षाच्या शेवटी शेवटी IMP QSTNS साठी वह्यासाठी फिरत होतो
परीक्षेच्या दिवशी मात्र रात्र रात्र भर जागत होतो
दगडूशेठला आम्ही सर्व परीक्षेच्या नंतरच जात होतो
FIRST CLASS, SECOND CLASS कशाला? पासा पुरतेच मार्क काढत होतो
अभ्यास थोडासाच करून पास झाल्याचा आनंद पुन्हा एकदा घेवू द्या ना
हात जोडून विनवणी करतो, मला पुन्हा कॉलेजला येवू द्याना.... ... .. .

कॉलेज नियम सुद्धा पुन्हा एकदा आठवून बघत होतो
कॉलेज चा आय.डी. मात्र कोणी सांगितल्या वरच घालत होतो
लाय्बरी मध्ये तासन तास, फक्त गप्पा मारायलाच बसत होतो
लेक्चर मध्ये मात्र पुस्तकात कमी पण MOBILE वरच जास्त लक्ष देत होतो
RECESS मध्ये सारे मित्र CORRIDOR मध्ये खूप ओरडत होतो
कॉलेज चे नियम मात्र काही जनासामोरच पाळत होतो
COLLEGE चे RULES & REGULATIONS पुन्हा एकदा BREAK करू द्या ना
हात जोडून विनवणी करतो, मला पुन्हा कॉलेजला येवू द्याना.... ... .. .

ह्यापुढे काय होईल आपले, ह्याचा आता विचार करत होतो
आता सुद्धा मी त्याच आठवणी काढत होतो
येथून पुढे सगळ्यांना लक्षात ठेवू, म्हणून मनालाच बजावत होतो,
एवड्या लवकर का संपले कॉलेज ? म्हणून वेळेला दोष देत होतो
असे वाटत मी लहानपणा पासूनच कॉलेज ला जायला पाहिजे होतो
परत चालू व्हावं माझे कॉलेज म्हणून देवालाच विनवत होतो
हे सगळे आठवल्य तर रडायला येतंय, एकदा तरी थोडेसे रडू द्या ना
मला कॉलेज ला पुन्हा जायचं ! हात जोडून विनवणी करतो, मला पुन्हा कॉलेजला येवू द्याना.... ... .


Sunday, June 24, 2012

आईची माया

ते लहानपनिचे दिवस
अजुनही आठवतात
ती आईची माया अजुनही
मनातल्या पारंब्या हलवतात.........

होते लहान जेव्हा
एक एक शब्द शिकाविलास
हातात हात घेउन
जीवनाची वाट दाखविलिस........

शाळेत जाताना सुद्धा प्रत्येक
गोष्ट हातात आणून द्यायची
वेळ होऊ नये म्हणून
सगळ्यानच्या आधी उठायची.......

चेह-यावरच्या दुखांना
नकळतच ओळखायची पण
स्वतःच्या दुखाह्ची मात्र
चाहुलसुद्छा लागु न द्यायची.....

मला ठेच लागताच
तिचा चेहरा पडायचा
आणि माझ्या अश्रुआधि
अश्रु तिचे गळायचे.....

कौलेजमधे असताना
मैत्रिनिसारखी वागायची
कौलेज मधल्या गमती-जमतीही
ती आनंदाने ऐकायची........

स्वतःची आवड बाजूला ठेउन
माझ्या आवडी निवडी सामभळायचि
नाही हा शब्द सुद्धा कधीही
कानी न पडू द्यायची......

मराठी पाऊल पडते पुढे .......

टेनिसची पंढरी मानल्या जाणा-या विम्बल्डनसह चारही ग्रँड स्लॅममध्ये गेली जवळपास 18 वर्ष नितिन कन्नमवार भारताचं प्रतिनिधित्व करताहेत. नितिन कन्नमवार हे जागतिक दर्जाचे टेनिस रेफ्री असून ते जगभरातील महत्त्वाच्या टूर्नामेंटमध्ये रेफ्रीची भूमिका चोख बजावताहेत.

जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये  एखाद्या प्लेअरप्रमाणे रेफ्रीही देशाचेच प्रतिनिधित्व करत असतात…मुंबईचे नितीनं कन्नवार गेल्या 18 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर टेनिस रेफ्री म्हणून भारताचं नाव उंचावत आहेत. विम्बल्डन, ऑस्ट्रेलिया ओपन, फ्रेंच ओपन आणि अमेरिकन ओपन या चारही ग्रँड स्लॅममध्ये नितीन कन्नमवार यांनी चेअर अंपायरिंग केलीय.

कन्नमवार यांच्या आतापर्यंतच्या कामगिरीमुळेच  इंटनॅशनल टेनिस फेडरेशनने त्यांच्यावर एशियन झोनलच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपवलीय. रेफ्रीची एक चुक मॅचचा निकाल फिरवू शकते..मात्र नितीन यांनी ही जबाबदारी ग्रँड स्लम आणि ऑलिंपिकमध्येही चोख आणि अचूक पार पाडलीय…...


मराठी पाऊल पडते पुढे .......
                                                                                   संदर्भ -झी 24तास 

Saturday, June 23, 2012

तिची अन् माझी अशी अचानकच पडली गाठ

तिची अन् माझी अशी अचानकच पडली गाठ
दर्शनी पाहता तिला माझी लागली पुरती वाट
हृदयाचे ठोके जसे ढोल वाजत होते
लटपट लटपट पाय तालावर नाचत होते

डावी भुवई उंचावून तिने एक कटाक्ष टाकला
प्रथमदर्शी प्रेमाचा मिळाला मला दाखला
तिचे लुकलुकले डोळे अन् गुलाबही उमलले
प्रीतीच्या फुलांचे गंध माझ्या मनी दरवळले

क्षणभर सर्वत्र स्तब्ध निरव शांतता पसरली
नजरेने नजरेला दिलेली साद मात्र समजली
सावरून बावरून तिने परतीची वाट धरली
दोन क्षणांची साथ, पण मनात कायमची भरली

एकदा मागे वळून पहावे मनाने केला अट्टाहास
आहे हे सत्य का होतोय मज हा भास
तिची धावती पावले माझ्या रोखाने येत होती
हात पसरून मी मिठीत घेण्याची दुरी होती

मला दूर सारून ती तशीच पुढे गेली
बिलगून त्या व्यक्तीच्या दुचाकीवर स्वार झाली
अशाप्रकारे माझ्या मनाचा झाला होता पचका
प्रथमदर्शी प्रेमाचा बसला मनाला धसका.................!!!!

ती दिसली.....

ती दिसली.....

भिजलेल्या डोळ्यातून आज, शब्द मनात उतरले
तिला पाहताच क्षणी, डोळ्यातून अश्रु बरसले.....

तिचीच आस धरून, आयुष्यात मी बिखरलो
नसताना ती जवळ, जगनेही मी विसरलो.....

तिचीच वाट पाहत, पापण्या माझ्या पाणवल्या
सावल्या डोळ्यातून ह्या, आभाळा सारख्या बरसल्या.....

खुप काही म्हणायच होता, शब्द माझे आतुरलेले
मुखातून न उमलता, डोळ्यातून उमललेले.....

म्हंटल ज़रा जवळ जाऊन, तिच्याशी थोड बोलाव
तिच्या आठवणीसंगे जगतो, तिलाही थोड कळाव.....

