माझं विश्व, मराठी...... माझं स्वत्व, मराठी...... माझं ह्रदय, मराठी...... माझं मनही, मराठी...... माझी निर्मळता, मराठी...... माझी रसिकता, मराठी...... माझं दैवत, मराठी...... माझी प्रत्येक निर्मिती, फक्त तुझ्याच साठी.... माझं प्रेम, मराठी...... माझा श्वास, मराठी...... माझा हळवेपणा, मराठी...... माझे शब्द, मराठी...... मराठी......
Saturday, June 23, 2012
|| डोळे ||
कितीदा तरी माझ्याशी,
तुझे बोलतात डोळे....
गूढ तुझ्या मनाचे,
अलगद खोलतात डोळे .....
ओढ तुझी माझ्या मनाशी,
तुझे सांगतात डोळे...!
तहानलेल्या चातकापरी त्या,
कधी वाट पहातात डोळे....!!
तू अबोल जरी प्रिये ग,
पापणी झुकवून बोलतात डोळे...!
कधी क्रोध तुझ्या मनाचा,
कटाक्षातून तीर फेकतात डोळे....!!
समोर तुला पाहतांना,
आपुलेपण जपतात डोळे....!
आठवणीत कधी-कधी,
रात्र सारी जागतात डोळे....!!
अव्यक्त भावनांना,
शब्द पुरवितात डोळे...!
भेटीत कधी कुणाच्या,
नाते जुळवितात डोळे....!!
Wednesday, April 25, 2012
छत्रपती संभाजी
एक ग्रंथ जो गागाभट्ट नी लिहिला होता त्या ग्रंथाचं नाव आहे 'समनयन'.
त्या ग्रंथाच्या पहिल्या पानावरती जे समर्पन आहे त्यात असं लिहिलं आहे,
'ज्याच्या पराक्रमाने दाही दिशा तळपतात अश्या शंभू राजांच्या त्या पवित्र विचारांना समर्पित.'
संभाजी महाराजांची विद्वत्ता काय आहे हे गागाभट्ट त्यांच्या प्रस्तावन्या मध्ये लिहितात.
संभाजी महाराजांनी स्वत: ४ ग्रंथ लिहिले हे तर आपल्याला माहिती आहे.
वया च्या १४ व्या वर्षीपहिला ग्रंथ लिहायला सुरवात केली आणी २० व्या वर्षी पुर्ण केला लो म्हणजे 'बुद्धभुषण'.
भल्या भल्या पंडितांना तोंडात बोट घालायला लागतील असा तो बुद्धभुषण ग्रंथ
आहे. त्यातलं एक वाक्य असं आहे की बांबुच्या झाडाला शंभर वर्षा नंतर फुलं
येतात आणी फुलं आल्या नंतर ते झाडमरत असतं.
याचा अर्थ असा की संभाजी महाराज फक्त साहित्यिक नव्हते तर इतर व्याव्हारिक न्यान हवं ते सुद्धा भरपूर होतं.
संभाजी महाराजांनी आणखी ३ ग्रंथ लिहिले वयाच्या ३० व्या वर्षा पर्यंत.
'नखशिख'
'सातसतक'
आणि 'नाइकाभेद'.
नाइकाभेद मध्ये न्रूत्याचे प्रकार किती असतात हे लिहिलं आहे. आज जे आपण भरतनाट्यम पाहतो ते भरतनाट्यम नाइकाभेद वरती आधारित आहे.
भरतनाट्यम या न्रूत्य प्रकाराचे जनक संभाजी महाराज आहे याचा पुरावा
नाइकाभेद मध्ये सापडतो. नाइकाभेद हे संभाजी महाराजांनी लिहिलेल दुसरं
ग्रंथ.
तिसरं ग्रंथ आहे नखशिख.
नखा पासनं तर शिखा पर्यंत म्हणजे
पायाच्या नखा पासन तर शिखा पर्यंत म्हणजे डोक्या पर्यंत शरिराचं आरोग्य
शास्त्र काय आहे. का तुम्ही आजाकी पडता आणी कसं तुम्ही नीट होऊ शकता याचा
सखोल अभ्यास या ग्रंथात आहे.
याचा अर्थ हा की संभाजीमहाराज हे Doctor सुद्धा होते. हा ग्रंथ शैल्य चिकित्सेवरती आधारित आहे.
आणखी काय उधारण द्यायचं संभाजी महाराजांच्या विद्वत्तेचं?
संभाजी महाराजांचा शेवटचा ग्रंथ आहे सातसतक.
राजानी राज्य करतांना प्रजेला आपलं कुटुंब समजुन राज्य करायचं. मीत्या
राज्याचा मालक नाही तर सेवक आहे ही भुमीता घेऊन राज्य केलं पाहिजे.
छत्रपती संभाजी हे चक्रवती संन्यासी आहे याचा पुरावा या ग्रंथात भेटतो.
