Wednesday, April 25, 2012

तो काळ होता.. ते मराठे होते.

तो काळ होता.. ते मराठे होते.
शिवरायांचा शब्द ऐकल्यावर सर्व विसरून जाणारे मराठे
होते..
मग घरात कोणतेही कार्य असो सण,त्योहार असो
शिवरायांच्या शब्दाखातर जीवाची बाजी लावणारे
मराठे होते....
शिवरायांचा शब्द पाळण्यासाठी जीवाची पर्वा न
करणारे मराठे होते...
जीव जाणार माहीत असूनहि... सतत पुढे येणारे मराठे
होते..
मग आता झालं तरी काय..??
त्या शिवरायांच्या पुतळ्यासाठी / स्मारकासाठी सर्व
माघार का घेत आहेत...?
हे सुद्धा मराठेच आहेत ना ?? की (०:०:०:०) ???
Valentine day वर बंदी आली कीसंपूर्ण
महाराष्ट्रातली युवा शक्ती एकत्र येते..
मग ज्यांच्या मुळे.. हिंदुत्व,
मराठीबाणा जन्माला आला त्यांच्या साठी मात्र
आपली भावना कोरीच का???
मोजून नेते आहेत तरी किती ??...
आणि मराठी जनता किती आहे ??
हिच वेळ आहे मराठ्यांनो..
दाखवून द्यायची...
आपल्यातही सळसळतंय तेच मर्दमराठ्याच रक्त ...
शिवरायांसाठी आपण काय करू शकतो ते .....
मराठीबाण्यासाठी आपण काय करू शकतो ते....
आम्ही आहोत तयार... मग बघूच कोणते नेते येतआहेत आडवे...
आपण आहात का ???
जय जिजाऊ
जय शिवराय...
प्रत्येक मराठ्याच्यास्टेटस वर तरी.. हा झणझणीत लेख
दिसलाच पाहिजे ..
आयुष्यात काहीतरी करूया..
पुढच्या पिढीला तरी आपल्याबद्दल गर्व
वाटायला....
आभार - रोहित शिंदे आणि त्यांचे सहकारी

शिवछत्रपतींबाबत

शिवछत्रपतींबाबत मी जितका विचार करतो तितकं गुंगुन जायला होतं. महाराजांच आयुष्य म्हणाल तर तुलनेने कमी होतं. पैकिपहिली १५ वर्ष सोडून द्यावीत कारण शिवाजीराजे असले तरी बालपण हे बालपणच असतं. त्यांना समज व त्यांवरचे आऊसाहेबांचे संस्कार ह्या त्यांच्या जमेच्या बाजू धरुनहि राजकिय विचार करता १५ वर्ष बाजूला काढायला हरकत नाहि. म्हणजे उरली३५ वर्ष ... ३५ वर्षात एक माणूस नेमकं असं काय करतो कि ३५० वर्षांनीहि त्याचे विचार, कृती हे तितकेच ताजे रहातात? इतकेच नव्हे तर जगाच्या इतिहासात दुसरे उदाहरण नाहि अश्या अनेक घटना शिवकालात व शिवोत्तर कालात मराठ्यांबाबत घडल्या.
विचार करा - ज्याने दिल्लीच्या राजपुत्राला रणांगणावर अडकवून ठेवले होते व ज्याचा डंका रुमशेमपावतो वाजत होता अश्या एका ताकदवान माणसाला आपल्याला हवे त्या भागात बोलावून स्वहस्ते कोथळा बाहेर काढलेली घटना जगात दुसरी कुठली आहे? - नाही!
तब्बल सव्वालाखांहून जास्त फौजेत चारशे - पाचशे माणसांसकट घूसून कामगिरी फत्ते करुन सुखरुप परत येणे हि घटना घडली आहे कुठे? - नाहि! तसे बघायला गेलेतर राजकिय व सामरिक दृष्ट्या खुद्द"राजाने" असे करणे हा वेडेपणाच होता, एक माणूस फितूर आणि सगळे संपले, एक गळपटला असता तर सगळे उधळले गेले असते, खुद्द राजांच्या जीवाला धोका होता. पण हि संधी अखेरची कारण एकदा कोकणात खानाच्या लोकांनी छावणी केली कि तळकोकण स्वराज्यापासून तुटलेअसते. शिवाय रणात मारुनकाढावे इतकि ताकद मराठ्यांत तेव्हा आली नव्हती. जनता नागवली जात होती. हा जाणता राजा जनतेची किती काळजी घेत होता हे ह्याकाळातील बाजी जेधेंना लिहिलेल्या २-३ पत्रांतून दिसुन येते पण बरोबरच खानाचं संकट किती मोठं होतं व महाराजांवर किती ताण होता तेहि समजते. ’इस पार या उस पार’ ह्या विचारानेच जनतेसाठी स्वत:चा जीव ह्या देवमाणसाने धोक्यात घातला. ’कमांडो ऑपरेशन’ कशाला म्हणातात ते समजण्यासाठी शास्ताखानावरचा छापा त्यामगचा विचार व केलेली कृती हे पुन: पुन: वाचून त्यावर विचार करण्यसारखा आहे. आणि कल्पनेबाहेर हे ’कमांडो ऑपरेशन’ यशस्वीझाले. पुन्हा सांगतो - " निदान पहिल्या महायुध्दा आधी जगात एकहि असे उदाहरण नाहि."
तब्बल ४५० - ५०० किमी वरची शत्रूची "आर्थिक राजधानी" दोनवेळा धूवून काढायची आणि शत्रुच्या नाकाखालून सगळी संप्पत्ती घेऊन यायची, जगाच्या इतिहासात दुसरे उदाहरण नाहि.
   आभार - मुकुंद पिंगळे आणि त्यांचे सहकारी 