तिच्या आठवणीची ओंजंळ, तशीच भरून ठेवलेली
एकही क्षण न सांडवता, जिवापाड मी जपलेली.....

कंठ आज दाटून आला, तिला समोर पाहून
बरच काही बोलायच होत, मनात गेले शब्द राहून.....

इतक्यात तिने पाहिले मला, डोळ्यात अश्रु ढाळत
अनेक प्रश्नांची उत्तर मिळाली, मलाही न कळत.....

नव्हती ती आज माझी, झाली दुसर्या कोणाची
रेशम गाठी तुटल्या आमच्या, तरी सदैव राहिली ती या वेड्या मनाची...

भेट आपली शेवटची हसून निरोप घेत आहे

भेट आपली शेवटची हसून निरोप घेत आहे
वरून शांत असलो तरी हृदयातून रडत आहे

जात आहेस सोडून मला, नाही अडवणार मी तुला
असशील तिथे सुखी राहा, ह्याच माझ्या शुभेच्छा तुला

निरोप तुला देतांना अश्रू माझे वाहतील
काळजाच्या तुकड्यांना सोबत वाहून नेतील

त्या वाहणाऱ्या अश्रुतही प्रतिबिंब तुझेच असेल
नीट निरखून पहा त्यांना, प्राण त्यात माझा दिसेल

वाट आपली दुभंगली आता पुन्हा भेटणे नाही
प्रवास जरी एक आपला मार्ग एक होणे नाही

आठवण तू ठेवू नकोस, मी कधीच विसरणार नाही
भेटणे तुझे अशक्य तरी वाट पाहणे सोडणार नाही

जातेस पण जातांना एवढे सांगून जाशील का?
भेटलोच जर कधी आपण ओळख तरी देशील का?

जाता जाता थोडे तरी मागे वळून पाहशील का?
प्रत्येक्षात नाही तरी डोळ्यांनी काही बोलशील का?

बोलली नाही तू जरी, नजर तुझी बोलेल
गोंधळलेल्या अंत:कर्णाची खबर मला सांगेल

कोठेतरी हृदयात इतिहास सारा आठवशील
तो आठवण्या पुरता तरी, तू नक्कीच माझी राहशील!

नजरेने जरी ओळखलेस तू, शब्दांनी मी बोलणार नाही
तुझ्या माझ्या आयुष्यात नसती वादळ आणणार नाही

नेहमीच पराभव झाला तरी, हक्क तुझ्यावर सांगणार नाही
पण तुझी शप्पत सांगतो पुन्हा प्रेम करणार नाही......

छोटीशी मुलगी तिच्या बाबांबरोबर

एक
छोटीशी मुलगी तिच्या बाबांबरोबर
जात होती, एका पुलावर खूप वेगाने
पाणी वाहत होतं.
बाबा: बाळा, घाबरू नको.. माझा हात
पकड.
मुलगी: नाही बाबा, तुम्ही माझा हात
पकडा.
बाबा (हसत): दोघांमध्ये काय फरक
आहे बाळा?
मुलगी: जर मी तुमचा हात पकडला,
अन अचानक काही झालं, तर
मी तुमचा हात सोडून देऊ शकते.
पण जर तुम्ही माझा हात पकडला,
तर मला माहितीये की काहीही झालं
तरी तुम्ही माझा हात कधीच सोडणार
नाही..!!....

ती बोलत तर नाही तीचे डोळे खुप बोलतात,

ती बोलत तर नाही तीचे डोळे खुप बोलतात,
मी फक्त पाहात राहतो पाय आपोआप तीच्याकडे वळतात.

सतत कसला तरी वीचार करत असते,
काय माहीत तीच्या मनात काय चालते.

हासतानाही ती खुप कमी हासु पाहते,
पण हासताना तीच्या गालावर खळी पडते.

ती उभी असते तीथेच कुठेतरी मी ही उभा राहतो,
ती जवळ नसली तरी सहवास तीचा मला जाणवतो.

खरच भीती वाटते मला तीच्या जाण्याची,
माझ्या कवीतेत पुन्हा काळोख येण्याची.

ती आली होती प्रकाश बनुन माझ्या जीवनात,
आता जाणवतो सहवास तीचा ह्रदयाच्य स्पंदनात.

आता वाटते मला तीनेही माझ्यावर प्रेम करावे,
फक्त तीच्यासाठी असलेलं माझे प्रेम एकतर्फी नसावे..

प्रेम केले होतेस ना माझ्यावर..

प्रेम केले होतेस ना माझ्यावर..
मग का विश्वास ठेवला नशिबावर..
मी कधीच सोडणार नाही तुला
वचन दिले होते न तू मला..
मग ते तोडताना काहीच वाटले नाही तुला?

किती विश्वास ठेवला होता तुज्यावर ..
तू दाखवलेल्या त्या स्वप्नांवर..
किती विश्वास होता आपल्या नात्यावर ..
तू मैत्री आधी आणि प्रेमानंतर केलेल्या त्या प्रेमावर..

आई वडील तर मला पण होते खरे,.
तुज्यासाठी त्यांच्याशी खोटे बोलले ग..
आई वडिलांचे कारण देऊन तू मला कसे सोडलेस ग..
अचानक त्यांचे उपकार आठवून तुझ माझ ते प्रेमच नाते कस तोडलेस ग ..

का नाही लढलीस माझ्यासाठी..
आपल्या आपल्या त्या मैत्री नंतरच्या प्रेमासाठी..?
का प्रेम केले होतेस टाईमपास साठी..
कि माज्या भावनाशी खेळण्यासाठी..?

सांग ना का केलेस तू ते प्रेम
फक्थ मला सोडण्यासाठी....

प्रेम करा पण.......

प्रेम करा पण.......
जबाबदारीची जाणीव ठेवा
प्रेम करा पण.......
मर्यादा सोडू नका
प्रेम करा पण.......
दुस-यांना दु:ख देउ नका
प्रेम करा पण.......
एकमेकांची मनं ओळ्खा
प्रेम करा पण.......
सर्व गमावून बसू नका
प्रेम करा पण.......
आई वडिलांचा विचार करायला शिका.

प्रेम प्रेम आणि फ़क्त प्रेम,

प्रेम प्रेम आणि फ़क्त प्रेम,
आजकालच्या युगात लैला मजनूचा गेम,
मित्राची मैत्रिण पण आपला नेम,
प्रेम प्रेम आणि फ़क्त प्रेम . . .

... कॉलेजला जायचं फ़क्त नावचं असतं,
कट्यावर बसणं आमचं कामचं असतं,
भिडली नजर की झाला फेम,
प्रेम प्रेम आणि फ़क्त प्रेम . . .

प्रेमपत्र आणि कबुतरांचा जमाना गेला,
फेसबुक आणि मॅसेजेसचा जमाना आला,
भेटला नंबर की नाईट पॅक सेम,
प्रेम प्रेम आणि फ़क्त प्रेम . . .

कुणाची गर्लफ्रेंड कोण कुणाचा बॉयफ्रेंड,
पार्ट टाइम जॉब जसा, मधे स्टोरीचा दी एण्ड,
प्रत्येक वर्षी रिलेशन चेंज हा एकच ऐम,
प्रेम प्रेम आणि फ़क्त प्रेम . . .

वाट लागली देवा इथे खरया प्रेमाची,
किंमत नाही कोणाला काही कुणाच्या भावनेची,
कोण सांगेल अर्थ त्यांना, काय असते हे प्रेम,
प्रेम प्रेम आणि फ़क्त प्रेम . . .
भिडली नजर त्यांची आणि झाला गेम,
प्रेम प्रेम आणि फ़क्त प्रेम . . .