त्यांनी आपल्या आयुष्यात तो प्रयोग करुन पाहिला.
त्या ग्रंथाच्या पहिल्या पानावरती जे समर्पन आहे त्यात असं लिहिलं आहे,
'ज्याच्या पराक्रमाने दाही दिशा तळपतात अश्या शंभू राजांच्या त्या पवित्र विचारांना समर्पित.'
संभाजी महाराजांची विद्वत्ता काय आहे हे गागाभट्ट त्यांच्या प्रस्तावन्या मध्ये लिहितात.
संभाजी महाराजांनी स्वत: ४ ग्रंथ लिहिले हे तर आपल्याला माहिती आहे.
वया च्या १४ व्या वर्षीपहिला ग्रंथ लिहायला सुरवात केली आणी २० व्या वर्षी पुर्ण केला लो म्हणजे 'बुद्धभुषण'.
भल्या भल्या पंडितांना तोंडात बोट घालायला लागतील असा तो बुद्धभुषण ग्रंथ आहे. त्यातलं एक वाक्य असं आहे की बांबुच्या झाडाला शंभर वर्षा नंतर फुलं येतात आणी फुलं आल्या नंतर ते झाडमरत असतं.
याचा अर्थ असा की संभाजी महाराज फक्त साहित्यिक नव्हते तर इतर व्याव्हारिक न्यान हवं ते सुद्धा भरपूर होतं.
संभाजी महाराजांनी आणखी ३ ग्रंथ लिहिले वयाच्या ३० व्या वर्षा पर्यंत.
'नखशिख'
'सातसतक'
आणि 'नाइकाभेद'.
नाइकाभेद मध्ये न्रूत्याचे प्रकार किती असतात हे लिहिलं आहे. आज जे आपण भरतनाट्यम पाहतो ते भरतनाट्यम नाइकाभेद वरती आधारित आहे.
भरतनाट्यम या न्रूत्य प्रकाराचे जनक संभाजी महाराज आहे याचा पुरावा नाइकाभेद मध्ये सापडतो. नाइकाभेद हे संभाजी महाराजांनी लिहिलेल दुसरं ग्रंथ.
तिसरं ग्रंथ आहे नखशिख.
नखा पासनं तर शिखा पर्यंत म्हणजे पायाच्या नखा पासन तर शिखा पर्यंत म्हणजे डोक्या पर्यंत शरिराचं आरोग्य शास्त्र काय आहे. का तुम्ही आजाकी पडता आणी कसं तुम्ही नीट होऊ शकता याचा सखोल अभ्यास या ग्रंथात आहे.
याचा अर्थ हा की संभाजीमहाराज हे Doctor सुद्धा होते. हा ग्रंथ शैल्य चिकित्सेवरती आधारित आहे.
आणखी काय उधारण द्यायचं संभाजी महाराजांच्या विद्वत्तेचं?
संभाजी महाराजांचा शेवटचा ग्रंथ आहे सातसतक.
राजानी राज्य करतांना प्रजेला आपलं कुटुंब समजुन राज्य करायचं. मीत्या राज्याचा मालक नाही तर सेवक आहे ही भुमीता घेऊन राज्य केलं पाहिजे.
छत्रपती संभाजी हे चक्रवती संन्यासी आहे याचा पुरावा या ग्रंथात भेटतो.
त्यांनी आपल्या आयुष्यात तो प्रयोग करुन पाहिला.

शिव रुपाने मराठ्यांचा सूर्य उगवला
शिव रुपाने मराठ्यांचा सूर्य उगवला
पराक्रमे तयाच्या महाराष्ट्र
दारी भगवा फडकला !!
बापाने घडवल्या मुलुखाला
पुढे रेटाया आज युवराज धड़कला |
सिंहाच्या छाव्या जन्मी घालुनी,
... सयीने पुरंधारी शम्भू जोडीला !!
माथी संकट नसे , तो कोण भोसला
सिद्ध करावया शम्भू लहणपणीच
संकटाशी भिडला |
युवराज असुनही त्या दिवासी शम्भू
एकाकी पडला
कळन्याअधिच आईचा पदर सरला !!
धाराऊ दुधाने बाळशम्बु सळसळला ,
शिवाचा फ़र्जन्दच तो , त्यांच्यातोलाने च
तयाने भगवा हाती धरला |
एक समयी पाच मिहिमा लढला होता ,
मराठ्यांची ताकत धाखवत ,
शम्भूराजा अवघ्या मुलुखाची शान
बनला होता !!
रायगडाच्या होळी माळावर
उभ्या त्याच्या आबासाहेबाना मनात आठवत ,
मांवळचा हा वाघ लढत होता |
औरंग्याची गुर्मी उतरवत ,
शिवाचा शम्भू सारी हिरवी धगड़ फोडत
होता !!!
