माझं विश्व, मराठी...... माझं स्वत्व, मराठी...... माझं ह्रदय, मराठी...... माझं मनही, मराठी...... माझी निर्मळता, मराठी...... माझी रसिकता, मराठी...... माझं दैवत, मराठी...... माझी प्रत्येक निर्मिती, फक्त तुझ्याच साठी.... माझं प्रेम, मराठी...... माझा श्वास, मराठी...... माझा हळवेपणा, मराठी...... माझे शब्द, मराठी...... मराठी......
Showing posts with label मैत्री. Show all posts
Showing posts with label मैत्री. Show all posts
Wednesday, June 27, 2012
Wednesday, April 25, 2012
छोटीशी पण मध्यम वर्गीय प्रियकराची गोड प्रेम कहाणी,
छोटीशी पण मध्यम वर्गीय प्रियकराची गोड प्रेम कहाणी,
प्रियकर :- हा बघ मी नवीन मोबाईल घेतला .....
प्रेयसी :- सहीच, मोठ्ठी पार्टी पाहिजे ..... :-))
( संध्याकाळी प्रियकर तिला ताज हॉटेल मध्ये घेऊन जातो व बोलल्याप्रमाणे मोठ्ठी पार्टी देतो , तेव्हा पार्टी नंतर ........ )
प्रेयसी :- तू एवढे पैसे कसे म्यानेज केलेस ??? प्रियकर :- माझा मोबाईल विकला ..
यालाच म्हणतात निस्वार्थी प्रेम
किती कठीण असतं
किती कठीण असतं
वाट्याला आलेलं आयुष्य मनापासून जगणं,
हवा तो आकार देणं. .
किती कठीण असतं
हवं तिथं पोहोचणं,
उघड्या डोळ्यांनी स्वप्नं पाहणं..
किती कठीण असतं आपली वाट निवडणं,
कडवटपणा गिळून सारा गोडवा टिकवून ठेवणं..
किती कठीण असतं नको त्या माणसांत मिसळणं,
आणि हव्या त्या माणसापासून दूर जाणं...........!
एकटी
एकटी
हि कथा आहे निकिता आणि संजयची.....आज सात वर्षांनी निकिताच्या चेहऱ्यावर
आनंदओसंडून वाहत होता. किती दिवसाची प्रतीक्षा आज संपल्यासारखी तिला वाटत
होती.
आधी:
तीच संजयवर एकतर्फी प्रेम होत ते क्लासमध्ये नववीत
असल्यापासून, तिला तो खूप आवडायचा पण तिने कधीच त्याला ते सांगायची हिम्मत
केली नव्हती. तो तिला फक्त क्लासच्या वेळेतच समोर दिसायचा. तिला बाकी काहीच
माहिती नव्हती त्याच्याबद्दल. आणि स्वभावाने खूप लाजाळू
असल्यामुळे तिने त्याच्या बद्दल कधी तिच्या मैत्रिणींकडे सुद्धा विषय
काढला नाही. पण तिने शेवटी ठरवले कि क्लासच्या शेवटच्या दिवशी त्याला
सांगायचं कि माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू मला आवडतोस. पण नियतीच्या
मनात काही वेगळ होत. क्लासचा शेवटचा दिवस होता २५ मार्च पण त्या आधीच एक
आठवडा संजयचा अपघात झाला आणि तो त्या अपघातामुळे ती शेवटची परीक्षा पण देवू
शकला नाही. त्यामुळेच त्याच क्लासला येनच काय घरातून बाहेर पडण पण बंद
झाल. तिने खूप प्रयत्न केला त्याला contact करण्याचा पत्ता शोधून ती त्याला
भेटायला त्याच्या घरीपण गेली. पण आता तिला ते विचारण शक्यच नव्हत.