मन हे नेहमी फुलपाखरासारखं असायला हवं

मन हे नेहमी
फुलपाखरासारखं असायला हवं
एकीने नाही म्हटलं तर काय झालं?
लगेच दुसरीवर बसायला हवं..!

... मला पाहुन तु हसली नाहीस
असं कधी झालंच नाही
आपल्या मनात असुनसुद्धा
एकत्र होता कधी आलच नाही..!

तु माझी झाली नाहीस म्हणुन दुस-याची होऊ नये
असे मला वाटणार नाही..
ऍसिड फेकुन तुझं जीवन उध्द्वस्त करणं
हे कधीच मला जमणार नाही..!

तु सुखात आहेस हे ऐकुन
फार बरं वाटलं
यावरुन देवसुद्धा माणसांच ऐकतो
हे मला पटलं..!

तु समोर आलीस तरी
मला तुझ्याकडे बघवत नाही,
कारण तुझ्या मुलांच "मामा-मामा" म्हणनं
खरंच मला ऐकवत नाही...!

जर दहा लोक तुझी काळजी करत असतील,

जर
दहा लोक तुझी काळजी करत असतील,

तर
त्यापैकी एक मी असेन..

जर
एकचं जण तुझी काळजी करत असेल,

तर
तो मीचं असेन..

पण ?????

जर
कोणीचं तुझी काळजी करत नसेल,

तर
एवढे
नक्की की त्यावेळी मी ह्या जगात नसेल ♥ ♥ ♥

ती रुसली तेव्हा काय घडले

ती रुसली तेव्हा काय घडले…
मी तिला विचारले किती गं करतेस माझ्यावर प्रेम,
हसत म्हणाली माझ्या नजरेला जरा वाचत जा…
मी विचारले किती गं असे भेटायचे चोरून चोरून,
ती म्हणाली प्रेमात थोडासा धीर धरत जा…
मी म्हणालो आता मला तुझ्या साथीची गरज आहे,
ती म्हणाली त्यासाठी देवासमोररोज हात जोडत जा…
मी म्हणालो खूप ओझं झालंय एकाकीचं आता,
ती म्हणाली अरे वेड्या मग आठवणी थोडंसं रडत जा…
मी म्हणालो अरे पापण्या ओल्या होतात विरहात तुझ्या,
ती म्हणाली मुखवटे घालून थोडंसं हसत जा…
मी म्हणालो ऋतू सुद्धा माझ्यावर हसतो आहे,
ती म्हणाली अरे मग एक छानसी गझलऐकत जा…
मी विचारलं असतेस कुठे सध्या तू,
तेव्हा मात्र ती म्हणाली माझ्या श्वासांना तुझ्यातच कुठेतरी शोधत जा..
मी विचारलं हि कुठली रीत तुझी प्रेम करण्याची,
ती म्हणाली अरे प्रेमात कधी असाही एकमेव अनुभव घेत जा..
मी विचारलं आता किती वाट बघायची तुझी सखे,
ती म्हणाली नेहमीच तू तरसवतोस मला आता तू ही तरसून बघत जा..
मी म्हणालो आता पुरे तुझे रुसवे फुगवे अन पुरे तुझा नखरा,
ती म्हणाली अरे राजा, पुन्हा असं झालं तर मला सरळं बिलगत जा…;)
(¯`v´¯)
.`•.¸.•´
¸.•´.•´¨) ¸.•¨)
(¸.•´(¸.•´ (¸.•¨¯`* ♥ ♥~~

का आवडतेस इतकी?

का आवडतेस इतकी?
कसं ग सांगू.....
तुझी काळजी आवडली मला,
तुझी हुरुहूर आवडली मला,
... ... तुझं रागावणं आवडलं मला,
तुझं समजावणं आवडलं मला,
चेहऱ्यापेक्षाही तुझं मन आवडलं
मला......
नेहमी तुझं बोलणं मला खुप वेड
लावतं,
नेहमी तुझ्याच सहवासात रहावं
वाटतं,
जग
मला म्हणेलही वेडा.....पर्वा नाही मला,
इतकंच कळतंय कि "फक्त तूच
आणि तुच हवी मला"..
नावापुढे माझ्या मला...तुझंच नाव
हवंय,
छोटंसंच घरकुल....पण ते
तुझ्यासोबत हवंय,
किती दिवसाचं आयुष्य माझं
मला नाही ग ठाऊक,
दिवस नाही ढकलायचे
ग...मला तुझ्यासोबतचं जगणं
हवंय...
छळ म्हणून तरी एखाद्याने
किती ग करावा?
फक्त स्वप्नातच हात सांग
ना मी किती दिवस धरावा?
मनात ये माझ्या...ते कधी न
मोडण्यासाठी,
हातात घे हात माझा...तो कधी न
सोडण्यासाठी......
वाट पाहतोय मी...तू
वाऱ्यासारखी ये,
पण माझ्या जवळच थांब नेहमी...
वाहून नको जाऊस
त्या वाऱ्यासारखी.....दुसरीकडे..

ती - काय रे चूप का आहेस आज?

ती - काय रे चूप का आहेस आज?

तो - नाही ग कुठे काय

ती - मग कसला विचार करतोस एवढा?

तो - काही नाही ग कसलाच नाही

ती - मी ऐकलंय छान छान कविता करतोस, मग आता पण काही मनात चालाय का ?

तो - तसं काही नाही ग आता काही नाही आहे मनात आणि तुला कोणी सांगितलं मी कविता करतो ते?

ती - तुझेच सर्वे मित्र बोलत असतात खूप छान कवीता करतोस ते आणि मला संग माझ्यावर कधी कवीता केली आहेस का ?

तो - एकदम गप्प आणि मनातच बोलतो माझ्या कवीता तुझ्या पासूनच सुरु होतात आणि तुझा पासूनच संपतात

ती - काय रे गप्प का झालास परत बोलत नाहीस, चल आज तू माझ्यावर एक कवीता कर मला सुधा ऐकायची आहे कशी कवीता करतोस ते?

तो - मनातच बोलतो आज चांगली वेळ आहे सर्व सांगतो कवितेतून जे होईल ते होईलबघू पुढे

ती - करतोस ना कवीता आता आजून किती वाटबघायची आहे आणि तिच्या मनात सुधा हेच चाललं असता निदान कवितेतून तरी सर्व सांगेल जे माझ्या मनात आहे, बघू काय बोलतो ते

तो - मैत्री पासून आपलं नातं सुरु झालं
अनोळखी आपण एक मेकांशी बोलू लागलो
मैत्रीच नातं कधी घट्ट झालं हे कळलच नाही
मैत्री अशी होती कि सर्व गोष्ठी एकमेकांशी वाटू लागलो
मैत्री तुझी मला खूप आवडते
पण मन माझं कधी तुझ्या प्रेमात रंगायला लागलं कळलंच नाही
जेव्हा पासून आयुष्यात आलीस
त्या दिवसा पासून माझं आयुष बदलूनच गेलं
आता तुझी सवय झाली आहे मला
जेव्हा तुला भेटतो तेव्हा खूप छान वाटतं
तुझ्याशी दूर जावंसं वाटतच नाही
आणि तुला एक दिवस नाही भेटलो
तर मनात सारखं तुझाच विचार चालू असतो
तू समोर असलीस कि तुलाच बघावसं वाटतं
तू लांब असलीस कि नझर तुलाच शोधत असते
माझं दिवस तुझ्या पासून सुरु होतो
आणि रात्र तुझ्या आठवणीत संपते
आता तर माझं आयुष्य तुझ्या विना अधुरचआहे
मनापसून प्रेम करतो तुझ्यावर
पूर्ण आयुष्य जगायचा आहे तुझ्याच बरोबर
तुला खूप खुश ठेवायचं आहे आणि तुझं आयुष्य आनंदाने फुलवायचं आहे
पण तुझं मनात देखील तेच आहे जे माझ्यामनात आहे हे मला माहित नाही