हिंदुत्वाचे महान रक्षक : धर्मवीर संभाजीराजे !

हिंदुत्वाचे महान रक्षक : धर्मवीर संभाजीराजे !
औरंगजेबाला २७ वर्षे उत्तर हिंदुस्थानापासू न दूर ठेवणारे संभाजीराजे
संभाजीराजांनी जी अलौकिक कामे त्यांच्या अल्पायुष्यात केली, त्याचा दूरगामी परिणाम संपूर्ण हिंदुस्थानावर झाला. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येक हिंदु बांधवाने कृतज्ञ राहिले पाहिजे. त्यांनी औरंगजेबाच्याआठ लाख सैन्याला न डगमगता तोंड दिले आणि कित्येक मोगल सरदारांना लढाईत पराभूत करून त्यांना पळता भूई थोडी केली. त्यामुळे औरंगजेब दीर्घकाळ महाराष्ट्रात लढत राहिला आणि संपूर्ण उत्तर हिंदुस्थान त्याच्या दडपणापासून मुक्त राहिला. ही संभाजीराजांची सगळयातमोठी कामगिरी म्हणावी लागेल. त्यांनी औरंगजेबाबरोबर तह केला असता, त्याचे मांडलिकत्व स्वीकारलेअसते, तर तो दोन-तीन वर्षांत पुन्हा उत्तरेत गेला असता; परंतु संभाजीराजांच्या संघर्षामुळे २७ वर्षे औरंगजेब दक्षिणेत अडकून राहिला आणि त्यामुळे उत्तरेत बुंदेलखंड, पंजाब आणि राजस्थान या ठिकाणी हिंदूंच्या नवीन सत्ता उदयाला येऊन हिंदु समाजाला सुरक्षितता लाभली.
हिंदूंच्या शुद्धीकरणासाठी सदैव दक्ष असलेले संभाजी महाराज !
शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर यांना पुन्हा हिंदु धर्मात घेतल्याची हकिकत सर्वांना माहीत आहेच; परंतु संभाजीराजांनी `शुुद्धीकरणासाठ ी'आपल्या राज्यात स्वतंत्र विभाग स्थापन केला, हे विशेष महत्त्वाचे आहे. हरसूल गावच्या कुलकर्णी आडनावाच्या ब्राह्मणाची कथा संभाजीराजांच्या इतिहासात नोंदवलेली आहे. जबरदस्तीमुळे मुसलमान झालेला हा कुलकर्णी हिंदु धर्मात परत येण्यासाठी खूप प्रयत्न करत होता; परंतु स्थानिक ब्राह्मण त्याला दाद देत नव्हते. शेवटी हा ब्राह्मण संभाजीराजांना त्या धामधुमीच्या काळात भेटला आणि त्याने आपली व्यथा आपल्या राजासमोर मांडली. महाराजांनी ताबडतोब त्याच्या शुुद्धीकरणाची व्यवस्था करून पुन्हा त्याला स्वधर्मात प्रवेश दिला. राजांच्या उदार धोरणामुळे कित्येक हिंदू पुन्हा स्वधर्मात आले !