तिने विचार केला कि हा यातून पूर्ण बारा झाला कि नक्की विचारू. पण त्याच
वर्षी संजय ते शहर सोडून दुसरीकडे शिफ्ट झाला. आणि निकिताच्या सर्व
अशा-आकांशधुळीत मिळाल्या. ती खूप रडली जमेल तितका प्रयत्न केला त्याचा
ठावठिकाणा शोधण्याचा. पण एकाही मैत्रिणीला तिने हे न सांगितल्यामुळे तिला
कुणाची मदत पण नाही मिळाली. आता त्या गोष्टीला सात वर्षझाली होती अजूनही
तिने मनातून संजयलाच आपला life partner म्हणून निवडलं होत. तिने Facebook
वर account बनवल होत. तिला मैत्रिणींकडून कळाल होत कि आपले सर्व शाळेतले
मित्र-मैत्रिणी facebook वर आहेत. म्हणून तिनेही सर्च केल आणितिला आज
संजयचं profile दिसल.तिने त्याला request पाठवली. आणि बरोबर message करून
आपली ओळख करून दिली. त्याच दिवशी संजयने requestaccept केली. तिने संजय कडे
त्याचा नंबर मागितला होता तो त्याने तिला दिला. मग तिने त्याला कॉल करून
खूप गप्पा मारल्या क्लास मधल्या गमती जमतींच्या. आणितिने संजयला भेटायला
बोलावल संजयने तिला सांगितल कि तो आज खूप buzy आहे तर आपण उद्या भेटू.
भेटीचा दिवस
"मी तुला ओळखलंच नाही कशी दिसायचीस तू क्लासमध्ये असताना आणि आता totally different "
"हो रे थोडा बदल झालाय खरा, पण तू मात्र अजूनही तसाच दिसतोयस, कस चाललाय?"
"माझ एकदम मजेत, अजून कोणी आहे का तुझ्या contact मध्येक्लास मधले"
"हो रे त्या क्लास मधल्या सर्व मैत्रिणी आहेत संपर्कात. पण तू तर अचानक गायब झालास"
"हो ग नवीन घर घेतल होत आणि आम्ही शिफ्ट होणारच होतो त्यावर्षी...so झालो एकदम अचानक"
"लग्न कधी करतेयस? का झालपण?"
"नाही रे अजून नाही......कुणाच ीतरी वाट बघतेय म्हणून अजूनथांबलेय
लग्नासाठी....पण आता विचार सुरु आहे बघू कदाचित लवकरच.....ये पण तुझ झाल का
लग्न?"
"मागच्याच वर्षी झाल 'LOVE MARRIGE ' जरा लवकरच झाल पण जो होता हैं वो अच्हे के लिये होता हैं.......अस विचार केला आणि केल लग्न"
बस त्यानंतर निकिता फक्त रडायची बाकी होती.....तिने कसातरी पटापट तिथून
निघण्याचा प्रयत्न केला....संजयला पण थोड विचित्र वाटल पण त्यालाही घाई
असल्यामुळे तोही निरोप घेवून तिथून निघाला. त्यानंतर अक्खी रात्र तिने रडून
रडून घालवली. आता हाच मोठा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला ज्या प्रेमाची
सात वर्ष वाट बघितली त्याचाअंत अस सात मिनिटात का झाला?
आभार - मी मराठी असल्याचा अभिमान आहे
किती कठीण असतं
किती कठीण असतं
वाट्याला आलेलं आयुष्य मनापासून जगणं,
हवा तो आकार देणं. .
किती कठीण असतं
हवं तिथं पोहोचणं,
उघड्या डोळ्यांनी स्वप्नं पाहणं..
किती कठीण असतं आपली वाट निवडणं,
कडवटपणा गिळून सारा गोडवा टिकवून ठेवणं..
किती कठीण असतं नको त्या माणसांत मिसळणं,
आणि हव्या त्या माणसापासून दूर जाणं.!♥♥
मैत्री जिवाभावाची..............
मैत्री जिवाभावाची
खरंच
मैत्रीचा बंध अतूट असतो. बघा ना दुडूदुडू चालणारं बाळ आपल्याच वयाइतक्या
मुलाकडे बघून खुदकन हसते. त्याने दिलेली ती मैत्रीची हाक असते. हळूहळू मोठं
होत असताना आपल्याच वयाच्या मुलांमध्ये आपण रमायला लागतो. इथूनच खरी
मैत्रीच्या नात्याला सुरवात होत असते.