ती - ऐकूनच डोळ्यात पाणी येतं आणि त्याचा मिठीत जाऊन रडू लागते आणि त्याला सांगते किती दिवस हे ऐकायची वाट बगत होते, एवढं वेळ लावलास बोलायला, माझ्यावर प्रेम करतोस मग माझं मन नाही ओळखलस का तू

तो - खरा सांगू मला देखील वाटत होतं तुझं माझ्यावर प्रेम असेल पण घाबरत होतो जर तसं नसेल तर एक चांगली मैत्रीण देखील गमविन मी पण आज ठरवलं जे होईल ते होईल तुला सांगणारच माझं प्रेम आहे तुझ्यावर, " I LOVE YOU "

ती - आनंदाचे अश्रू थांबतच न्हवते आणित्याला आपल्या घट्ट मिठीत घेऊन बोलते" I LOVE YOU TOOO "

तुझ्यावर जेवढं प्रेम केलं,

तुझ्यावर जेवढं प्रेम केलं,

तेवढं कोणावरचं केलं नाही..

पुन्हा कोणावर एवढं प्रेम करेन,

असं आता वाटत नाही..

माझ्या आयुष्यात जे तुला स्थान दिलं,

ते स्थान कोणी कधी मिळवलचं नाही..

पुन्हा ते स्थान कोणाला मिळेल,

असं आता वाटत नाही..

तुझ्याशी जे नातं जोडलं,

ते नातं कधी कोणाशी जोडलचं नाही..

पुन्हा कधी ते जोडेन कोणाशी,

असं आता वाटत नाही..

तुला जेवढं सामावून घेतलं
मी डोळ्यात,

तेवढं मी कोणाला पाहीलं देखील
नाही..

पुन्हा कोण ह्या डोळ्यात दिसेल,

असं आता वाटत नाही..

जी रहस्याची दारे तुझ्या समोर
उघडली,

ती दारे कधी कोणासमोर उघडलीचं
नाही,

पुन्हा ती दारे कधी उघडतील,

असं आता वाटत नाही..

कारण ?????

माझं जीवनचं एक रहस्य बनलय,

ते फक्त तुलाच उमगलेलं कोडं बनुन
राहिलय..

ते कोडं आता माझ्यानेही कधी सुटेल,

असं आता वाटत नाही..

कोणी स्वप्नांत येणं म्हणजे प्रेम की …

कोणी स्वप्नांत येणं म्हणजे प्रेम की …
कोणाच्या सहवासात स्वप्न जगल्यासारखं वाटणं म्हणजे प्रेम …

कोणावर विश्वास ठेवणे म्हणजे प्रेम की ….
कोणाचातरी विश्वास कधीच न तोडणे म्हणजे प्रेम...

कुणाला माफ करणे म्हणजे प्रेम की ….
कुणाची तरी उगीचच माफी मागणे म्हणजे प्रेम ….

कुणाकडून काही घेणं म्हणजे प्रेम की ….
न मागता कोणाला काहीतरी देणं म्हणजे प्रेम ….

कोणासाठी तरी रडणारं मन म्हणजे प्रेम की….
कुणाच्या तरी आठवणींत हसणारं मन म्हणजे प्रेम ….

कोणाशिवाय मरणं म्हणजे प्रेम की …
कोणासाठी जगणं म्हणजे प्रेम …

कोणासोबत चालणं म्हणजे प्रेम की ….
आयुष्यभर कोणासाठी थांबणं म्हणजे प्रेम ….

कुणीतरी सुखात असल्याचा आनंद म्हणजे प्रेम की ….
कुणाच्या तरी सोबतीताला आनंद म्हणजेच प्रेम….!!"

खरच..!! प्रेम नेमकी काय असतं..!!!

ती समोर असताना …

ती समोर असताना …मी सारं काही विसरावं..
तिने इश्य करत लाजावं.. मी ‘हाय हाय’ करत घायाळ व्हावं ..
तिने कित्ती सुंदर दिसावं.. जसं गुलाबाचं फूल उमलावं..
कोणाच्याही नजरेत भरावं.. तासन तास पाहत रहावं..

तिने कित्ती गोड बोलावं.. ऐकणाऱ्याने विरघळून जावं..
हरवूनच जावं .. सोबत तिच्या..
तिने कित्ती साधं रहावं .. त्यातही रूप तिचं खुलावं..
कोणीही फिदा व्हाव .. अदांवर तिच्या..

तिचं उदास होणं.. कसं हृदयाला भिडावं..
कोणालाही वाईट वाटावं.. अश्रूंनी तिच्या..
तिचं हसणं .. कोणालाही सुखवावं..
कोणीही घसरून पडावं.. गालावरल्या खळीत तिच्या..

तिच्या नजरेने मलाच शोधावं..अचानक नजरेने नजरेला भिडावं ..
मग तिने लगेच दुसरीकडे पहावं.. लाजेने चूर चूर व्हावं..
तिने फक्त माझंच रहावं.. मीही फक्त तिच्यासाठीच जगावं..
साथ देऊ जन्मोजन्मी ..विरहाचं दुख कधीही न यावं..
कधीही न अनुभवावं..

तुझ्यावर जेवढं प्रेम केलं,

तुझ्यावर जेवढं प्रेम केलं,
तेवढं कोणावरचं केलं नाही..
पुन्हा कोणावर एवढं प्रेम करेन,
असं आता वाटत नाही..
माझ्या आयुष्यात जे तुला स्थान दिलं,
ते स्थान कोणी कधी मिळवलचं नाही..
पुन्हा ते स्थान कोणाला मिळेल,
असं आता वाटत नाही..
तुझ्याशी जे नातं जोडलं,
ते नातं कधी कोणाशी जोडलचं नाही..
पुन्हा कधी ते जोडेन कोणाशी,
असं आता वाटत नाही..
तुला जेवढं सामावून घेतलं
मी डोळ्यात,
तेवढं मी कोणाला पाहीलं देखील
नाही..
पुन्हा कोण ह्या डोळ्यात दिसेल,
असं आता वाटत नाही..
जी रहस्याची दारे तुझ्या समोर
उघडली,
ती दारे कधी कोणासमोर उघडलीचं
नाही,
पुन्हा ती दारे कधी उघडतील,
असं आता वाटत नाही..
कारण ?????
माझं जीवनचं एक रहस्य बनलय,
ते फक्त तुलाच उमगलेलं कोडंबनुन
राहिलय..
ते कोडं आता माझ्यानेही कधीसुटेल,
असं आता वाटत नाही..I miss u