गनोजी सिर्क्याच्या बैमान हातान ,
आप्त्स्वकियानिच त्याचाघाट रचला होता ,
पैस्यापाई
त्याना हा स्वाभिमानी राजा नको होता |
सर्वाना पुरून उरनारा शम्भुराजा
म्हनुनच आज शत्रु हाती सापडला होता !!
डोळे फोडले , मीठ चोळले ,
तरी राजा डगमगत नव्हता|
कवडयाच्या माळीवर हात घालनार्यावर ,
त्याअवस्तेताही शम्भुराजा भडकला होता!!!
पण भवानीनेच आज गोंधळ घातला होता ,
म्हनुनच की काय तिला हावीर स्वर्गातच
पाहिजे होता |
शिवाने दिलेल्या शपतेपाई
शम्भुराजा महाराष्ट्रधर्मासाठी बेचाळीस
दिवस लढला
मरता मरताही भगवा कवटाळत ,
शम्भू राजाने"जग्दम्भ!!"म्हणत हिन्दवी शब्दच
उच्चारला होता
हिन्दवी शब्दच
उच्चारला होता....... !!!!
आभार - अमित गांगर्डे आणि त्यांचे सहकारी .
पराक्रमे तयाच्या महाराष्ट्र
दारी भगवा फडकला !!
बापाने घडवल्या मुलुखाला
पुढे रेटाया आज युवराज धड़कला |
सिंहाच्या छाव्या जन्मी घालुनी,
... सयीने पुरंधारी शम्भू जोडीला !!
माथी संकट नसे , तो कोण भोसला
सिद्ध करावया शम्भू लहणपणीच
संकटाशी भिडला |
युवराज असुनही त्या दिवासी शम्भू
एकाकी पडला
कळन्याअधिच आईचा पदर सरला !!
धाराऊ दुधाने बाळशम्बु सळसळला ,
शिवाचा फ़र्जन्दच तो , त्यांच्यातोलाने च
तयाने भगवा हाती धरला |
एक समयी पाच मिहिमा लढला होता ,
मराठ्यांची ताकत धाखवत ,
शम्भूराजा अवघ्या मुलुखाची शान
बनला होता !!
रायगडाच्या होळी माळावर
उभ्या त्याच्या आबासाहेबाना मनात आठवत ,
मांवळचा हा वाघ लढत होता |
औरंग्याची गुर्मी उतरवत ,
शिवाचा शम्भू सारी हिरवी धगड़ फोडत
होता !!!
गनोजी सिर्क्याच्या बैमान हातान ,
आप्त्स्वकियानिच त्याचाघाट रचला होता ,
पैस्यापाई
त्याना हा स्वाभिमानी राजा नको होता |
सर्वाना पुरून उरनारा शम्भुराजा
म्हनुनच आज शत्रु हाती सापडला होता !!
डोळे फोडले , मीठ चोळले ,
तरी राजा डगमगत नव्हता|
कवडयाच्या माळीवर हात घालनार्यावर ,
त्याअवस्तेताही शम्भुराजा भडकला होता!!!
पण भवानीनेच आज गोंधळ घातला होता ,
म्हनुनच की काय तिला हावीर स्वर्गातच
पाहिजे होता |
शिवाने दिलेल्या शपतेपाई
शम्भुराजा महाराष्ट्रधर्मासाठी बेचाळीस
दिवस लढला
मरता मरताही भगवा कवटाळत ,
शम्भू राजाने"जग्दम्भ!!"म्हणत हिन्दवी शब्दच
उच्चारला होता
हिन्दवी शब्दच
उच्चारला होता....... !!!!

कारकीर्द शहाजी राजांची..
कारकीर्द शहाजी राजांची..
जेव्हा दिल्लीमध्ये दिल्लीपती शहेनशाह शहाजान आणि महंमद आदिलशहा या
दोघांनी मिळून निजामशाही संपवली,त्या वेळी निजामशहाचा वारसदार मूर्तझा या
लहान मुलाला स्वत:च्या मांडीवर बसवून शहाजीराजांनी स्वतंत्रपणे राज्यकारभार
सुरू केला, व जणू स्वत:वरच छत्र धारण केले.ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील,
संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा हा स्वतंत्र
राज्यकारभार जवळजवळ ३ वर्षे टिकला होता.
राजस्थानच्या चित्तोडगढच्या
संग्रामात अल्लाउद्दीन खिलजीशी लढताना राणा लक्ष्मणसिंह नावाचा सेनानी
आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडला. पुढे याच वंशातील भैरोसिंह उर्फ
भोसाजी महान कार्य करून गेले. त्यांच्यामुळेच या वंशाला पुढे ‘भोसले’ हे
नाव प्राप्त झाले. याच वंशात पुढे वेरुळस्थित बाबाजीराजे भोसले यांच्या
घरात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई भोसले यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म
झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी
अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्हीमुलांची
नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली. पुढे सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव
यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा इ.स. १६०३ मध्ये विवाह
झाला. यावेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत होते. पुढे
लगेचचमालोजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कालांतराने जसेजसे शहाजीराजे
मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची
कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली.
