Tuesday, June 26, 2012

आहेत क्षण हे अपुरे,

आहेत क्षण हे अपुरे,
नाही लाभणार आयुष्य दुसरे.
फैलावून दे पंख भरारीचे,
तोडूनी बंधने, जग आयुष्य एकदाचे.
काळाच्या पडद्याआड, एक दिवस जायचे...
जग आयुष्य तू, ते उन , ती सावली, त्या पावसाचे,
जग तू वाट, सुखाची अन दुखाची, मैत्र पावलाचे.
जग तू आयुष्य, दात्या वृक्षाचे,
आयुष्यात कर्म फक्त परोपकाराचे.
काळाच्या पडद्याआड, एक दिवस जायचे...
जग तू आयुष्य, झुळझुळ झऱ्याचे,
खडतर प्रवासात, गीत गात वहायचे.
जग तू आयुष्य, गरुडझेपिचे ,
तोडून बंधने सारी आसमंत चुमण्याचे.
काळाच्या पडद्याआड, एक दिवस जायचे...
जग तू आयुष्य, तेवणाऱ्या दीपकाचे,
अंधारात वाट दाखवणाऱ्या, मार्गदर्शकाचे.
जग तू आयुष्य, त्या नाती, त्या मैत्री,
त्या प्रीतीचे,
देवू नकोस कोणा हृदया अबोलपण तुझ्या मनाचे.
काळाच्या पडद्याआड, एक दिवस जायचे...
जग तू आयुष्य, थोर माणसाचे,
माणुसकी जपणाऱ्या मानवाचे.
जग तू असे काही, मनांत ना काही राहायचे,
काळाच्या पडद्यावर ओळख करून जायचे.
काळाच्या पडद्याआड, एक दिवस जायचे...
जग तू आयुष्य, असे काही क्षणांचे,
काळाच्या मंचाने तुझे गीत गायाचे.
काळाच्या पडद्यावर, तुझी कीर्ती कोरण्याचे,
असुनी पडद्याआड, पण पडद्यावर चिरंजीव राहण्याचे.
काळाच्या पडद्याआड, एक दिवस जायचे..

No comments:

Post a Comment