खूप प्रेम करतो तुझ्यावर,

खूप प्रेम करतो तुझ्यावर,
सत्य हे जाणून बघ,
एकदा तरी मला तू,
आपले मानून बघ.
वाट्टेल ते करेन तुझ्यासाठी,
तू फक्त सांगून बघ,
आयुष्भर साथ देईन तुझी,
एकदा आपले करून बघ.
तुझ्यासाठीच जगत आहे,
तुझ्यावरच मरत आहे,
असला जरी नकार तुझा,
तरी तुझ्या होकाराची वाट बघत आहे.
वाटलेच कधी तुला तर,
बघ प्रेम माझे तपासून,
पण मी खरंच खूप प्रेम करतो,
तुझ्यावर अगदी मनापासून.....!!
घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन
जरा जगून बघ माझ्यासाठी,
माझे प्रेम हे नेहमी असेच राहीन,
मनापासून..... फक्त तुझ्यासाठी....! !!!♥♥

आता होऊच शकत नाही

आता होऊच शकत नाही
काल ची रात्र पुन्हा येऊ शकत नाही

गेलेली वेळ पुन्हा येऊ शकत नाही
लुकलुकणारे तारे वाट पाहत थांबू शकत नाही

जेवढा विश्वास मी केला तिच्यावर
तो पुन्हा आता करु शकत नाही

वादळाचा सामना केला हि असता तुझ्यासोबत
पण मी वादळात एकटाच उभा राहू शकत नाही

कोरीच राहिली रोजनिशी त्यात शब्दच उतरले नाही
लेखणीच रुसून बसली जी आता कधीच लिहू शकत नाही

प्रेम खूप केले तिच्यावर
आता कुणावर करूच शकत नाही

खूप काही मनात आता ते पुन्हा होऊच शकत नाही ..!!

एक आस एक विसावा तुझा चेहरा रोज दिसावा,

एक आस एक विसावा तुझा चेहरा रोज दिसावा,
ज्या क्षणी तू माझी होशील तोच क्षण आपुला असावा

एक शब्द एक कविता तुझी प्रेरणा घेऊन लिहिता
मिटून जावा क्षणात एका तुझ्या माझ्या तील दुरावा

एक नाते एक धागा जुळून येणार्या बंधाला
साथ राहूदे शतजन्माची तुझ्या मनाची माझ्या मनाला

एक आठवण एकच साठा तुझ्या माझ्या प्रीतीच्या गाथा,
मानसीच्या चित्रकार कधीही फक्त आठव मला

एकच हाक, एकच साद, हास्य तुझे, मज सौख्याचा भाग,
एकच अश्रू डोळ्यात तुझ्या अन, माझ्या नयनी रात्रीची जाग.

आजुनही कळत नाही

आजुनही कळत नाही
हे आयुष्य कसे जपावे ?
मरता-मरता जगावे
की जगता-जगता मरावे ??

स्वताःच्याच मनाला
मीच कसे फसवावे ?
हसता-हसता रडावे
की रडता-रडता हसावे ??

सोबतीला कुणीच नाही
तर कुणासाठी थांबावे ?
गवसताना गमवावे
की गमवलेले गवसावे ??

यातना मनीच्या मांडताना
उगीच मनाला सावरावे ?
बिघडलेले सजवावे
की पुन्हा नव्याने बनवावे ??

आजुनही कळत नाही
हे आयुष्य कसे जपावे ?
मरता-मरता जगावे
की जगता-जगता मरावे ???????

आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...
बाकी सारे आकार, उकार, होकार, नकार मागे पडत चाललेल्या स्टेशनांसारखे मागे मागे जात जात पुसटत चालले आहेत पुसत जावेत ढगांचे आकार आणि उरावं एकसंध आभाळ.
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

तसा भूतकाळ त्याच्या छातीवर गवताची हिरवीगार कुरणं,
भरून आलेली गाफील गाणी, काळेसावळे ढग आणि पश्चिमेच्या वक्षाकडे रोखलेले बाणाकृतीतील बगळे...
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

बंध रेशमी तुझ्यासवे जे जुळले
अन् क्षितिजावर रंग नवे अवतरले
घन दाटताच एका क्षणात हे रंगबंध विस्कटले...तुटले....

विसरत चाललोय... नावेतून उतरताना आधारासाठी धरलेले हात
विसरत चाललोय होडीची मनोगते, सरोवराचे बहाणे,
वा नावेला नेमका धक्का देणारी ती अज्ञात लाट
ती लाट तर तेव्हाच पुसली... मनातल्या इच्छेसारखी
सरोवर मात्र अजूनही तिथेच...
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

पण त्याच्याही पाण्याची वाफ किमान चारदा तरी आभाळाला भिडून आलेली आता तर लाटा नव्हे, पाणी सुद्धा नवंय कदाचित
पण तरीही जुन्याच नावाने सरोवराला ओळखतायत सगळे...
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

क्षण दरवळत्या भेटींचे, अन् हातातील हातांचे
ते खरेच होते सारे..वा मृगजळ हे भासांचे
सुटलेच हात आता मनात हे प्रश्न फक्त अवघडले...तुटले...

तुझ्याकडे माझी सही नसलेली एक कविता...मीही हट्टी...
माझ्याकडे तुझ्या बोटांचे ठसे असलेली काचेची पट्टी
चाचपडत बसलेले काही संकेत, काही बोभाटे...अजूनही...
थोडेसे शब्द, बरंचसं मौन...अजूनही...
बाकी अनोळखी होऊन गेलो आहोत...
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

तुझा स्पर्श झालेला मी, माझा स्पर्श झालेली तू...
आणि आपले स्पर्श झालेले हे सगळे...
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

मज वाटायाचे तेव्हा हे क्षितिजच आले हाती
नव्हताच दिशांचा दोष, अंतरेच फसवी होती...
फसवेच ध्यास फसवे प्रयास आकाश कुणा सापडले...तुटले...

उत्तरे चुकू शकतात, गणित चुकत नाही...
पावले थकू शकतात, अंतरे थकत नाहीत...
वाळूवरची अक्षरं पुसट होत जातात..
डोळ्यांचे रंग फिकट होत जातात..
तीव्रतेचे उग्र गंध विरळ होत जातात..
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

शेपटीच्या टोकावरचे हट्ट सरळ होत जातात..
विसरण्याचा छंदच जडलाय आता मला..
या कवितांना, शहरभर पसरलेल्या संकेतस्थळांना...
विसरत चालल्या आहेत..
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

पत्ता न ठेवता निघून गेलेल्या वाटा..
विसरत चालले आहे तळ्यावर बसलेले पश्चिमरंगी आभाळ..
अन् विसरत चालले आहे...
आभाळही गोंदायला विसरणारे हिरवेगर्द तळे
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

मी स्मरणाच्या वाटांनी वेड्यागत अजून फिरतो
सुकलेली वेचीत सुमने, भिजणारे डोळे पुसतो...
सरताच स्वप्न अंतास सत्य हे आसवांत ओघळले...तुटले...

आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे.