माझ्या शिवबाशी मराठ्याच नात आहे.

माझ्या शिवबाशी मराठ्याच नात आहे.
स्वराज्याच्या मातीत त्यांच्या शुर मावळ्यांच रक्त आहे
रक्तात ज्वालामुखी नजरेत लाव्हा आहे.
वाटेला जावु नका मराठ्यांच्या रणांगणात उतरला तर क्षणात सार भस्म आहे.
नडला म्हणुन फाडला.
मैत्री आमच्या रक्तात आहे.
मिर्झाला विचारा राजा किती दिलदार आहे......!
--- कृष्णा पाटील

तुम्हाला कदाचित माहित नसेल पण..

तुम्हाला कदाचित माहित नसेल पण आजकाल आपणच आपला घात करायला उठलो आहोत...
पानिपत संक्राती दिवशी घडले आले म्हणून आपण संक्रांत बंद करायला चाललो आहोत.
आज आपण गुढीपाडवा साजरा करु नका असे म्हणत आहात.हळूहळू हिदूंचे सर्वच सण बंद पाडण्याचा काही हिँदूद्वेष्ट्या लोँकांचा कट चालला आहे.
सणच राहिले नाहित तर संस्कृतीच नष्ट होईल.मग काय स्वतःच्या लोकांचा आपल्या धर्माविषयी स्वाभिमाननष्ट होऊन ते धर्माँतर करायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाहीत.
गुढीपाडवा अयोद्धे कडे साजरा होत नाही याचे कारण म्हणजे तिकडे झालेला संस्कृतीचा नाश.
आणि महाराष्ट्र हा देवाधर्माचा व संतांचा राष्ट्र आहे त्यामुळे आपल्याकडील संस्कृती टिकून आहे.
खरे तर आपल्या हिंदुचे सण पुर्वकाळापासून अतिशय शास्रोक्त पद्धतीने केले जात होते पण सुलतानांच्या आक्रमणामुळे हिंदु संस्कृतीचा ऱ्‍हास होऊ लागला.इतकी संस्कृती लयाला लागली की लोकांना पुन्हा जागे करण्यासाठी देवांनासुद्धा अवतार घ्यावा लागला.
दत्तावतार स्वामी समर्थ,
हनुमान अवतार साई बाबा,
रामदास अवतार गजानन महाराज या सर्वाँनी शिवरायांचे गुणगान केले आहे व त्यांचे कार्य पुन्हा चालू ठेवले आहे.
आणि गुढीपाडव्याबद्द ल बोलायचे झाले तर जेव्हा शालिवाहन राजाने शकाचा पराभव केला त्यामुळे हा दिन विजयदिन म्हणुन ओळखला जातो.शालीवाहन राजाच्या विजयदिनापासून नवीन कालगणना सुरु झाली.त्याला'शाल ीवाहनशतक'म्हणता त.गुढी म्हणजे शालिवाहन राजाचा विजयध्वज आहे.
म्हणूनच गुढीवर तांब्या उलटा ठेवतात..०
गुढी आपल्याला काय सांगते ..?
"मुलांनो नवीन वर्ष सुरु झालयं,नवीन विचार करा,संकल्प करा,सद्विचार सदाचार यांची झेप,आकाशाला गवसणी घालू या,मी जशी ऊंच आहे निळ्या निळ्या आकाशाशी नाते सांगते आहे तशी तुमची प्रगती होऊ द्या,परमेश्वराच ्या सेवेत सातत्य असू द्या."
औरग्यांने हिँदूंचा मुख्य सणच हत्येसाठी निवडला याचे कारण हेच आहे की हिँदू संस्कृतीचा नायनाट....
या नववर्षाला गुढीसुद्धा आपल्या संभाजीराजांच्या बलिदानासाठी ऊंच आकाशात ऊभा राहून सलाम करते असे आपल्या लोकांनी म्हणले पाहिजे.जागे व्हा.विचार करा.मुर्खासारखे वागू नका.
जय भवानी
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे
जयतु हिँदु राष्ट्रम.