दरम्यान अहमदनगरजवळील भातवडीच्या
रणांगणात निजामशाही संपवण्यासाठी भारतवर्षातील सर्व इतर सत्ता एकत्र आल्या
होत्या. निजामशाही वाचवण्यासाठी या एकत्रित फौजांचा सामना शहाजीराजे वजीर
मलिक अंबरच्या साथीने करीत होते ( इ.स. १६२४ ). त्यांना त्यात यश मिळाले.
शहाजीराजांचा ऐतिहासिक विजय झाला. याच लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी
धारातीर्थी पडले. पण पुढे मलिक अंबरची दरबारातील राजकारणी वागणूक पाहून
शहाजीराजे आदिलशाहीत गेले. त्यानंतर इ.स. १६३९ मध्ये आदिलशहाकडून "सरलष्कर"
ही पदवी त्यांना देण्यात आली व बंगळूरची जहागिरीही त्यांना प्राप्त झाली.
आदिलशाहीत असताना शहाजीराजांनी पुणे परगणा निजामशाहीकडून काबीज केला होता.
शहाजीराजांना बंगळूरचा प्रदेश फार आवडला. शहाजीराजे व त्यांचे थोरले
चिरंजीव संभाजीराजे यांनी आपल्या मनातील स्वराज्य संकल्पनेला मूर्त स्वरूप
देण्याचे या ठिकाणी ठरविले. ते मुळातच उत्तम प्रशासक व पराक्रमीयोद्धे
होते. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी बरीच अनुकूल
परिस्थिती निर्माण करून दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणूनच
त्यांनीयोग्य वेळ पाहून पुण्यात आपल्या जहागिरीवर स्वतंत्र कारभार
चालविण्यासाठी पाठवले होते. त्याचबरोबर श्यामराज रांझेकर , बाळकृष्णपंत
हणमंते , रघुनाथ बल्लाळ अत्रे , कान्होजी जेधे नाईक व यांच्याबरोबर इतर
अनेक मातब्बरांनाजय्यत तयारीनिशी शिवाजी महाराजांसोबत राज्यकारभारासाठी
पाठवले होते. राज्यकारभारासाठीची आवश्यक राजमुद्राही शहाजीराजांनीच
शिवरायांना दिली.
दरम्यानच्या काळात आदिलशहाचा मुख्यवजीर नवाब
मुस्तफाखान याने बाजी घोरपडे , मंबाजी भोसले , बाजी पवार , बाळाजी हैबतराव ,
फतहखान , आझमखान यांच्या साहाय्याने शहाजीराजांना दगा देऊन कर्नाटकातील
जिंजीजवळ कैद केले. साखळदंडांनी बांधून भर विजापुरातून शहाजीराजांना
दरबारात हजर करण्यात आले. तो दिवस होता २५ जुलै, इ.स. १६४८ चा. हे कळताच
शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीपणाने राजकारण करत दिल्लीत मोगल सुलतान
शहाजहानला एक पत्र पाठवले. स्वत: आपणव आपले पिता शहाजीराजे हे दिल्लीपतीची
चाकरी करू इच्छितात असे त्यांनी लिहिले. या बदल्यात शहाजीराजांची
विजापूरच्या कैदेतून मुक्तता करावी ही अट घातली. अशा प्रकारे शिवाजी
महाराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी दिल्लीच्या बादशहाला मधाचे बोट लावले
होते. हा प्रयत्न यशस्वी ठरला.शहाजीराजांची दि. १६ मे, इ.स. १६४९ रोजी
सन्मानपूर्वक सुटका झाली.
शहाजीराजांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला असता
असे लक्षात येते की त्यांनी स्वाभिमान राखत आदिलशाही , मुघलशाही व
निजामशाही - या सर्व सत्ताधीशांकडे काम केले. आपण लावलेल्या स्वराज्याच्या
रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले. काही काळानंतर ते
पुन्हा आपल्या जहागिरीत परतले. माघ शुद्ध ५,म्हणजेच २३ जानेवारी, इ.स.
१६६४ रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेलेअसताना त्यांच्या घोड्याचा एका
वृक्षवेलीमध्ये पाय अडकला व ते खालीकोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी
मृत्यू झाला.
एक शूर मराठा सरदार. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजीराजांचे पिता व राजमाता जिजाबाई यांचे यजमान.
यांना,
"छत्रपती प्रतिष्ठानाचा" मानाचा मुजरा!
Subscribe to:
Posts (Atom)