आज एक नवीन कवी आलाय जन्माला

आज एक नवीन कवी आलाय जन्माला
नुकतेच एक प्रेमाची वेदना मिळालीय त्याला
प्रत्येक भावनेचा अर्थ त्याला आज कळतोय
प्रत्येक शब्द त्याला प्रामाणिक साथ देतोय
कविमन कविते मागून कविता लिहित गेले
स्वताच्या कवितेला प्रेमाचा वारस त्याने नेमले
रात्रभर जागून त्याने एक कविता लिहिली
अर्थ कुणालाच नाही कळला पण ती वेदना प्रत्येकाने जगली

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील तुला माझी आठवण होईल

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील तुला माझी आठवण होईल तुझ्याही डोळयांत तेव्हा माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल आठवणी जेव्हा माझ्या तुला एकांतात कवटाळतील तुझ्याही नजरा तेव्हा माझ्या शोधात सैरावैरा पळतील जेव्हा त्याला प्रेमाने बघशील तेव्हा तुला मी दिसेन... त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत तेव्हा फक्त मी असेन... तेव्हा तुला माझे शब्द पटतील तुझ्याही नजरेत तेव्हा... माझ्यासाठी अश्रू दाटतील.... माझ्यासाठी रडणारे ते अश्रू तेव्हा तुझ्यावरच हसतील कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!

आता तीच्यावर कवीता

आता तीच्यावर कवीता

मला सुचतच नाही.
कारण ती मला

आजकाल
दिसतच नाही.

सतत मी फक्त तीलाच
शोधत फिरत असतो.

पण ती दिसल्यावर तीला

न पाहिल्या सारखे भासवतो.

असे मी का केलं म्हणुन
स्वतावरच रागावतो.

खरच तीच्यवर प्रेम
तर मी खुप करतो.

पण तीला हे सांगायला
पण खुप घाबरतो.

तरीही सांगायचा तिला
निर्धार करतो.

पण ती नाही बोलली
तर माझे काय?

असाही
मी विचार करतो.

म्हणुनच थांबलोय मी
योग्य वेळेची वाट पाहत.

कढतोय प्रत्येक रात्र
तीच्या आठवणीत जागत.

शब्दच हरवले माझे...

शब्दच हरवले माझे...
तरीही प्रयत्न करतोय काही लिहायचे...

ओठ मुके झाले माझे...
तरीही प्रयत्न करतोय काही लिहायचे...

तुला काही सांगायचे...
आता तर जगच हरवलेय माझे...
तरीही प्रयत्न करतोय काही लिहायचे...

तरीही प्रयत्न करतोय
हरवलेल्या त्या प्रेमाला शोधायचे...

जोडले जे नाते

जोडले जे नाते
नात्यालाच भाव होतो
नाही जोडणार आता
कारण नंतर फार त्रास होतो

मनाने विचार करतांना
डोक्याचा फार राग होतो
नाही करायचा मनाने विचार
कारण नंतर फार त्रास होतो

कोणातरीसाठी विचार करण्यात दिवस असेच खपले
चुकिच्यावर प्रेम केलं
हे समजून स्वतःचा राग येतो
नाही जोडणार मनं आता
कारण नंतर फार त्रास होतो

तोच तोच चेहरा बघून
घडलेल्या गोष्टींची आठवण
आणि बिघडलेल्या नात्याचा भास होतो
नकोच आता तो विचार
कारण नंतर फार त्रास होतो

स्वतःला आता वेळ देण्यात
जीवनातं फक्त मी आणि कवितेचा विचार होतो
विचार विचार करून चांगल्या गोष्टींचा र्हास होतो
कारण नंतर फार त्रास होतो...

प्रेम हे काय असत

प्रेम हे काय असत
एका साठी फक्त आठवण तर
एका साठी काहीच नसत !

प्रेम हे काय असत
एका साठी फक्त विचार तर
एकाच्या ध्यानी-मनीच नसत !

प्रेम हे काय असत
एका साठी वेड लावणार तर
एकाला कोण हा वेडा हेच माहित नसत!

प्रेम हे काय असत
एकाच्या डोळी ओलावा तर
एकाच्या मुखी हास्य असत !

प्रेम हे काय असत
एकाला दूर जाऊनही जवळच वाटत तर
एकाला जवळ दूरचा प्रश्नच नसत !

प्रेम हे काय असत
एकाला आठवणीत रडणं असत तर
एकाला मस्त हास्यात जगन असत !

प्रेम हे असच असत
एकाला नेहमी दुख:च तर
एकाला त्याची जाणीव पण नसत !!!!!!!!

नाती हि आशीच असतात

नाती हि आशीच असतात

नात हे नात असत, आणि मानलेल नात हे कधीच नसत
मानलेल्या नात्याला ही पळवाट नेहमीच असते..
त्यासाठीच ते पकडून ठेवायचे असते..
नात असण्यात आणि मानण्यात जमीन आसमानाचा फरक असतो..
असलेल नात जड़ झाल तरी माणूस झिडकारू शकत नाही,
नाकारू शकत नाही..
मनातून उतरलेल्या व्यक्तिशी कोणतही नात ठेऊ नका..
अस नात फक्त त्रास देत..
पण मनाने जोडलेल्या नात्याला कधीही अंतर देवू नका..
कारण ते हृदयात बसलेले असते....

मुलींच्या नावावर कविता

मुलींच्या नावावर कविता

कवितेला मी माध्यम बनवून
एकचं अर्चना माझी जाणून,

कोणा समोर आणू दर्शना..

प्रकट करतोय माझी भावना,

प्रेरणा कुठे दिसत नाही..

स्वप्नासाठी जगतोय मीचं
माझी प्रतिमा पाहून,

जगी स्नेहाची ओळख देतोय
रेशमाचे जुने नाते..

अभिलाषा मनात आणते
आठवूण..

ती निवेदिता प्रचिती रसिका येते,

प्रीतिने मज फूल द्यावे
तृप्तीने नयनात झुलावे..

कोमल सरोज सुन्दर असुनही
प्रजक्ताला जवळ घ्यावे,

कल्पना कल्पिता मानसी चांदण्यात
कृतिका हसली,

संगीताशी इतकं नातं जुळलं
की सीमा सोडावी लागली..

विणाने वेडं केलं मैफिलीत शोभा आली,

मग मेघाने घोळ घातला
आणि रुचा निघून गेली..

श्रद्धा आली घेऊन ओढ़ लागलीँ,

भक्तीची मनात माझ्या पूजा ठेऊन
वाट पाहिली आरतीची..

अमृताचा शोध
घेतांना संजीवनी जीवनी आली,

समृद्धीच्या नादात
शांती विसरावी लागली..

आधी विद्या मग किर्ती निशा नंतर
उषा जशी,

आधी माया मग मोहिनी
छाया नंतर ज्योती जशी..

छाया नंतर ज्योती जशी.

मी…

मी…

तिच्या आठवणी पुन्हा पुन्हा आठवत असतो मी…

पावसाच्या थेंबात अश्रु लपवून रडत असतो मी…

तिला हसताना लपून बघत असतो मी…

दिवे सगळे दिवसांचे विझल्यावरहीका जळत असतो मी...

सगळे जग झोपल्यावरहीउघड् या डोळ्यानी तिचे स्वप्न बघत असतो मी...

ति भेटणार नाही हे माहित असतानाही तिची वाट बघत असतो मी...

माणसांच्या या इतक्या गर्दित तिच्याविना एकटाच आहे मी..

ते दिवस असे होते की

ते दिवस असे होते की,
कुणीतरी माझ्यासाठी झुरायची..

आणि मी फोन केला नाही की मात्र,
स्वःताचं फोन करून गप्पा मारायची..

ते दिवस असे होते की,
कोणीतरी माझ्यासाठी जुरायची..

आणि मी नाही बोलले की,
ती रड रड रडायची..

ते दिवस असे होते की,
माझा आवाज ऐकण्यासाठी कोणीतरी दहावेळा फोन करायची..

मी बिझी असेल म्हणून,
फोन करणं टाळायची..