माझं बालपण महाडजवळील बिरवाडी या छोट्याशा खेड्यात गेले. आजूबाजूला खूप मित्रमैत्रिणी होत्या. खेळायला मोठे अंगण होते. अशीच माझी बालपणीची एक मैत्रीण आहे, जिच्याबद्दल मला एक प्रसंग आठवतो. आमचे घर कौलारू, मातीच्या भिंती व चूल अशा पद्धतीचे होते. संध्याकाळी चुलीला पातेरे घालून म्हणजे लाल मातीने चूल सारवून घ्यायची व पुढचा भाग शेणाने सारवायचा अशी पद्धत होती. संध्याकाळी माझी शिकवणीला जायची गडबड असायची. माझी मैत्रीण नयना माझ्याकडे यायची. माझे आवरले नसेल तर ती स्वतः जमीन सारवायला घ्यायची, जेणेकरून आम्ही दोघी वेळेवर शिकवणीला पोचू. एवढी निर्वाज्य मैत्री आता बघायलाही मिळत नाही. आम्ही दोघी मिळून खळाळत्या पाण्यात खडकावर बसून अनेक स्वप्नं बघितली होती. आता आमची गाठभेट कार्यक्रमापुरतीच व फोनवरच होते.
आमचे कापडदुकान असल्यामुळे दुकानचा माल आम्ही महाडहून आणत असू. मी कॉलेजला गेल्यावर येताना कापड खरेदी करत असे. माझी एक ना एक तरी मैत्रीण बरोबर असे. क्लासपासून दुकान लांब होते. तिथपासून गच्च भरलेल्या कापडाच्या पिशवीचा एक बंद माझी मैत्रीण धरत असे. त्या वेळी रिक्षा करणेही परवडत नसे. माझ्या मैत्रिणींची सांपत्तिक स्थिती चांगली होती. तरी त्या मला जी मदत करत ती फार मोलाची होती. आजही आम्हा चौघींची मैत्री अबाधित आहे. कुठल्याही वेळी, कुठेही काही निमित्ताने भेटलो तरी लग्नाआधीच्या सगळ्या आठवणी उचंबळून येतात. दोनच महिन्यांपूर्वी यांतील एका मैत्रिणीचा फोन आला. दोघींनाही वेळेचे भान राहिले नाही. सरत्या काळातील आठवणी, ज्या गोष्टी करायला लग्नाआधी जमले नाही त्या करण्याची धडपड व वयानुसार होत गेलेले बदल यावर मनमुराद गप्पा झाल्या. अखेर माझ्या मुलाने "आई बॅडमिंटनला मला जायचे आहे' अशी आठवण करून दिल्यावर आमचा आठवणींचा ओघ थांबला.
नंतर लग्न झाल्यावर नवीन ओळखी झाल्या. नवऱ्याचे मित्रमंडळ, मुलाच्या शाळेसंदर्भातल्या, खेळाच्या इथल्या अशा अनेक मैत्रिणी मिळत गेल्या. असेच माझे एकदा मोठे ऑपरेशन झाले. डॉक्टरांनी घरी जायला परवानगी दिली व गाडीतून जा म्हणाले. त्या वेळी आमच्याकडे गाडी नव्हती. मी माझ्या मैत्रिणीला फोन करून सांगितले. ती तिची चारचाकी गाडी घेऊन मला न्यायला आली. अशा वेळी आपण आपल्या मैत्रिणीला हक्काने सांगू शकतो.
माझ्या प्रेग्नसीच्या काळात मला गाडी चालवायची नव्हती. तेव्हा माझी ऑफिसमधील मैत्रीण मला संध्याकाळी तिच्या गाडीवरून घरी सोडत असे. माझी मैत्रीण माझ्यापेक्षा लहान होती. अत्यंत काळजीपूर्वक गाडी चालवत असे. एवढेच नाही, तर तिने तिच्या आईला सांगून माझे डोहाळेजेवणही केले. खरंच ते दिवस आठवले तरी आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला अशा मैत्रिणी मिळत गेल्या, याचा अपार आनंद होतो.
खरंच आपण आपल्या आयुष्याचा लांबचा पल्ला गाठत असतो. अशा वेळी सुख-दुःखात साथ द्यायला, वेळ पडलीच तर सावरायला, काही चुकत असेल तर सांगायला, आनंदात सहभागी व्हायला आपल्याला मित्रमैत्रिणी उपयोगी पडतात. आयुष्याच्या एका ठराविक वळणावर मित्र-मैत्रिणींची फार गरज असते. मन मोकळे करण्याची ती एक जागा असते.
""मैत्री असावी जिवाभावाची
सुख-दुःखातील सहभागाची
हसताना हसणारी, अश्रूही पुसणारी
यशामध्ये पाठ थोपटणारी
आठवणीत रमून जाणारी.''
लेखिका -
संदर्भ - सकाळ पेपर
Subscribe to:
Posts (Atom)