ते दिवस असे होते की,

कोणीतरी मला भेटण्यासाठी,
नेहमी आतुर असायची..

मी येणार नाही म्हटले की,
डोळ्यात पाणी आनायची..

आज दिवस असा आहे की,
कुणीतरी विनाकारण मला टाळतेय,

काम नसेल तरी बिझी आहे रे म्हणून सांगतेय,

वेळ देऊनही फोन नाही करत..

आज प्रश्न असा आहे की,
का तिने स्वार्थासाठी नातं जोडलं..

का मैत्रीचं नाव घेऊन नातं तोडलं,

का माझं जीवन खराब केलं..

दु:खातही मी मात्र हसतोय,
आणि आता मात्र नुसते,

कुणासाठी तरी बेकार जिवन
जगतोय..

कुणासाठी तरी बेकार जिवन जगतोय..

मी असाच आहे

मी असाच आहे

कसाही असलो तरी
फ़क्त तुझाच आहे....

भेटलो नाही कधी तरी
भेट तुझी नि माझी नेहमीच आहे...

रागवणं हा तर फ़क्त बहाना आहे

प्रेम वाढविण्याचा हा नविन"Formula"आहे..

तुझी आठवण येते,हे तर कारण आहे

वेडे, तुला विनाकारण छळणं, हा तर माझा स्वभाव आहे...

गप्प कितीही असलो तरी
मनातुन बडबड फ़क्त तुझीच आहे...

कविता जरी माझी असली तरी
शब्द मात्र तुझेच आहे..

मी असाच आहे कसाही असलो तरी
फ़क्त तुझाच आहे....

आजकाल तुझी आठवण काढल्याशिवाय खरचं मला करमतचं नाही..

आजकाल तुझी आठवण काढल्याशिवाय खरचं मला करमतचं नाही..
तुलाचं शोधत असतो वेड्यासारखा पण तु सापडतचं नाही..

कारण ?????
तु असशील गं प्रेमाला टाईमपास समझनारी पण मी तसा नाही..

कारण ?????
माझ्या अंगवळणी तसे गुण नाही,
तुला तर कदाचित प्रेम म्हणजे टाईमपास शिवाय काहीचं वाटत नाही..

प्रेमात असतो महत्वाचा विश्वास तो तु माझ्यावर कधीचं ठेवला नाही..
जसे मला फसवलेस तु तसे मी कुणालाही फसवले नाही..

तु तर खेळून मोकळी झालीस गं ह्रदयाशी माझ्या,
पण माझे काय हाल झालेत ते तु कधीचं जाणलेचं नाही..

एक एक दिवस मोजुन काढतोय गं मी,
पण देव सुध्दा मरणही देत नाही..

प्रेम करताना ते कळत नसत

प्रेम करताना ते कळत नसत
आणि केल्यावर ते उमगत नसत...♥

उमगल तरी समजत नसत पण आपल वेड मन
आपलच ऐकत नसत...

प्रेमाची भावनाच खूप सुंदर असते ती फक्त
त्या दोन जीवांनाच माहित असते...♥

लोक म्हणतात काय असत प्रेमात..,
करून बघा एकदा..,

काय नसत प्रेमात...?
प्रेम हे सांगून होत नसत...
मित्रानो ते झाल्यावरच कळत असत..♥

दोन जीवांना जोडणारा तो एक नाजूक धागा असतो...
दोन हृदयांची स्पंदने एकमेकांना ऐकवणारा एक भाव असतो...♥

प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते...
दोन शब्दात ती कधीच समजत नसते ....♥

एक नाते मैत्रीचे असते

एक नाते मैत्रीचे असते
पण त्याला कधी नाव नसते
त्यात फक्त एक ओढ असते
आणि आपलेपणाची जाणीव असते
तिची कधी भाषा नसते
आणि तिची कधी जात नसते
त्याला कधी लिंग नसते
आणि तिचे कधी वयही नसते
त्यात कधी मदतीची हाक नसते
आणि कधी आभार प्रदर्शन नसते
ती एक प्रेमाने दिलेली शिवी असते
आणि चीडवण्यासाठी मारलेली टपली असते
ती दारूने भरलेली बाटली असते
आणि जळणारी सिगरेट असते
ती भांडणात बरोबरचा हात असते
आणि जखमेत मलम हि असते
ती mobile वरचा मिसकाल असते
आणि हसवणारा sms असते
तीच आपली सर्वात मोठी चाहती असते
आणि सर्वात मोठी टीकाहि तिचीच असते
ती आपले दुख कमी करते
आणि तीच आनंदहि वाढवते
ती जणू काही देवच असते
कारण दुखात आणि सुखात ती सारखीच असते
मैत्री न संपणारी नदी असते
आणि कारण तिला फक्त सुरवात असते!!

माझ्या साठी फ़क्त आता

माझ्या साठी फ़क्त आता
एवढच करशील का
तुझ्या लग्नाच आमंत्रण
मला देशील का ?
तुझ्या लग्ना मधे
मी नक्की नक्की येइन
शेवटच्या दिवशी तुला मी
डोले भरून पहिन
तो दिवस माझ्या साठीखुप दुखाचा असेल
त्या दिवशी माझ्या कड़े पाहून
हळूच हसशील का ?
तुझ्या लग्नाच आमंत्रण
मला देशील का
तू नाही बोलवलस तरी
सुधा येइन तुझ्या साठी वेटर्स च काम मी करीन
मी भरलेल जेवनाच ताट
तू खाशील का ?
तुझ्या लग्नाच आमंत्रण
मला देशील का ?
तो दिवस माझ्या साठी
खुप दुखाचा असेल
त्या दिवशी मी मंगल अस्टका गाइन
ती मंगल अस्टका खुप दूखाची असेल
ती ऐकून तू हळूच रडशील का ?
तुझ्या लग्नाच आमंत्रण मला देशील का?
जसा सग्ल्यांचा निरोप घेशील
तसा माझा सुधा घेशील का
डोळ्यात डोळे घालून मला
जाऊ का म्हणशील का ?
जस रोज take care ,
have a nice day
गाड़ी सावकाश चालव
अस बोलायाचिस तस् बोलशील का
तुज्या लग्ना च आमंत्रण मलादेशील का
कदाचित तुझ लग्न मला
नाही होणार सहन
माझ्या डोळ्यात माझ च
दिसल मला मरण
मी मेल्यावर गुलाबाच फुल
माझ्या फोटोला वाहशील का
तुझ्या लग्नाच आमंत्रण मला देशील का

तुला काल रडताना बघुन,

♥♥♥
तुला काल रडताना बघुन,
मला त्या पाण्याची खरंच किव आली..
मला त्याला विचारावंस वाटलं,"का रे बाबा,
तुला त्या डोळ्यांमधु न बाहेर पडावंस वाटलंच तरी कसं"??

आणि खळकन् पाणी म्हणालं
मीच जर बाहेर पडलो नाही
तर तू कसं मला झेलशील?
आणि त्या डोळ्यांना पुन्हा कसं हसवशील?
♥♥♥

इतकं सुंदर असूच नये एखाद्यानं,

इतकं सुंदर असूच नये एखाद्यानं,
नजर लागायची भीती असते...
पाहुनी आज कळले मला
परमेश्वराची कलाकृती किती असते....

... सौंदर्याने तुझ्या.....आज तू....
शब्दांना हि निशब्द केलंस,
त्याच सौंदर्याला... आज तू....
सौंदर्याचं उदाहरण दिलंस.

तुझ्या डोळ्यात रात्रीची निरागस शांतता आहे,
तुझ्या हसण्यात एक "विलक्षण" शक्ती आहे,
उगाच नाही मिळत हे असं...त्यातही देवाची भक्ती आहे...
क्षितिजा पलीकडेही बरेचसे क्षितीज
अजूनही पाहणे माझे बाकी आहे..

तिला आपण बोललो ILove You,

तिला आपण बोललो ILove You,
ती पण लगेच बोलली Love You Too!!
आपण झालो जाम खुश,
समजू लागलो स्वत:ला George Bush.
... मग रोज planning तिला भेटण्याची,
काम धंदा विसरून गेलो full to!!
ती द्यायची miss call फक्त,
म्हणे balance नाही रे मी काय करू.
आपण commitment दिली तिला.
बोललो रोज recharge करतो phone तुझा.
विसरू नको call करायला दिवसातून,
One time तरी आवाज ऐकायचाय तुझा.
तिच्या beautiful चेहर्या वर smile बघायला,
भेंडी, राडा केला आपण सगळ्यांबरोबर.
एकदा पाहिलं फिरत होती दुसर्याआबरोबर hand in hand,
बोललो आज तर नक्की वाजवतो हिचा band!!
तिला विचारलं what is this?
तिने फक्त सांगितलं excuse me please.
तुझ्या style मध्ये काही दम नाही,
हो माझा ATM जाणार, पण त्याचं गम नाही.
आपण किती first class स्वप्नं रंगवलेली,
तिने heart break करून सगळं चौपट केला.
साला love फक्त आपणच करत होतो,
तिने full to आपला पोपट केला.
पण त्या side heroin ला काय वाटतं,
तिच्याशी break-up झाल्यामुळे आपण रडत बसणार.
अरे तिच्या मावशीचा तम्बुरा,
तिच्यापेक्षा मस्त, भारी item पटवणार

ती आपली खास मैत्रीण...!!!

ती आपली खास मैत्रीण...!!!

Facebook वर आपल्या खूप मैत्रिणी असतात,
पण जी आपल्याला पाहुन online येते ना,
ती आपली खास मैत्रीण असते.
...
जी आपल्या वर विश्वास ठेऊन मोबाईल नंबर देते
ती आपली खास मैत्रीण असते.

जी आपल्याला रोज SMS करते,
आणि जिच्या SMS la

आपल्याला पण छान Reply द्यावसा वाटतो ना,
ती आपली खास मैत्रीण असते.

जिच्याशी बोलताना आपल्याला खूप मजा येते,
पण तिच्या नजरेला नजर देऊन आपण कधी बोलू शकत नाही,
ती आपली खास अशी मैत्रीण असते.

तिची पण अवस्था काही निराळी नसते,
कारण, ती पण आपल्याशी बोलणे टाळत असते ना,
ती आपली खास अशी मैत्रीण असते.

कधी मित्रमैत्रिणींशी बोलताना जी आपली बाजू घेऊन बोलते ना,
ती आपली खास मैत्रीण असते,

जिच्या प्रेरणेमुळेच
आपल्याला अशी कविता करावीशी वाटते,
आणि जी आपल्या अशा कवितांना नाही आवडल्या तरी,
छान होती... अशी एक दाद देते ना,
ती आपली खास अशी मैत्रीण असते...

सांडले तुझे प्रेम नदीच्या धारेत..

सांडले तुझे प्रेम नदीच्या धारेत..
कस मी ते शोधू सांग आता..
तुझ्या प्रेमाचा रंग कसा का असेना
त्यात त्याचा एक थेंब पण दिसेना..
जरी मी असलो घार..
पण ती आहे नदीची प्रेमाची धार..
म्हणूनच प्रिये तू मला माफ कर
मी नाही शोधू शकणार..
तुझ्या त्या खोट्या प्रेमाची सर ..

माझ्या आई च प्रेम म्हणजे नदीची धार..
आणि बापान दिलाय मला प्रेमाचा सागर..
त्यांच्या प्रेमाची चव पण आहे..
आणि सुंदर रंग पण आहे..
जरी तुझ्या खोट्या प्रेमाला तिने धारेत सामावून घेतलं.
पण प्रिये तूझ प्रेम त्यात विरघळून गेल..
आणि खरच एक अंश पण उरला नाही..
आणि तुझा प्रियकर त्याला शोधू शकला नाही

जर खरच तुझ प्रेम खर असत..
त्याला खरी चव असती
तू विरघळली नसती तर ..
बाष्प होवून हवेत सामावली असतीस
आणि मी चकोर बनून तुझ्या प्रेमाला
चाखल असत...आणि हृदयात ठेवलं असत..
खरच माफ कर प्रिये..

माझ हृदय पण भरून गेलंय..
आणि तुझ प्रेम पण मरून गेलंय..
म्हणून तुला त्यात जागा नाही..
तुझ्या रोगी प्रेमाला ठेवून..
मी इतर पेमाला दुषित करणार नाही..
आणि आयुष्यभराचा पश्याताप करणार नाही
खरच माफ कर................................

तू समजुन का घेत नाही..........



तू समजुन का घेत नाही..........
कसं गं तुला काही समजत नाही !
साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,
तुझ्याशिवाय मला राहवत नाही !

इतक्या सहजासहजी जाऊ का विचारतेस,
भावना का माझ्या तुला जाणवत नाही !
साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,
तुझ्याशिवाय मला करमत नाही !

तू दुर असलीस की जगही खायला उठतं,
कशातच लक्ष माझं लागत नाही !
एवढही तुला कसं कळत नाही,
तुझ्याशिवाय माझ्या जगण्यालाच अर्थ नाही !

कधी कधी असं वाटतं,
तू फक्त दाखवतेस की तुला समजत नाही !
माझ्या भावना तू चांगल्या जाणतेस,
पण मुद्दामच तू मला भेटत नाही !!

न भेटण्याने आता काही होणार नाही,
मी तुझ्याशिवाय क्षणभरही जगु शकणार नाही !
आपले मिलन ही तर दैवाचीच इच्छा,
त्याला तू किंवा मी टाळु शकणार नाही !!

तुझं नि माझं जन्मोजन्मीचं नातं आहे,
हा काही आज उद्याचा खेळ नाही !
तुझ्याशिवाय मी आणी माझ्याशिवाय तू,
असं स्वप्नातही शक्य होणार नाही !!

किती साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,
तू हे समजुन का घेत नाही.

|| डोळे ||



कितीदा तरी माझ्याशी,
तुझे बोलतात डोळे....
गूढ तुझ्या मनाचे,
अलगद खोलतात डोळे .....

ओढ तुझी माझ्या मनाशी,
तुझे सांगतात डोळे...!
तहानलेल्या चातकापरी त्या,
कधी वाट पहातात डोळे....!!

तू अबोल जरी प्रिये ग,
पापणी झुकवून बोलतात डोळे...!
कधी क्रोध तुझ्या मनाचा,
कटाक्षातून तीर फेकतात डोळे....!!

समोर तुला पाहतांना,
आपुलेपण जपतात डोळे....!
आठवणीत कधी-कधी,
रात्र सारी जागतात डोळे....!!

अव्यक्त भावनांना,
शब्द पुरवितात डोळे...!
भेटीत कधी कुणाच्या,
नाते जुळवितात डोळे....!!